चालू घडामोडी – Current Affairs in Marathi 22 January
रोजच्या – ताज्या घडामोडी – वाचण्या करता करता इथे क्लिक करा
मनिपूर,मेघालय,त्रिपुरा यांचा राज्यत्व दिवस :
दरवर्षी मनिपुर,मेघालय,त्रिपुरा ही राज्ये 21 जानेवारी रोजी राज्यत्व दिवस साजरा करत असतात.या राज्यांची स्थापणा ईशान्य क्षेत्र पुर्नरचना कायद्याअंतर्गत केली गेली होती.
मणिपुर त्रिपुरा ही संस्थाने 1949 मध्ये भारतात समाविष्ट झाली होती.यानंतर यांना 1972 मध्ये केंद्रशासित प्रदेश म्हणून दर्जा देखील देण्यात आला होता.
दिल्ली वन स्टाँप ई व्हेईकल वेबसाईटस :
दिल्ली सरकारकडुन नुकतीच इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन करण्यासाठी वन स्टाँप वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.
ह्या वेबसाईटचे नाव ev.delhi.gov.in असे आहे.ही वेबसाईट उत्पादक,खरेदीकर्ता आणि चार्जिग स्टेशन एक्सप्लोअरसाठी खुली करण्यात आली आहे.
सदर वेबसाईटची वैशिष्टये पुढीलप्रमाणे आहेत :
- ईव्ही सर्च
- ईव्ही कँल्क्युलेटर
- ईव्ही डँशबोर्ड
ह्या वेबसाईट मधुन आपणास चार्जिगविषयी पायाभुत सुविधा आणि इतर संभाव्यतेविषयी माहीती प्राप्त होते.
भारत करणार माँरिशसमधील प्रकल्पात मदत :
नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माँरिशसमध्ये विविध प्रोजेक्टची सीरीज सुरू केली आहे.आणि ह्या प्रोजेक्टच्या अंमलबजावणीसाठी भारत शेजारील देशांना मदत देखील करणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी माँरिशिअसमधील समकक्ष प्रविंद जगनाथ यांच्या हस्ते ह्या प्रकल्पाचा शुभारंभ देखील करण्यात आला आहे.
अमर जवान ज्योती एकीकरण :अ मर जवान ज्योती बुजवण्यात आल्याचा दावा नुकताच केंद्र सरकारकडुन फेटाळुन लावण्यात आला आहे.
यातील सरकारने प्रतिपादीत केलेले महत्वाचे मुददे पुढीलप्रमाणे आहेत :
- अमर जवान ज्योती राष्टीय युदध स्मारकात ज्योती येथे विलिन करण्यात आले आहे.आणि हे विलिनीकरण घडुन आल्याने देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांना त्यांच्या बलिदानाला साजेशी श्रदधांजली प्राप्त होणार आहे.असे केंद्र सरकारचे मत आहे.
UNCTAD चा अहवाल (2021 मध्ये भारतात FDI 26 टक्कयांनी घसरला) :
युएन काँन्फरन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट(un conferrence trade and develpment) च्या इन्व्हेस्टमेंट ट्रेंड माँनिटरने असे प्रकाशित केली आहे की 2020 च्या तुलनेत 2021 सालात भारतात एफ डी आय मध्ये 26 टक्कयांनी घट झाली आहे.
2020 मध्ये भारतातील एफडीआयची नोंद ही USD 64 अब्ज केली गेली होती.
तुहीन ए सिन्हा आणि अंकिता वर्मा लिखित द लेजंड आँफ बिरसा मुंडा नावाचे पुस्तक करण्यात आले प्रकाशित :
महाराष्टाचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या हस्ते तुहीन ए सिन्हा आणि अंकिता वर्मा या दोघांनी लिहिलेल्या द लेजंड आँफ बिरसा मुंडा ह्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले आहे.
ह्या पुस्तकात आदीवासी नायक बिरसा मुंडा यांची शौर्यगाथा दिलेली आहे.बिरसा यांनी आदीवासी समाजाला आपला हक्क मिळवून देण्यासाठी कसा धेर्याने लढा दिला हे पुस्तकात दिलेले आहे.
आदीवासी समाजाला बिरसा मुंडा यांनी कसे एकत्र केले कसे धर्मातर करण्याला विरोध केला आणि कसे आपल्या समाजाला न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याच्या संघर्षात त्यांनी आपले प्राण गमावले हे ह्या पुस्तकात सांगितले आहे.
