८ अ उतारा म्हणजे काय? 8A utara meaning in Marathi
८ अ उतारयामुळे आपणास एकाच व्यक्तीच्या मालकीच्या गावामध्ये एकुण किती जमीनी आहेत याची माहिती आपणास ८ अ उतारया द्वारे प्राप्त होते.
जेव्हा आपण आॅनलाईन पदधतीने आठ अ उतारा काढतो तेव्हा आपणास डाव्या कोपऱ्यात वर्ष दिसुन येते.अणि उजव्या कोपऱ्यात आपण कोणत्या दिवशी उतारा काढत आहे ती तारीख दिसुन येईल.
त्याच्या खाली डाव्या बाजुस गावाचे नाव मध्यभागी तालुका अणि उजव्या बाजूला जिल्ह्याचे नाव दिसुन येईल.
आठ अ ह्या उतारयात एकुण सात रकाने म्हणजेच काॅलम दिलेले असतात.यात पहिला रकाना हा गाव नमुना सहामधील नोंद हा आहे.यात खातेदाराचा नोंद क्रमांक देखील दिलेला असतो.
याचसोबत क्षेत्र विभाग वैयक्तिक आहे किंवा सामाजिक आहे हे देखील देण्यात येत असते.यामुळे आपणास हे कळुन येते की जमिनीची मालकी ही व्यक्तिगत स्वरुपाची आहे की सामायिक स्वरूपाची आहे.
दुसरया रकान्यात म्हणजे काॅलम मध्ये भुमापन क्रमांक तसेच उपविभाग क्रमांक देण्यात आलेला असतो.यातच खातेदाराचे नाव देखील दिलेले असते.
क्षेत्र सामायिक स्वरूपाचे असेल तर सर्वांची नावे देखील इथे देण्यात आलेली असतात.हया रकान्यात व्यक्तीच्या नावावर किती जमिनी आहेत अणि कोणकोणत्या गटामध्ये आहे हे समजण्यास मदत होते.
तिसरया रकान्यात सदर व्यक्तीच्या नावावर गावात एकुण किती क्षेत्र आहेत हे कळत असते.
चौथा रकाना जुडीचा तसेच आकारणीचा असतो.यात प्रत्येक जमिनीवर किती कराची आकारणी करण्यात आली आहे किती कर लावण्यात आला आहे हे दिलेले असते.
हा कर रूपये तसेच पैशांमध्ये असलेला आपणास पाहावयास मिळते.यात आपणास त्या व्यक्तीच्या जमिनीवर किती कर आकारला गेला आहे हे कळत असते.
पाचवा रकाना म्हणजे दुमाला जमिनीवरील हानी नुकसान असते.सहावा रकाना हा स्थानिक कराचा रकाना असतो.याचे दोन उपप्रकार पडतात.
सहा अ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने जमीनीवर किती कर लावण्यात आला आहे हे दिलेले असते आणि सहा ब मध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने किती कर लावण्यात आला आहे हे लक्षात येते.
सातव्या रकान्यात सर्व करांची बेरीज करण्यात आलेली असते.सदर व्यक्तीला किती कर भरावा लागतो आहे हे आपणास यातुन कळते.
सर्वात अखेरीस व्यक्तीचे एकुण क्षेत्र अणि त्यावरील आकारण्यात आलेले कर दिले जाते.
८ अ उतारयाचे फायदे कोणकोणते आहेत?

आठ अ उतारयामुळे आपणास एकाच व्यक्तीच्या मालकीची वेगवेगळ्या गटात असलेल्या जमिनीविषयी माहीती जाणुन घेता येते.
८ अ उतारयामुळे जमिनीची खरेदी विक्री करत असताना जमिन विकत घेत असलेल्या व्यक्तीला हे जाणुन घेण्यास मदत होते की तो विकत घेत असलेली जमीन कोणाच्या नावावर आहे.याने जमिनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात कुठलीही फसवणूक होत नाही.
कर संग्रहित करण्यासाठी प्रशासनाला उपयुक्त ठरते.
८ अ उतारा कसा प्राप्त करायचा?
- सर्वप्रथम आपणास भुलेख महाभुमी गर्वमेंट डाॅट इन ह्या वेबसाईटवर जायचे आहे.
- यानंतर होम पेज वर गेल्यावर विभाग निवडायचा आहे यानंतर दिलेल्या ८ अ ह्या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतर आपल्या जिल्हा तालुका गावाच्या नावावर क्लिक करायचे आहे.
- खाते क्रमांक वर क्लिक करुन तो छोट्या बाॅक्स मध्ये लिहायचा आहे.अणि सर्च बटणावर क्लिक करायचे आहे यानंतर आपल्यासमोर आपला ८ अ उतारा स्क्रीनवर आलेला दिसुन येईल.
- जर आपणास आॅफलाईन पद्धतीने हा उतारा प्राप्त करायचे असेल तर आपण तलाठी कार्यालयात जाऊन देखील हा उतारा प्राप्त करू शकतो.