दही आणि योगर्टमधील नेमका फरक काय आहे – Difference Between Curd And Yogurt In Marathi
दही आणि योगर्ट हे दोघेही दुधापासुन तयार होणारे पदार्थ आहेत.आणि हे दोघेही डेअरीमध्ये उपलब्ध होणारे पदार्थ आहेत.
ह्या दोघांची चव देखील एकसमानच असते.ज्यामुळे आपल्यातील खुप जणांना असे देखील वाटते की दही आणि योगर्ट हे दोन वेगवेगळे पदार्थ नसुन एकच आहेत. आपल्यातील खुप जणांचे असे देखील मत आहे की भारतात दहीला कर्ड म्हटले जाते.आणि योगर्ट असे अमेरिकेत दहीला म्हटले जाते.
दही योगर्ट हे दोन वेगळे पदार्थ आहेत.फक्त यांच्यात साम्यता एवढीच आहे की हे दोघेही दुधापासुन तयार केले जाणारे पदार्थ आहेत.
आणि दुध डेअरीमध्ये हे दोघे पदार्थ सोबतच विक्रीस असलेले आपणास दिसुन येत असतात.ज्यामुळे हे दोघे पदार्थ एकच आहेत हे आपणास वाटत असते.आणि असे वाटणे साहजिक देखील आहे.
म्हणून आजच्या लेखात आपण काही अशा महत्वाच्या मुददयांवर प्रकाश टाकणार आहोत ज्याने आपल्याला हे व्यवस्थित समजुन जाईल की दही योगर्ट हे दोन वेगळे पदार्थ आहेत.एक नाहीत.
चला तर मग मित्रांनो जाणुन घेऊया दही आणि योगर्ट या दोघांमध्ये काय फरक आहे.
कर्ड म्हणजे काय? -Curd Meaning In Marathi
कर्ड या एक इंग्रजी शब्द आहे.ज्याचा मराठीत दही असा अर्थ होत असतो.
योगार्ट म्हणजे काय?- Yogurt Meaning In Marathi, What Is Yogurt In Marathi
योगार्ट हे सुदधा दहीप्रमाणेच एक Dairy मध्ये उपलब्ध होणारे एक Milk Product आहे. जे दही प्रमाणेच दुधापासुनच बनवले जात असते.पण हा एक अलग पदार्थ आहे ज्याची बनवण्याची पदधत देखील खुपच अलग आहे.
आज बाजारात पाहायला गेले तर वेगवेगळया फ्लेव्हरमध्ये योगार्ट हे उपलब्ध असलेले आपणास दिसुन येते.
दही आणि योगार्ट या दोघांमध्ये कोणते साम्य आहे?-Similarities Between Curd And Yogurt In Marathi
● दही खालल्याने आपल्या शरीराला थंडावा प्राप्त होत असतो.शरीराला उष्णता कमी होते.म्हणूनच डाँक्टर देखील उन्हाळयात दही खाण्याचा सल्ला प्रत्येक पेशंटला देत असतात.
● योगार्टमधील प्रथिनांचे प्रमाण फार अधिक असते.म्हणुनच याला उच्च प्रथिनेयुक्त फुड असे म्हणतात.
● दहीमध्ये ज्या प्रकारे भरपुर व्हीटँमिन आणि मिनरल्स असतात त्याचप्रमाणे योगार्टमध्ये सुदधा भरपुर प्रमाणात व्हिटँमिन अणि मिनरल्स असतात.
● अधिक वय वाढल्यानंतर आपणास वृदधाल्पकाळात जे संधिवाताचे विकार जडत असतात त्यावर दही आणि योगार्ट दोघेही खुप फायदेशीर ठरत असतात.आणि सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे दही खालल्याने आपली हाडे आणि दात मजबूत राहत असतात कारण दहीमध्ये फाँस्फरस आणि कँल्शिअम विपुल प्रमाणात असते.
दही आणि योगर्ट या दोघांमध्ये काय फरक आहे? -Difference Between Curd And Yogurt In Marathi
दही आणि योगर्ट या दोघांमध्ये पुढील काही महत्वाचे फरक आहेत- Yogurt Vs Curd In Marathi
दही आणि योगर्ट हे दोघेही दोन पदार्थ(Dairy Milk Product) आहेत जे दुधापासुनच बनवले जात असतात पण यांची दोघांची बनवण्याची पदधत वेगळी आहे.
