आई.पी रेटिंग काय आहे
आपण आपल्या मोबाइल ला किंवा इलेक्ट्रॉनिक गॅजेट ला पाण्यापासून लांब ठेवतो.कारण आपल्याला माहीत आहे की मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हिएस जर पाण्यात पडले तर ते खराब होऊ शकतात.जेव्हा आपला मोबाईल पाण्यात पडतो तेव्हा मोबाईल च्या स्पीकर मध्ये किंवा चार्जिंग पिन मध्ये पाणी शिरते आणि आपला मोबाईल खराब होतो.वर्तमानात खूप टेक्निक येत आहेत.
काही कंपन्या असा दावा करतात की,त्या कंपनीचे मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हिएस वॉटर प्रूफ किंवा वॉटर रजिस्टन्स आहेत.म्हणजे तुम्ही जर अशा कंपनीचा वॉटर प्रूफ मोबाईल खरेदी केला तर तो वॉटर प्रूफ मोबाईल पाण्यात पडल्यानंतर ही खराब होत नाही.आपल्याला कोणता मोबाईल वॉटर प्रूफ आहे आणि कोणता मोबाईल वॉटर प्रूफ नाही,हे त्या मोबाईलला दिलेल्या आईपी रेटिंग वरून समजते.आपण या लेखामध्ये आईपी रेटींग बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
आईपी रेटिंग काय आहे ? Ingress Protection Rating Marathi
कोणत्याही मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस किती वॉटर रजिस्टन्स किंवा वॉटर प्रूफ आहे हे पाहण्यासाठी इंटरणेशनल इलेक्टरो-टेक्निकल कमिशन यांनी एक स्केल बनवले आहे.ह्या स्केल वरूनच आईपी रेटिंग दिले जाते.ह्या स्केल वरती दोन रेषा असतात.पहिल्या रेषेवर 0 ते 6 अंक असतात,जे की धूळ सारख्या पदार्थापासून मोबाईल वाचण्याची क्षमता दर्शवतात.आणि दुसरी रेष असते त्यावर 0 ते 9 अंक असतात,जे की पाण्यापासून मोबाईल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस वाचण्याची क्षमता दर्शवतात.ह्यामध्ये 0 ही पाण्यापासून वाचण्याची सर्वात कमी क्षमता आणि 9 ही पाण्यापासून वाचण्याची सर्वात जास्त क्षमता असते.
आईपी रेटिंग आपण एका उदाहरणावरून पाहू :
समजा तुम्ही एक मोबाईल ऑनलाईन चेक करताय किंवा तुम्ही मोबाईल शॉपमध्ये मोबाईल खरेदी करायला गेला आणि एक मोबाईल सिलेक्ट केला.सिलेक्ट केलेल्या मोबाईल वर जर आईपी रेटिंग ‛IP66’ हे दिले असेल तर तो सिलेक्ट केलेला मोबाईल धूळ पासून वाचण्यास सक्षम आहे;परंतु पाण्यापासून वाचण्यासाठी इतका सक्षम नाहीये.तुम्हाला जर वॉटर प्रूफ किंवा वॉटर रजिस्टन्स मोबाईल खरेदी करायचा असेल तर तुम्ही त्या मोबाईल वर दिलेले आईपी रेटिंग पाहिले पाहिजे आणि नंतर चांगला आईपी रेटिंग असलेला मोबाईल खरेदी केला पाहिजे.मोबाईल कंपन्या कमी साईझ मध्ये मोबाईल वरती आईपी रेटिंग दर्शवतात.
आईपी रेटिंग कशा पद्धतीने लिहिलेले असते ? Ingress Protection Rating Marathi
- जेव्हा एखादा मोबाईल फक्त वॉटर प्रूफ किंवा वॉटर रजिस्टन्स असेल तर त्या मोबाईल वरती IPX असे लिहिलेले असते.आणि हे लिहिलेले IPX खूप कमी साईझ मध्ये असते.
- IPX 1 – ह्या आईपी रेटिंग मध्ये,जर पाण्याचे थेंब सतत 10 मिनिटे मोबाईल वरती पडत असतील तरीही मोबाईल खराब नाही होत.
- IPX 2 – ह्या आईपी रेटिंग मध्ये,15 डिग्री च्या अँगल ने मोबाईल वरती सलग 10 मिनिटे पाणी पडले, तरी मोबाईल खराब नाही होत.
- IPX 3 – ह्या आईपी रेटिंग मध्ये ,60 डिग्री च्या अँगल ने मोबाईल वरती सलग 5 मिनिटे पाणी पडले,तर मोबाईल खराब नाही होत.
- IPX 4 – ह्या आईपी रेटिंग मध्ये ,कितीही डिग्री च्या अँगल वरून पाणी पडले तर मोबाईल खराब नाही होत.
- IPX 5 – ह्या आईपी रेटिंग मध्ये,3 गैलेट पाणी पडले तरीही मोबाईल खराब होत नाही.
- IPX 6 – ह्या आईपी रेटिंग मध्ये -तीन मिनिटापर्यंत पाण्याची मोठी धार मोबाईलवर पडली तर ही मोबाईल खराब होत नाही.IPX 1 पासून ते IPX 6 पर्यन्त आईपी रेटींग असणाऱ्या मोबाईलला सर्टीफाईड वॉटर रजिस्टन्स म्हंटले जाते.आणि ह्या च्या वरती असणाऱ्या आईपी रेटिंग ला वॉटर प्रूफ म्हंटले जाते.
- IPX 7 – ह्या आईपी रेटिंग मध्ये ,1 मीटर पाण्यामध्ये अर्ध्या तासापर्यंत मोबाईल असेल,तेव्हाही मोबाईल खराब होत नाही.
- IPX 8 – ह्या आईपी रेटिंग मध्ये,मोबाईल वॉटर प्रूफ असतो,परंतु केमिकल असणाऱ्या पाण्यात तो पडला तर तो खराब होतो.
- एक गोष्ट धेनात ठेवा,मोबाईल कितीही चांगल्या आईपी रेटिंग चा असुद्यात,परंतु त्याला शक्य तेवढे पाण्यापासून लांब ठेवा.
पाण्यात पडलेल्या मोबाईल ला लगेच चार्जिंग लावू नका.
- 135+ मराठी अलंकारिक शब्द संग्रह | Alankarik Shabd in Marathi PDF Download
- डिप्लोमा म्हणजे काय? | Diploma meaning in Marathi
- वॉशिंग मशीन कोणती घ्यावी – खरेदी मार्गदर्शन | Washing machine buying Guide in Marathi
- सुप्रसिद्ध मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे | List of Famous Marathi Kadambari names
- फुलांची माहीती | Flowers Information In Marathi