एसटी मधुन हाफ तिकिट सवलतीमध्ये प्रवास करण्याचे प्रमुख नियम अणि अटी – 50 percent discount to women on st bus ticket rules of scheme in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

एसटी मधुन तिकिट सवलतीमध्ये प्रवास करण्याचे प्रमुख नियम अणि अटी 50 percent discount to women on st bus ticket rules of scheme in Marathi

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या २०२३ मधील अर्थसंकल्पीय भाषणात महिलांना एसटी बस प्रवासामधील भाडयात ५० टक्के सवलत दिली जाईल अशी घोषणा केली होती.

म्हणजे शासनाच्या निर्णयानुसार महिला वर्गाला एसटी बस मधुन प्रवास करताना आता फक्त हाफ तिकिटचे पैसे द्यावे लागणार आहेत.

शासनाच्या घोषणेनुसार ही सवलत १७ मार्चपासून लागु देखील करण्यात आली आहे.हया योजनेला महिला सन्मान योजना असे नाव देण्यात आले आहे.

म्हणजेच आपल्या देशातील महिलांच्या सन्मानासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

ही योजना शासननिर्णयानुसार‌ सुरू देखील झाली आहे पण यात एवढे अधिक नियम समाविष्ट आहेत ज्यामुळे अनेक महिला प्रवाशांचा गोंधळ उडताना दिसुन येत आहे.ज्यामुळे एसटी कर्मचारींसोबत काही महिला वर्गाचे प्रवास करताना तिकिट दरावरून वाद देखील घडुन येत आहेत.

म्हणून आजच्या लेखात आपण शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ह्या महिला सन्मान योजनेचे नियम तसेच अटी काय आहेत हेच जाणुन घेणार आहोत.जेणेकरून महिलांना हाफ तिकिट सवलतीमध्ये प्रवास करण्याचे नियम अणि अटी जाणुन घेण्यास मदत होईल.

महिला सन्मान योजनेचे नियम तसेच अटी पुढीलप्रमाणे आहेत-

सर्व महिला वर्गाला एसटीच्या सर्व गाड्यांमधील प्रवासासाठी ही ५० टक्के लागु केली जाणार आहे.यात साध्या बस,आराम बसेस,निम आराम बसेस, शिवनेरी बस, शिवशाही बस, स्लीपर कोच, एसी बस अशा सर्व प्रकारच्या बसेसचा समावेश केला जाणार आहे.

See also  Agriculture Infrastructure Fund Benefits under PM-KISAN

म्हणजे महिला वर्गाला वरील नाव दिलेल्या सर्व बसेस मधुन ५० टक्के दरात हाफ तिकिट सवलतीमध्ये प्रवास करता येणार आहे.

भविष्यात जर एसटी महामंडळाने नवीन प्रकारची बस आणली तर त्या बस मधुन प्रवास करायला महिलांना ५० टक्के इतकी सवलत दिली जाणार आहे.

महिलांकडुन प्रवासी भाडयामध्ये अपघात सहायता निधी आकारला जाण्याची शक्यता आहे.एसी बस असल्यावर वस्तु अणि सेवा कराची देखील आकारणी केली जाऊ शकते.

उदा, समजा एखादी महिला पुणे ते कोल्हापूर बसने प्रवास करत असेल अणि 320 रूपये तिकिट दर आहे.तर त्या महिलेला हाफ तिकिट प्रमाणे 160 रूपये तिकिटाचे भाडे भरावे लागेल.बाकी 30 टक्के वस्तु अणि सेवा कर अपघात सहायता निधीचे आकारले जातील.

महिलांकरीता जे तिकिट दिले जाणार त्याची रंगसंगती पुरूषांना दिल्या जात असलेल्या तिकिटापेक्षा थोडी भिन्न देखील असु शकते.