● दही ही आपण विरजन टाकुन घरीच बनवू शकतो.आणि दही ही नैसर्गिक अँसिडीक घटक टाकुन घरीच बनवली जात असते.
योगर्ट हे कृत्रिम अँसिडीक घटक टाकुन बनवले जात असल्याने आणि हे बनवण्यात बरीच प्रोसेस आणि वेळ लागत असल्या कारणाने हे घरी बनविणे आपणास शक्य होत नसते.
● दहीमध्ये Lactobacillus Bacterium असते ज्याला Lactic Acid Bacteria असे देखील म्हटले जाते.जे 30-40 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये वेगाने पसरत असते आणि काही तासांच्या आत सर्व दूधाचे दहीमध्ये परिवर्तन करून टाकत असते.
तर योगर्टमध्ये Lactobacillus Bulgaricus Streptococcus Thermophilus यासारख्या बँक्टेरियांचा जिवंत स्ट्रेन असलेला आपणास दिसुन येतो.म्हणजेच या दोघांचा वापर योगर्ट बनवण्यासाठी केला जात असतो.
● दही बनवण्याचे उददिष्ट घरगुती वापर हे असु शकते तर योगार्ट बनवण्याचे उददिष्ट व्यवसाय हे असु शकते.
● दही बनवायला गाईचे,म्हशीचे,बकरीचे,मेंढीचे दुध वापरले जाते तर योगार्ट बनवायला गाईचे,म्हशीचे,बकरीचे,मेंढीचे,घोडीचे दुध वापरले जात असते.
● दही ही चवीला योगार्टपेक्षा जास्त आंबट असते.आणि योगार्ट हे चवीने आंबटगोड असे असते.
● एक वाटी दहीमध्ये 60 कॅलरीज असतात आणि ग्रीक दहीच्या एका वाटीत 100-125 इतक्या कॅलरीज असतात.ग्रीक नॉन-फॅट दहीमध्ये सुमारे 65 कॅलरीज असतात.
प्रोबायोटिक योगार्ट म्हणजे काय?-Probiotic Yogurt Meaning In Marathi
- जेव्हा जिवंत जीवाणूंना एखाद्या गोष्टी म्हणजेच एखाद्या खाद्य पदार्थामध्ये योग्य प्रमाणात आणि योग्य रीतीने मिसळले जात असते.तेव्हा त्यास प्रोबायोटिक योगार्ट असे म्हणतात.
- आता प्रोबायोटिक्सही बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जात आहेत. त्यामुळे लोकांमध्ये असा एक संभ्रम निर्माण झाला आहे की, आता ही नवी बला काय आहे?
- प्रोबायोटिक दही ही जिवंत बॅक्टेरियापासून बनवली जात असते. जो सर्वांधिक बलवान असते. हे खाल्ल्यानंतर ते आपल्या पोटातील अँसिड सोबत लढत असते आणि आतड्यांना जिवंत करत असते.
- यामुळे आपल्या आतडया मजबूत होतात आणि आपले शरीर देखील नेहमी निरोगी राहत असते.
ग्रीक योगार्ट म्हणजे काय?(Greek Yogurt Meaning In Marathi)
- ग्रीक योगार्ट हे दहीपेक्षा खुप जाड असते आणि यात प्रथिने देखील खुप अधिक प्रमाणात असतात.
- ज्यामुळे वर्कआउट करणारे,व्यायाम करणारे व्यक्ती याला अधिक पसंती देत असतात.
- ग्रीक योगार्टमध्ये दही पेक्षा कमी साखर असते.एक कप ग्रीक योगार्टमध्ये 25 ग्रॅम इतकी प्रथिने असतात तर दहीत 15 ग्रॅम प्रथिने असतात.
- दहीमध्ये ग्रीक योगार्टपेक्षा अधिक दुप्पट प्रमाणात कॅल्शियम असते.साध्या दहीमध्ये 50% कॅल्शियम असते आणि ग्रीक योगार्टमध्ये 24% कॅल्शियम असते.