जेरी हे जम्मु काश्मीरमधील पहिले दुधाचे गाव म्हणुन करण्यात आले घोषित :
जम्मु आणि काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात प्रशासनाकडुन रियासी ह्या जिल्हया मधील जेरी वस्ती हे केंद्रशासित प्रदेशातील पहिले दूधाचे गाव म्हणुन घोषित केले आहे.
आणि दुग्ध विकास योजने अंतर्गत ह्या गावासाठी अजुन 57 डेअरी फाँर्म मंजुर देखील केले आहेत.
370 गायींसोबत 73 वैयक्तिक डेअरी युनिक असलेल्या ह्या गावातील स्थानिक शेतकरी वर्गाला आर्थिक सुरक्षा प्राप्त होणार आहे.
त्रिपुराने साजरा केला 44वा कोकबोरोक डे :
कोकबोरोक डेला त्रिपुरी भाषेचा दिवस म्हणुन ओळखले जाते.
कोकबोरोक भाषेचा विकास करण्याच्या हेतूने प्रत्येक वर्षी 19 जानेवारी रोजी भारतातील त्रिपुरा राज्यात हा दिवस साजरा केला जात असतो.
1979 मध्ये कोकबोरोक,बंगाली इंग्रजी ह्या भाषा राज्य सरकारने भारतातील त्रिपुरा राज्यातील अधिकृत भाषा म्हणून घोषित केल्या आहेत.
सारा गिल बनल्या पाकिस्तानच्या पहिल्या transgender doctor :
नुकत्याच सारा गील ह्या पाकिस्तानच्या ट्रांसजेंडर डाँक्टर बनल्या आहेत.सारा गिल ह्यांनी कराची येथील जिन्ना मेडिकल अँण्ड डेंटल काँलेज मधुन एमबीबीएसचे अंतिम वर्ष उत्तीर्ण केले आहे.
सारा गिल ह्या पाकिस्तान येथील किन्नर साठी काम करत असलेल्या एनजीओ शी देखील संबंधित आहेत.
जगातील सर्वात प्रसिदध नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर :
नुकतेच (America best morning consult polytical agency) ने जगभरात एक सर्वेक्षण केले आहे.
ज्यात जगातील सर्वात प्रसिदध नेत्यांच्या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 71 टक्के रेटिंगसोबत
पहिल्या क्रमांकावर आहेत.
जगातील सर्वात अधिक रेटिंग असलेल्या नेत्यांची नावे पुढीलप्रमाणे :
- नरेंद्र मोदी (भारत,71 टक्के)
- लोपेज ओब्रेडाँर(66 टक्के मँक्सिको)
- मारियो द्रागी (इटली 60 टक्के)
- फुमियो किशिदा (जपान 48 टक्के)
- ओलाफ शोल्ज(जर्मनी 44 टक्के)
- जो बाईडेन (अमेरिका 43 टक्के)
- जस्टीन टुडो( कँनडा 43 टक्के)
- स्काँट माँरिसन (आँस्ट्रेलिया 41 टक्के)
- पेंदरो सांजेज(स्पेन,40टक्के)
- मुन जे ईन (दक्षिण कोरिया,38 टक्के)
- जेअर बोल्सोनारो(ब्राझील 37 टक्के)
- अँमानूएल मँक्रो(फ्रांस,34 टक्के)
- बोरिस जाँन्सन(युनायटेड किंगडम,26टक्के)
आरबी आयने लागु केला डिजीटल पेमेंट निर्देशांक:
आरबी आयने 19 जानेवारी 2022 रोजी डिजीटल पेमेंट निर्देशांक लागु केला आहे.
ह्या निर्देशांकानुसार देशात डिजीटल पेमेंट मध्ये मार्च 2021 च्या तुलनेत सप्टेंबर 2021 मध्ये 40 टक्कयांनी अधिक वाढ झाली आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये आँनलाईन देवाणघेवाणीचा निर्देशांक 306.06 इतका होता. मार्च 2021 मध्ये हेच प्रमाण 270.59 एवढे होते.सप्टेंबर 2020 मध्ये आँनलाईन देवाणघेवाणीचा निर्देशांक 217.74 होता.