महिलांना एसटी प्रवासात दिल्या जात असलेल्या या सवलती अंतर्गत महिला प्रवाशांना फक्त आपल्या राज्यात (महाराष्ट्र)एसटी महामंडळाच्या बसने सवलतीच्या दरात फिरता येईल.महाराष्टाच्या बाहेर गेल्यावर ही सवलत लागु होणार नाही.

म्हणजे एखादी महिला एसटी महामंडळाच्या बस मधुन महाराष्ट्र राज्य मध्ये जेवढा प्रवास करेल त्यावर तिला ५० टक्के सूट दिली जाईल पण याच ठिकाणी ती महिला महाराष्ट्र सोडून इतर राज्यात पण बसने प्रवास करत गेली तर महाराष्ट्राच्या हद्दीबाहेर गेल्यावर जे काही भाडे महिलेला लागेल त्यावर तिला कुठलीही ५० टक्के सुट दिली जाणार नाही.ते पुर्ण भाडे त्या महिलेला भरावे लागेल.तसेच इतर एसी बसने प्रवास करत असल्यास वस्तू व सेवा कर अपघात सहायता निधी याचे पैसे देखील महिलेस भरावे लागणार आहे.

महिलांना ह्या सवलतीचा लाभ कुठल्याही शहरी भागात घेता येणार नाहीये.म्हणजे समजा महिनेने दादर ते पनवेल असा प्रवास केला तर शहरी भागातील प्रवासासाठी महिलांना ५० टक्के सवलत दिली जाणार नाही.

See also  अकाऊंटंट बनण्यासाठी कोणता कोर्स,डिप्लोमा करायला हवा?Which course and diploma best for accounting jobs in Marathi

आॅनलाईन वगैरे पदधतीने तिकिटाचे थेट रिझरवेशन करणारया महिलांना ह्या सवलतीचा ५० टक्के सवलतीच्या दरात लाभ दिला जाणार आहे.

ज्या मुली ५ ते १२ ह्या वयोगटातील आहेत त्यांना आधीचेच तिकिट दर आकारले जाणार आहे.कारण ५ ते १२ वयोगटातील बसमधून प्रवास करणारया मुलींना आधीपासूनच अर्धे तिकिट लागु करण्यात येत आहे म्हणून ह्या वयोगटातील मुलींना बसने प्रवास करताना आधीचेच तिकिट दर आकारले जाणार आहे.

७५ पेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ महिला नागरीकांना आधीपासूनच एसटी महामंडळाच्या वतीने मोफत प्रवासाची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.म्हणून ७५ पेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ महिला नागरीकांना कुठलेही तिकिट आकारले जाणार नाही.यांना मोफत प्रवास करता येईल.

ज्या महिलांचे वय ६५ ते ७५ दरम्यान आहे अशा महिलांना तिकिट दरात पन्नास टक्के इतकी सवलत प्रदान केली जाणार आहे.म्हणजे उरलेले पन्नास टक्के भाडे या वयोगटातील महिलांना स्वत भरावे लागणार आहे.

महिला सन्मान योजनेचे फायदे –

या सवलतीमध्ये तिकिट दर निम्मे होणार आहे म्हणजे आधी महिलांना साध्या बसने प्रवास करायला जो खर्च येत होता त्याच खर्चात महिलांना एसी बसने देखील प्रवास करता येणार आहे.

आम्ही दिलेली माहिती एसटी बसने प्रवास करत असलेल्या सर्व महिला प्रवाशांसोबत शेअर करा जेणेकरून एसटी बसने हाफ तिकिट दर सवलतीमध्ये प्रवास करण्याचे नियम अणि अटी काय आहेत हे त्यांना देखील जाणुन घेता येईल.

याने महिलांची एसटी बसने प्रवास करताना तिकिट दरावरून जी फसगत होत असते ती होणार नाही महिलांचे एसटी महामंडळाच्या कर्मचारींसोबत म्हणजे कंडक्टर वगैरे सोबत तिकिटांच्या दरावरून वादविवाद देखील होणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा