ऊस पिकात सूक्ष्म अन्नद्रवांचे महत्व -भाग -05- Importance of micro-nutrients in sugarcane cultivation

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ऊस पिकात सूक्ष्म अन्नद्रवांचे महत्व – Importance of micro-nutrients in sugarcane cultivation

ऊस पिकाच्या जोमदार वाढीसाठी पीक पोषक अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे महत्त्वाचे आहे. सध्याची पीक जोपासना लक्षात घेतली तर आवश्यक १६ अन्नद्रव्यांपैकी नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यांच्या वापरासंबंधी जितकी काळजी घेतली जाते तितकी काळजी कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, गंधक ही दुय्यम अन्नद्रव्य आणि लोह, जस्त, मॅगेनीज, तांबे, बोरॉन, मॉलिब्डेनम या सूक्ष्मअन्नद्रव्यांच्या वापराबाबत घेतली जात नाही.

आपल्या भागातील उसाखालील जमिनीत विशेषत: चुनखडीयुक्त जमिनीत जस्त आणि लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणात कमतरता दिसून येते, अशा ठिकाणी उसावर केवडा पडलेला दिसून येतो.

सर्वसाधारणपणे सूक्ष्म अन्नद्रव्यांची उसावरील कमतरता लक्षणे लक्षात घेता नेमके कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे हे पीक निरीक्षणावरून ठाम ओळखणे अवघड जाते किंवा काही सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता लक्षणातील काही बाबी समान असल्यामुळे कमतरतेचा अंदाज करण्यात संभ्रम निर्माण होतो.

जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांचे प्रमाण मर्यादा पातळीच्या खाली गेल्यास पानातील आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते आणि पिकावर कमतरता लक्षणे दिसून येतात. याचा परिणाम ऊस पीक वाढीवर आणि पर्यायाने ऊस उत्पादनावर होतो.

सूक्ष्मअन्नद्रव्यांचा वापर न केल्याने होणारे प्रतिकूल परिणाम ताबडतोब दृश्य स्वरूपात नसतात. मात्र त्यांची कमतरता उत्पादनावर परिणाम करते.

सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपस्थितीत पिके नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर करतात. म्हणजेच एखादे अन्नद्रव्य हे दुसऱ्या अन्नद्रव्याची जागा घेऊ शकत नाही.

सूक्ष्म अन्नद्रव्यांची ऊस पिकातील कार्ये आणि कमतरतेची लक्षणेः

लोह

कार्ये —

१) हरितद्रव्ये तयार करण्यासाठी उपयुक्त.

२) पानांचा गडद हिरवा रंग बनविण्यास मदत.

३) इतर अन्नद्रव्यांच्या शोषणात मदत करतो.

४) झाडांच्या वाढीस व प्रजननास आवश्यक.

कमतरता लक्षणे —

१) नवीन पाने पिवळी दिसतात, शिरा हिरव्या दिसतात.

२) लक्षणे प्रथमत: वरील भागातील पानावर आढळून येतात.

See also  Pinterest काय आहे? । Pinterest information in Marathi

३) पाने पांढूरकी होउन शेवटी वाळून जातात.

जस्त

कार्ये —

१) प्रथिने व वितंचके (एन्झाईम) निर्मीतीस आवश्यक घटक.

२) पिकांच्या वाढ करणाऱ्या प्रेरकांच्या वाढीसाठी आवश्यक.

३) वनस्पतीमध्ये इंडोल ॲसिटीक ॲसिड (आ.ए.ए) तयार होण्यासाठी ट्रिव्होफेनच्या निर्मितीची आवश्यक असते. त्यासाठी जस्त आवश्यक.

४) संप्रेरक द्रव्ये (हार्मोन्स) तयार होण्यास मदत करतो. प्रजनन कियेमध्ये आवश्यक.

कमतरता लक्षणे —

१) पानात हरितद्रव्यांचा अभाव दिसू लागतो, शिरा हिरव्याच राहतात.

२) करपलेले ठिपके व तांबडे डाग पानाच्या शिरा, कडा व टोके यावर तसेच सर्व पानांवर विखुरलेल्या स्वरूपात दिसतात.

३) उसामध्ये कांड्या आखुड पडतात.

मॅगेनीज

कार्ये —

१) प्रकाश संश्लेषण प्रकियेत मदत.

२) जैविक दृष्ट्या कार्यप्रवण असलेल्या पेशिजालामध्ये इतर भागापेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध.

कमतरता लक्षणे —

१) पानात हरितद्रव्याचा अभाव.

२) मुख्य व लहान शिरा गडद किंवा हिरव्या रंगाच्या दिसतात,त्यामुळे पानावर चौकटीदार नक्षी दिसते.

तांबे

कार्ये —

१) ऊस पिकात तांब्याची गरज फार अल्पप्रमाणात असते.

२) तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त उपलब्ध झाल्यास अपायकारक ठरते.

३) हरितद्रव्ये व प्रथिने तयार होण्यासाठी मदत.

४) लोहाचा उपयोग योग्यप्रकारे होण्यासाठी मदत.

५) श्वसनक्रियेचे नियमन करण्यासाठी आवश्यक.

कमतरता लक्षणे —

१) पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात.

२) वनस्पतीचे खोड मऊ व लवचिक बनते.

३) फुटव्यांची संख्या कमी होते.

४) पानांवर हिरवे ठिपके दिसतात.

बोरॉन

कार्ये —

१) कॅल्शियम विद्राव्य स्थितीत राहण्यास व त्याचे स्थलांतर होण्यास मदत.

२) नत्राचे शोषण करण्यास मदत.

३)पेशी आवरणाचा घटक असून पेशी विभाजनास मदत.

४) आवश्यकतेनुसार साखरेचे स्थलांतर घडवून येण्यास मदत.

५) वनस्पतीमध्ये पाण्याचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक.

कमतरता लक्षणे —

१) पाने ठिसूळ बनून गुंडाळली जातात.

२)उसाचा शेंडा पिवळा पडतो, नंतर तो तांबूस काळा पडून वाळतो.

३) शेंडयाकडील कोवळ्या पानांवर पाण्याचे लहान लहान पारदर्शी ठिपके दिसतात.

See also  IRCTC टूर पॅकेज माहिती Best IRCTC Tour Packages

मॉलिब्डेनम

कार्ये —

१) आवश्यक तांबे किंवा जस्तापेक्षाही खूपच कमी प्रमाणात आहे.

२)अमिनो आम्ले व प्रथिने तयार होत असताना नत्राचे प्रथम अमोनिअममध्ये क्षपण घडवून आणणाऱ्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक.

कमतरता लक्षणे —

१) पानांच्या कडा गुंडाळल्या जाऊन पाने वाळून जातात.

२) पानांच्या वरच्या भागावर पिवळ्या रंगाच्या पट्या दिसून येतात.

३) काड्यांची लांबी व जाडी कमी होते.

फवारणीसाठी उपयुक्त सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खत

  • सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खताची उसाच्या पानांवर फवारणी केल्यास अधिक प्रभावी परिणाम दिसून येतो.
  • उसाच्या पानांवर मुख्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केल्यामुळे खताची पिकाला उपयुक्तता वाढते.पानातील आवश्यक अन्नद्रव्यांचे प्रमाण योग्य होते. परिणामी मुळांद्वारे आवश्यक अन्नद्रव्यांचे शोषणसुद्धा वाढते. ऊस उत्पादनावर चांगला परिणाम होतो.
  • आपल्या भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता मानस उद्योग समूहाने ऊस पिकाकरिता अमीनो बूस्टर हे मानवी केसापासुन निर्मित अमीनो एसिड युक्त द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य माफक दरात उपलब्द करून दिले आहे.
  • जे उसाच्या पानाचा हिरवेगार पणा टिकवून ठेवते ज्यामुळे अन्न तयार करण्यास मदत होऊन ऊसाचे उत्पादन वाढते. या द्रवरूप खताच्या उसाच्या पानांवर दोन फवारण्या कराव्यात.
  • या सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त द्रवरूप खतात लोह(२.५ टक्के), मॅंगेनीज(१.० टक्के), जस्त(३.० टक्के), तांबे (१.० टक्के), मॉलिब्डेनम (०.१ टक्के) आणि बोरॉन (०.५ टक्के) ही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत.
  • अमिनो बुस्टर द्रवरूप खताच्या दोन फवारण्या केल्यास प्रति हेक्टरी ८ ते १० टन ऊस उत्पादनात वाढ झालेली दिसून आली आहे. यासाठी लागवडीनंतर किंवा खोडवा राखल्यानंतर ६० दिवसांनी अमिनो बुस्टर  प्रति एकरी २ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी लागवडीनंतर किंवा खोडवा राखल्यानंतर ९० दिवसांनी प्रति एकरी ३ लिटर प्रति ३०० लिटर पाण्यात मिसळून करावी.

* कोणतीही इतर रसायने द्रवरूप खतात मिसळू नयेत.

* क्षारयुक्त किंवा चोपण जमिनीत आणि चुनखडीयुक्त जमिनीत सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि शोषण कमी होते. अशावेळी अमिनो बुस्टर या द्रवरूप खताची फवारणी फायदेशीर ठरते.

See also  शमीच्या वृक्षाचे तसेच शमीपत्राचे महत्व तसेच फायदे कोणते आहेत? -Importance Prosopis Cineraria Shami Plant

मानस उद्योग समूह निर्मित अमिनो बुस्टर हे आपल्या भागातील मानस उद्योग समूहाच्या कृषी विभागाच्या सर्व गट कार्यालयात उपलब्ध आहे.

संकलन:- अनंत जुगेले,
 कृषी अधिकारी
Master of Agriculture Science (Agronomy )

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा