NIFTY 50 ची ओळख – NIFTY 50 complete information in Marathi
आपण नेहमी वर्तमानपत्रात तसेच बातम्यांमध्ये ऐकत असतो की निफ्टी मध्ये एवढया टक्कयांनी आज वाढ झालेली पाहावयास मिळाली तसेच निफ्टी आज एवढया अंकांनी खाली घसरलेला पाहावयास मिळाला.
तेव्हा आपल्या सगळयांच्या मनात निफ्टी विषयी विविध प्रश्न निर्माण होत असतात.हे निफ्टी काय असते?यात कधी वाढ तर कधी घसरण का होत असते?निफ्टी मध्ये वाढ झाल्यावर काय होते?घसरण झाल्यावर काय होत असते?
आपल्या मनातील ह्याच प्रश्नांची आज आपण सविस्तर उत्तरे जाणुन घेणार आहोत.जेणेकरून आपल्या मनात निफ्टीविषयी कुठलीही शंका राहणार नाही.
Nifty 50 इतिहास – घटक आणि महत्व – Nifty 50 history, Importance
भारतीय शेअर बाजारात सेंसेक्स (सेंसेक्स बद्दल माहिती करता इथे क्लिक करा ) आणि निफ्टी असे दोन प्रमुख निर्देशांक आहेत. -ज्यात बाँम्बे स्टाँक एक्सचेंजचा निर्देशांक सेंसेक्स असलेला आपणास पाहायला मिळतो. तर निफ्टी हा नँशनल स्टाँक एक्सचेंजचा निर्देशांक असलेला आपणास पाहायला मिळतो.
मागील एका लेखात आपण सेंसेक्स विषयी जाणुन घेतले होते.आता आपण निफ्टी विषयी जाणुन घेऊया.
निफ्टी 50 ची मुख्य वैशिष्टे – Major characteristic of NIFTY 50
निफ्टी हा (national stock exchange) म्हणजेच एन -एस-ईचा प्रमुख निर्देशांक म्हणुन ओळखला जातो.
• निफ्टीचा आरंभ हा 21 एप्रिल 1996 मध्ये करण्यात आला होता.
• निफ्टी बेस तारीख – नोव्हेंबर 1995
• निफ्टी वॅल्यू – 1000
• निफ्टी 50- गुंतवणूक परतवा – 1 वर्ष – 25.59% आणि 5 वर्षात – 17.57 %
निफ्टी 50 ची मूलभूत वैशिष्ट्यपूर्ण मुद्दे – Fundamentals of Nifty 50
• Dividend Yield -1.19
• P/E म्हणजे price to earnings ratio – 24.11
• P/B – Price to Book Ratio 4.37
निफ्टी 50 मुख्य10 घटक – Top constituents by weightage of NIFTY 50
1) रिलायन्स
2) इन्फोसिस
3) एचडीएफसी हाऊसिंग
4) एचडीएफसी बँक
5) आयसीआय
6) टीसीएस
7) कोटक बँक
8) लार्सन टुब्रो
9) एचसीएल
10) आयटीसी
निफ्टी ह्या शब्दाची निर्मिती
• नँशनल स्टाँक एक्सचेंज आणि फिफ्टी ह्या दोन शब्दांपासुन झाली आहे.निफ्टी मध्ये नँशनल स्टाँक एक्सचेंज मधील पन्नास कंपन्या समाविष्ट असतात.
• निफ्टी मध्ये ज्या पन्नास कंपन्या समाविष्ट आहेत.त्यांचे निकष देखील सेन्सेक्स प्रमाणेच असलेले आपणास दिसुन येतात.
• निफ्टी मध्ये जेवढया कंपन्या समाविष्ट आहेत त्यांची यादी दर सहा महिन्याने नवीन तयार केली जाते.
• म्हणजे समजा निफ्टी मधील कंपन्यांच्या यादीतील एखादी कंपनी ठरलेल्या निकषांसाठी पात्र ठरत नसेल तर त्या कंपनीला यादीतुन बाहेर काढले जाते.आणि तिच्या जागी एका नवीन कंपनीचा समावेश त्यात केला जातो.
• निफ्टीचा आरंभ करण्यात आला तेव्हा निफ्टीचा सुरूवातीचा अंक फक्त हजार होता पण आता तोच अंक सोळा हजारच्या देखील पुढे गेलेला आपणास दिसून येतो.
• आणि निफ्टीला आपला हा हजारपासुन सोळा हजारच्या पुढे जाण्याचा प्रवास पुर्ण करण्यासाठी 25 ते 26 वर्षाचा कालावधी लागला होता.
• निफ्टी हा एक निर्देशांक आहे जो शेअर बाजारात चालू असलेली तेजी आणि मंदी म्हणजेच शेअर बाजाराची आर्थिक स्थिती दर्शवण्याचे काम करतो.निफ्टीमध्ये आपल्याला भारतातील शेअर बाजाराची सध्याची स्थिती काय आहे हे कळत असते.
