आरोग्य विमा – आजारांचे कव्हरेज ? Common Health Insurance Exclusions in Marathi
हेल्थ इंशुरन्स पाँलिसीमध्ये अनपेक्षित वैदयकीय आणीबाणीच्या खर्चाचा देखील समावेश केला जात असतो.
पण यात कोणकोणत्या आजाराचे निदान करण्यासाठी आपल्याला कव्हरेज दिले जाते आणि कोणत्या आजारांसाठी कव्हरेज दिले जात नाही.याच्या देखील इंशुरन्स कंपनीने ठेवलेल्या काही अटी तसेच नियम असतात.
आणि ह्या सर्व अटी नियम माहीत नसल्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींसाठी आरोग्य विमा काढणे अधिक क्लिष्ट ठरत असते.
हे आपण एका उदाहरणादवारे समजुन घेऊया
- एक पंचवीस वर्षाची महिला होती तिला मैत्रीणींसोबत पार्टी करायची खुप सवय होती.ज्यात ती नेहमी दारूचे सेवण करायची तसेच धुम्रपान देखील करायची.
- आणि अतिमदयपान आणि धुम्रपान केल्यामुळे त्या महिलेची प्रकृती एकेदिवशी अचानक खालावली आणि तिला उपचारासाठी दवाखान्यात अँडमीट करण्यात आले.
- मग डाँक्टरांनी त्या महिलेची वैदयकीय तपासणी केल्यावर त्यांना असे आढळुन आले की त्या महिलेच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण अधिक आहे ज्यामुळे तिच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती देखील कमी झाली आहे.
- आणि याचमुळे तिच्या शरीरातील प्लेटलेटस पांढरया आणि लाल पेशी बदलत असतात.दवाखान्यात जेवढाही उपचाराचा खर्च लागणार होता त्यासाठी ती महिला हेल्य इंशुरन्स पाँलिसीवर अवलंबुन होती.पण हेल्थ इंशुरन्स कंपनीकडुन तिचा क्लेम नाकारण्यात आला.
- आणि ह्यामुळे ती अल्कोहोलचे सेवण करणारी महिला खुप निराश आणि हतबल झाली कारण दवाखान्यातील उपचाराचा खर्च भरता येईल एवढे पैसे तिच्याकडे नव्हते.
- आणि ज्या हेल्थ इंशुरन्स पा़ँलिसीवर ती तिच्या मेडिकल ट्रिटमेंटसाठी अवलंबुन होती.त्यात ड्रग्ज,अल्कोहोल,धुम्रपान इत्यादी मादक व्यसनांमुळे होणारया आजारांचा तसेच आरोग्यविषयक समस्यांचा समावेश केलेला नव्हता.
त्यामुळे त्या महिलेला कुठलाही दवाखान्याचा खर्च प्राप्त झाला नाही आणि तिला सर्व दवाखान्याचा खर्च स्वताच्या सेव्हिंग्जमधुन करायची वेळ आली.
जसा प्रकार ह्या एका महिलेसोबत घडला तसा आपल्यासोबत घडु नये म्हणुन प्रत्येक पाँलिसी धारकाने हेल्थ इंशुरन्समध्ये कोणकोणते आजार कव्हर केले आहेत?कोणते आजार कव्हर केले गेले नाहीयेत.याची एकदा शहानिशा करून घ्यायला हवी.
आपल्याला हेल्थ इंशुरन्समध्ये कोणते आजार कव्हर केले जात नाहीत याचा अंदाज प्राप्त होण्यासाठी आजच्या लेखात आपण Health insurance policy मध्ये ज्या रोगांचे निदान केले जात नाही अशा सर्व रोगांविषयी जाणुन घेणार आहोत.
Health insurance policy – कोणत्या आजारांचे कव्हरेज नसते ? List of Diseases Not Covered Under Health Insurance
Insurance development of India कडुन नियमांचे कडक पालन करण्यासाठी आरोग्य विमा पाँलिसीमधील काही आजारांना कव्हरेज मधुन वगळण्याचे प्रमाणीकरण केले आहे.
1)जन्मजात आजार /अनुवांशिक रोग
congenital disease आणि genetic disorder :
जन्मजात आजार तसेच इतर कुठलाही अनुवांशिक रोग जो आपणास आपल्या वंशपरंपरेने तसेच जन्मापासुन जडलेला असतो अशा आजारांचे निदान हेल्थ इंशुरन्स पाँलिसीमध्ये केले जात नसते.
उदा,कमजोर हदय अतिरीक्त त्वचा निर्मिती इत्यादी.
