राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे प्रेरणादायी विचार
३० एप्रिल रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आहे तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा आढावा घेणार आहोत.
सृष्टीतील प्रत्येक वस्तुत प्रत्येक कणात सतत कार्य प्रवृत्ती खेळत आहे.
जो निष्क्रीय होऊन फिरेल तो देवाचा समाजाचा गुन्हेगार ठरेल हाच सृष्टीचा कायदा आहे.
एकांत हा माणसाच्या विचाराला पृष्ठी देणारा अणि भावी परिस्थितीचे स्वप्र दाखवणारा असतो.
माणुस जन्माला येणे अणि माणुस बनणे ह्या गोष्टी अत्यंत भिन्न आहेत.
काळ बदलला की शिक्षणाच्या पदधतीही बदलतात.आजच्या काळाची मागणी जरा वेगळी आहे.ती म्हणजे सर्वांनी आपले काम इमानदारीने करावे सर्वांनी आपापल्या मर्यादेचे भान राखायला हवे.
आपल्या पुढे जे कर्तव्य असेल त्याच्या सर्व बाजू समजुन घेणे म्हणजे ब्रह्मज्ञान आहे.
मी जे काम करत आहे ते अधिक सुंदर करणे अधिक व्यवस्थित करणे हाच माझा धर्म आहे.तीच माझी पुजा आहे तीच माझी साधना देखील आहे.
जगातील कुठलेही काम कनिष्ठ दर्जाचे नाही सर्व कामे समान दर्जाची अणि श्रेष्ठ आहेत.
कोणताही कामगार असो जोपर्यंत तो स्वताच्या देशाच्या यंत्रणेतला एक भाग मानणार नाही.तो पर्यंत तो काहीच काम करू शकणार नाही असे माझे मत आहे.
माझी पाप अणि पुण्या बाबदची अत्यंत सोपी व्याख्या आहे.परोपकार म्हणजे पुण्य अणि परपीडा म्हणजे पाप आहे.
जाणुन बुजुन दुसरयाला त्रास देणे हे पाप आहे दुसरयाचे भले करणे लोकांचे भल्यासाठी झटणे याचे नाव पुण्य.
याचा अर्थ अकारण आपल्याला छळणारे पापी आहेत अशा पापी मनुष्याचा समाचार घेणे प्रत्येक सज्जन व्यक्तीचे कर्तव्य आहे.अशा माणसांशी व्यवहार सावधगिरीने केला पाहिजे.
स्वतंत्र देश प्रत्येकाच्या विकासाचे रस्ते मोकळे करीत असतो.आपण देखील स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत.
देशाच्या उत्कर्षात आपला भाग आहे म्हणून आपली जबाबदारी आपण अधिक सावधगिरीने पार पाडली पाहिजे.
देशाच्या भवितव्यावर ज्याची श्रद्धा असेल तर फार मोठे काम करू शकतात.आपण अशा श्रदधावानांपैकी एक बनावे ही माझी ईच्छा आहे.
येथील प्रत्येक नागरीक स्वताला भारतीय मानतो आपले पहिले कर्तव्य हेच आहे.
देशाच्या स्वातंत्र्याला थोडाही आघात पोहचणार नाही अशी आपली धारणा असायला हवी.
जो कोणी इथे देशाशी बेईमानी करेल त्याची कधीही गय केली जाणार नाही अशा व्यक्ती विरूद्ध सर्वशक्तिनीशी आपण उभे राहायला हवे.
देश आधी मग धर्म देश जगला तर धर्म जगेल अणि धर्म जगला तर देवता जगतील.
माणुस हा सृष्टीतील सर्वात श्रेष्ठ म्हणून देवाने निर्माण केला आहे.त्याने समाजासाठी धर्मासाठी देशासाठी जगावे ही त्याच्या मागची इच्छा आहे.असे जीवन जगत नसेल जो फक्त स्वताचे स्वार्थ बघत असेल तो किडया मुंग्याचे जीवन जगत आहे असे मानले पाहिजे.
जेव्हा माणुस देशाचे समाजाचे धर्माचे भान ठेवून जगेल तेव्हाच तो महान होईल.
मी देवतांना केवळ पूजेची स्थाने मानत नाही.त्यांच्या पासुन माणसाला अन्याया विरूद्ध लढण्याची शक्ती मिळाली म्हणून त्यांचे मला महत्व आहे.
आपला नेहमीचा धंदा इमानदारीने करणे ही सुदधा अन्याया विरूद्ध केलेली लढाईच आहे.आज प्रत्येक क्षेत्रातील प्रामाणिकपणा कमी झाला आहे.
देश ताठ उभा राहत असतो माणसाच्या प्रामाणिकपणावर वीरतेवर म्हणून आपण प्रामाणिक पणाची वीरतेची आराधना केली पाहिजे.
सैनिक रणांगणावर प्रामाणिकपणे लढतील,शेतकरी प्रामाणिकपणे शेतातुन पीक काढेल, कामगार कारखाने चालवतील साधु पंडित लोकांमध्ये जनजागृती करतील सर्वांच्या प्रयत्नांची देशाला गरज आहे ही वृत्ती म्हणजे देशभक्ती आहे.
सावता माळी शेतीदवारे देवाची पूजा करत होता गोरा कुंभार मडके घडवून विठठलाला प्रसन्न करीत होता याचा अर्थ आपले काम इमानदारीने करणे हीच खरी देवपुजा आहे.
जीवनातील प्रत्येक क्षेत्र रणांगण आहे ह्या क्षेत्रात विजय प्राप्त करण्यासाठी जे धडपडतात ते वीर आहेत अणि जे ह्या विजयाच्या आड येतात ते आपले शत्रु आहेत.