बृहस्पती प्रमाणे लावण्यात आला एका नवीन विशाल ग्रहाचा शोध : TOI 2180 B
नुकतीच नासा ह्या अंतराळ संशोधन संस्थेतुन एका वैज्ञानिकाने पृथ्वीपासुन 379 प्रकाशवर्ष दुर एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे.जो सुर्याप्रमाणे एका तारयाच्या अवतीभोवती फिरतो आहे.
ह्या ग्रहाचे नाव TOI 2180 B असे ठेवण्यात आले आहे.
TOI 2180 B हा बृहस्पती ग्रहापेक्षा तीन टक्के अधिक मोठा आहे.पण याचा व्यास बृहस्पती ग्रहासारखाच आहे.म्हणजेच हा बृहस्पती पेक्षा अधिक घनदाट आहे.
तापमानाचा विचार केल्यास TOI 2180 B चे बृहस्पती शनी तसेच सौरमंडळा बाहेरील इतर ग्रहांच्या तुलनेत अधिक तापमान आहे.
आंध्र प्रदेश सरकारने शंभर वर्ष जुन्या चिंतामणी नाटकावर आणली बंदी :
17 जानेवारी 2022 रोजी आंध्र प्रदेश सरकारने शंभर वर्ष जुन्या चिंतामणी पद्य नाटकावर बंदी आणली आहे.
ह्या नाटकावर बंदी ही काही विशिष्ठ समाजातील लोकांनी ह्या तेलगु नाटकातील काही डायलाँग आणि कँरेक्टर्सच्या चित्रणाबाबद आक्षेप व्यक्त केल्यावर ह्या नाटकावर बंदी घातली गेली आहे
गुंतवणुकदारांना गुंतवणूकीचे शिक्षण देण्यासाठी सेबीने लाँच केले सारथी अँप :
गुंतवणुकदारांना गुंतवणूकीचे शिक्षण देण्यासाठी सेबीने नुकतेच एक अँप लाँच केले आहे ज्याचे नाव सारथी असे आहे.
या अँपचे उददिष्ट हे आहे की शेअर बाजारात गुंतवणुकीच्या मुलभुत संकल्पणेविषयी गुंतवणुकदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी.
यात आपल्याला बाजारात झालेला विकास ,केवाईसी प्रोसेस तसेच गुंतवणुकीच्या विविध तक्रारींचे निवारण कसे करावे हे देखील गुंतवणुकदारांना कळणार आहे.
फ्लीपकार्टने सुरू केला स्टार्ट अप प्रोग्रँम लीप :
भारतातील सर्वात मोठया ई काँमर्स वेबसाईटच्या नावाने ओळखल्या जात असलेल्या फ्लीपकार्टने आपले पहिले स्टार्ट अप प्रोग्रँम लीप लाँच केले आहे.
ह्या अँपला लाँच करण्यामागे फ्लिपकार्टचे उददिष्ट भारतातील स्टार्ट अपला मदत करणे हे आहे.
ह्या प्रोग्रँमदवारे फ्लीपकार्ट दोन प्रोग्रँम लागु करणार आहे.
1)FLIN(flipkart leap innovation network)
2) FLA(flipkart leap a head
लीप हे आधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करत असलेल्या स्टार्ट अप मध्ये गुंतवणुक करणार आहे.याचसोबत हे अशा स्टार्ट अपमध्ये देखील गुंतवणुक करणार आहे जे कंपनीसाठी प्राधान्य असलेल्या नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे होणार देशातील सेनेचे उपप्रमुख :
18 जानेवारी 2022 रोजी भारत सरकारने सेनेचे पुर्व कमांडर लेफ्टनंट जनरल यांना उप थलसेना प्रमुख म्हणुन नियुक्त करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे.
मनोज पांडे हे लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती यांची जागा घेणार आहे जे 31 जानेवारी रोजी निवृत्त होत आहेत.
दिलीप संघांनी यांची इफकोच्या नवीन चेअरमनपदी निवड :
दिलीप संघांनी यांची इफकोच्या(IFFCO) – Indian farmer fertilizer co ltd च्या नवीन चेअरमनपदी निवड झाली आहे.इफकोच्या निर्वाचित निर्देश मंडळाने सगळयांच्या सहमताने
दिलीप संघानी यांची इफकोच्या सतराव्या अध्यक्षपदी निवड केली.याआधी दिलीप संघानी इफकोचे वाईस चेअरमन म्हणुन काम करत होते.