• जेव्हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपनींच्या शेअर्सच्या किंमतीत वाढ होते तेव्हा निर्देशांकात (निफ्टीमध्ये) देखील वाढ होत असते.
• पण जेव्हा निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण होत असते तेव्हा निर्देशांकात(निफ्टीमध्ये) देखील घसरण झालेली आपणास पाहायला मिळते.
• म्हणजेच बातम्यांमध्ये जेव्हा आपण असे ऐकत असतो शेअर बाजारात आज वाढ झाली आहे.किंवा आज शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली तेव्हा त्या वाढ आणि घसरणचा अर्थ निर्देशांकात झालेली वाढ किंवा घसरण असा होत असतो.
• निर्देशांकात जेवढयाही कंपन्यांचा समावेश केला जात असतो त्या कंपन्यांना आपल्या क्षेत्रातील नामांकित तसेच दिग्दज कंपनी म्हणुन ओळखली जात असते.
निफ्टी 50 म्हणजे काय ? What is Nifty 50
निफटी फिफ्टी म्हणजे एक 50 शेअर चा वैविध्यपूर्ण असा एक निर्देशांक असून तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या महत्वपूर्ण क्षेत्रातल्या 50 सर्वोत्तम कंपनीच्या समावेशा ने तयार केला जातो.
म्हणजेच आईटी, फार्मा, ऑटोमोबाईल ,टेलिकॉम फायसनान्स ,ऑइल व गॅस , बांधकाम व मेटल अश्या विविध क्षेत्रातील कंपनीचा अभ्यास करून 50 शेअर कंपनी म्हणजेच निफ्टी 50 यादी वेळोवेळी ठरवली जाते. काही कंपनी या यादीतून काढल्या जातात तर काही यात नव्याने समाविष्ट केल्या जातात
निफ्टीमध्ये पुढील क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश होत असतो :
1. माहीती आणि तंत्रज्ञान क्षेत्र(
2. फायनान्शिअल सर्विसेस
3. फार्मा
4. मेटल्स -धातू
5. कंझ्युमर गुडस
6. आँटोमोबाईल
7. पेस्टीसाईड -फर्टिलायझर एनर्जी
8. टेलिकम्युनिकेशन्स
9. सीमेंट – बांधकाम .
10. ऑइल आणि गॅस
निफ्टीमध्ये कोणकोणत्या कंपनी समाविष्ट आहेत? List of companies involved in Nifty 50
- निफ्टीमध्ये नँशनल स्टाँक एक्सचेंजमधील लिस्टेड असलेल्या दोन ते तीन हजार पेक्षा अधिक कंपन्यांमधून फक्त पन्नासच आर्थिक दृष्टया प्रबळ अशा कंपन्यांची निवड केली जाते.
- आणि ह्या कंपन्या कुठल्याही एका क्षेत्रातील नसुन विविध क्षेत्रातील असतात.त्यामुळे बाजारात संतुलन राखण्यास मदत होत असते.
- निफ्टीमध्ये एकुण पन्नास विविध क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे आणि त्या पन्नास कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत:
STOCK LIST करता खलील लिंक करावी
Nifty 50 stock list – निफ्टी 50 शेअर स्टॉक ची यादी
Nifty चे फायदे कोणकोणते असतात? How useful is Nifty 50
Nifty चे पुढीलप्रमाणे फायदे असतात:
• ऩँशनल स्टाँक म्हणजेच एन एस ई कशा पदधतीने काम करतो आहे आपणास हे निफ्टी मुळे कळत असते.
• शेअर मार्केटमध्ये कुठे तेजी चालु आहे कुठे मंदी आहे कोणत्या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होते आहे तसेच कोणत्या कंपनीचे शेअर्स घसरत आहेत हे निर्देशांकावरून म्हणजेच निफ्टीवरून कळत असते.
• आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशा पदधतीने कार्य करते आहे हे देखील आपणास जाणुन घेता येते.
Nifty मध्ये ज्या 50 कंपन्या निवडल्या जातात -निकष ? – How stock selected inn Nifty 50
• निफ्टीमध्ये नँशनल स्टाँक एक्सचेंमधील विविध बँका,अर्थतज्ञांचा समावेश असलेल्या निर्देशांक समितीकडुन ज्या 50 कंपन्या निवडल्या जातात त्या पुढील निकषावर आधारीत निवडल्या जात असतात:
• निफ्टीमध्ये अशी कंपनी निवडली जाते जिचे शेअर्स शेअर मार्केटमध्ये सगळयात जास्त खरेदी तसेच विक्री केले जात आहे.
• कंपनीचे मार्केट कँपिटलायझेशन हे एन एस ईच्या मार्केट कँपपेक्षा 50 ट्के पेक्षा अधिक जास्त असायला हवे.
• निवडल्या जात असलेल्या कंपन्या वेगवेगळया क्षेत्रातील आणि आपल्या क्षेत्रातील दिग्दज आणि नामांकीत कंपन्या असायला हव्यात.
Comments are closed.