2) काँस्मँटिक शस्त्रक्रिया (cosmetic surgery ):
बोटॉक्स,फेसलिफ्ट,स्तनतसेच ओठ वाढवणे, राइनोप्लास्टी इत्यादीसारख्या कॉस्मेटिक सर्जरी ह्या व्यक्तीचे सौंदर्य आणि शारीरिक गुणधर्मात वाढ करण्याचे मार्ग असतात.
पण जीवणाचा दर्जा राखण्यासाठी शरीराचे कार्य सुनिश्चित करायला हे अपरिहार्य मानले जात नसतात.म्हणुन हेल्थ इंशुरन्स कव्हरेज मधून यांना देखील वगळण्यात आले आहे.
3) अल्कोहोलचे प्राशन करणे,धुम्रपान करणे consumption of alcohol,smoking :
अशा आरोग्याच्या समस्या ज्या अल्कोहोलचे,धुम्रपानाचे तसेच इतर मादक पदार्थांचे सेवण केल्याने निर्माण होत असतात अशा आजारांना तसेच आरोग्यविषयक समस्यांना देखील हेल्थ इंशुरन्स कव्हरेज मधुन वगळण्यात आले आहे.
उदा,तोंडाचा कँन्सर,यकृत खराब होणे,ब्राँकायटिस इत्यादी.
4) IVF तसेच वंधत्व उपचार :
IVF आणि वंधत्व उपचार यात खुप मोठया रक्कमेच्या खर्चाचा समावेश असतो.त्यामुळे हेल्थ इंशुरन्स कंपनी आपल्या पाँलिसीमध्ये फक्त इतर अपघात वगैरे सारख्या छोटया मोठया वैदयकीय खर्चाचे कव्हरेज पाँलिसी धारकांना प्रदान करत असतात.
5) गर्भधारणा उपचार(pregnancy treatment) :
आरोग्य विमा पॉलिसीमध्ये सिझेरियन विभागातील गुंतागुंतीमुळे गर्भधारणेशी संबंधित इतर कोणत्याही उपचारांचा समावेश केला जात नसतो.
6) ऐच्छिक गर्भपात (voluntary abortion :
भारताने गर्भपात सेवांवर प्रतिबंध लावण्यासाठी काही कायदे तयार केले आहेत.म्हणुन ऐच्छिक गर्भपाताचा खर्च देखील आरोग्य विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट केला जात नाही.
7) आधीपासुनचे आजार (preexisting illness) :
आरोग्य विमा पॉलिसीमध्ये अशा कुठल्याही शस्त्रक्रिया किंवा रोगांचे निदान कव्हर केले जात नाही ज्याची लक्षणे प्रथम 30 दिवसांच्या आत उद्भवत असतात किंवा हेल्थ इंशुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी अस्तित्वात असतात यालाच प्रतीक्षा कालावधी म्हणून देखील ओळखले जाते.
8) स्वताच स्वताला करून घेतलेली एखादी जखम तसेच दुखापत (self inflicted injury) :
आरोग्य विमा पॉलिसीमध्ये स्वताच्या आत्म-प्रयत्नांमुळे किंवा स्वताचा जीव संपवण्यासाठी केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नांमुळे झालेल्या कुठल्याही इजा तसेच दुखापतीचे कव्हरेज तसेच निदान केले जात नाही.
9) प्रसारीत रोग(transmitted disease) :
आपल्या भारत देशामध्ये खुपच मर्यादित आरोग्य विमा पाँलिसी उपलब्ध आहेत त्यातच एच आय व्ही सारख्या लैंगिक संक्रमणामुळे होणारया रोगावर केले जाणारे उपचार आयुष्यभरासाठी,दिर्घकालीन आणि खुप खर्चिक,महागडे असतात.
म्हणुन हेल्थ इंशुरन्स पा़ँलिसीत अशा संक्रमित रोगांचे कव्हरेज तसेच निदान केले जात नाही.
10) कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्यात आलेली इतर निदाने :
युदध,दंगल अण्वस्त्र हल्ला तसेच संप यामुळे झालेल्या दुखापतींसाठी हॉस्पिटलायझेशन खर्च हे आरोग्य विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट केले जात नाहीत आणि हे कायमस्वरूपी अपवाद देखील मानले जात असतात.
11) Health supplement :
आपल्याला आरोग्य विमा पॉलिसी अंतर्गत, विमा कंपनी हेल्थ टॉनिक्स आणि सप्लिमेंट्ससाठी कुठलेही आर्थिक संरक्षण देत नसते पण जर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी याबाबत शिफारस केली असेल तर आपण विमा धारक भरपाई खर्चासाठी दावा करू शकतो.
परंतु आपण ते कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय घेत असु तर ते पॉलिसी कव्हरेजचा भाग असणार नाही.
Comments are closed.