जागतिक संगीत दिवस याविषयी माहीती -World music day information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

जागतिक संगीत दिवस याविषयी माहीती -World music day information in Marathi

मित्रांनो आज जगात असा अशा मोजक्याच आणि बोटावर मोजण्या इतक्याच व्यक्ती आढळुन येतील ज्यांना संगीत आवडत नाही.

कारण जगभरात सगळयांनाच संगीताची गाण्याची नितांत आवड आहे.एखादे सुमधुर आणि चांगले संगीत कानावर ऐकु आले की मन कसे प्रफुल्लित होऊन जात असते.

आज जे व्यक्ती नैराश्य,तणाव,चिंता अशा परिस्थितीतुन जात आहे त्यांना यातुन बाहेर पडण्यासाठी संगीताची मदत होत असते.

आज आपल्या जीवनाचे कुठलेच असे क्षेत्र नाही जिथे संगीताला महत्व नाही.रूग्णालयातील रूग्णांना बरे करण्यासाठी देखील आज म्युझिक थेरपीच कामाला येते आहे.

एवढेच काय तर कुठलाही आनंदाचा क्षण साजरा करायला आपण पहिले म्युझिक लावत असतो.मग ती एखादी बर्थ डे,सेलिब्रेशन पार्टी असो किंवा लग्न समारंभ असो.

एवढी महत्वपुर्ण भुमिका आज संगीत आपल्या जीवणात पार पाडते आहे.हेच आपल्या जीवणातील संगीताचे महत्व भुमिका जगाला कळावी म्हणुन एक विशेष दिवस दरवर्षी जगभरात साजरा केला जातो तो दिवस म्हणजे जागतिक संगीत दिवस.

आजच्या लेखात आपण ह्याच जागतिक संगीत दिनाविषयी अधिक सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

ज्यात आपण हा दिवस कधी आणि का साजरा केला जातो?कसा साजरा केला जातो?हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास काय आहे?इत्यादी सर्व काही आपण जाणुन घेऊया.

चला तर मग मित्रांनो सुरूवात करूया आपल्या आजच्या मुख्य विषयाला.

See also  आर्थिक समावेशन म्हणजे काय?- Financial inclusion meaning in Marathi

जागतिक संगीत दिवस कधी आणि केव्हा साजरा केला जातो?

जागतिक संगीत दिवस दरवर्षी संपूर्ण जगभरात 21 जुन रोजी साजरा केला जातो.

जागतिक संगीत दिवस का साजरा केला जातो?

आपल्या जीवणात संगीताची किती मोठी आणि मोलाची भुमिका आहे?किती अधिक महत्व आहे?हे जगातील सर्व लोकांना समजावून सांगण्यासाठी,त्यांना संगीताचे महत्व आणि फायदे पटवून देण्यासाठी दरवर्षी हा जागतिक संगीत दिवस साजरा केला जातो.

जागतिक संगीत दिवस कसा साजरा केला जातो?

21 जुनला दरवर्षी जागतिक संगीत दिवसाच्या दिनी अनेक ठिकाणी संगीत प्रेमींसाठी फ्री म्युझिक काँन्सर्टचे आणि संगीताच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जगात सर्वात प्रथम संगीत दिवस कधी आणि कोठे साजरा करण्यात आला होता?

जागतिक संगीत दिवसाचा इतिहास –

जगात सर्वात पहिले संगीत दिवस हा फ्रान्स ह्या देशामध्ये 21 जुन 1982 साली साजरा करण्यात आला होता.फ्रान्स ह्या देशात ह्या दिवसाला फेटे डेला म्युसिकु या नावाने देखील संबोधिले जाते.

फ्रान्स ह्या देशामधील फेमस म्युझिक डायरेक्टर माँरीश फ्लेरोट यांनी तेथील सांस्कृतिक विभागाकरीता हा दिवस साजरा करावयास आरंभ केला होता.

जागतिक संगीत दिवस कोणकोणत्या देशात साजरा केला जातो?

दरवर्षी जागतिक संगीत दिवस हा फ्रान्ससमवेत भारतात,ब्रिटनमध्ये,जर्मनीमध्ये,अर्जेटिना,लक्झेमबर्ग इत्यादी देशांमध्ये देखील दरवर्षी साजरा केला जातो.

आपल्या दैनंदिन जीवणात संगीताचा उपयोग कोठे कोठे केला जातो?

आपल्या जीवणातील संगीताचे महत्व –

मुडफ्रेश करण्यासाठी आपण संगीत ऐकत असतो.

जेव्हा आपण रागात असतो नैराश्याने ग्रस्त होऊन ताणतणावात आणि चिंतेत असतो तेव्हा आपण रिलँक्स होण्याकरीता संगीत ऐकत असतो.

बरयाच रूग्णालयात आता रूग्णांना बरे करण्यासाठी संगीताचा म्हचजेच म्युझिक थेरपीचा आधार घेतला जातो कारण संगीत ऐकल्याने आपले शरीर हलके होते,आणि आपल्याला एकदम रिलँक्स फिल होत असते.

कुठलाही आनंदाचा तसेच दुखाचा क्षण साजरा करताना आपण पहिले म्युझिक लावत असतो.मग ती एखाद्याची बर्थ डेची पार्टी असो किंवा एखादी सेलिब्रेशन पार्टी किंवा लग्न समारंभ असो.

See also  १ ऑक्टोबर २०२४ पासुन सर्व वाहनांकरीता वाहन फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य केले जाणार - vehicle fitness certificate latest update in Marathi

देवाची आराधना पुजा अर्चना करताना देखील आपण म्युझिकचा वापर करत असतो.

खुप जण संगीतामधुन गायन करून संगीताचे श्रवण करून आपल्या भावना व्यक्त करत असतात म्हणजेच आपल्या भावना देखील संगीतादवारेच व्यक्त केल्या जात असतात.

संगीतामधुन आपणास प्रेरणा उर्जा प्राप्त होते.

तज्ञांकडुन सांगण्यात आलेले संगीताचे काही आरोग्यदायी फायदे –

1)काही तज्ञांचे असे म्हणने आहे की जर आपणास मायग्रेनची समस्या असेल तर अशा वेळी सुमधुर आणि संगीत ऐकल्याने आपली डोकेदूखी कमी होण्यास मदत होते.कारण संगीत ऐकल्याने आपला माईंड शांत आणि रिलँक्स होत असतो.

2) संगीताचे श्रवण केल्याने आपल्या स्मरण शक्तीत वाढ होण्यास मदत होते.

3) जर आपल्या हदयांच्या ठोक्यांमध्ये वाढ झाली रक्त दाब वाढला असेल अणि अशा परिस्थितीत आपण सुमधुर संगीत ऐकले तर याने आपली बाँडी रिलँक्स होण्यास मदत होत असते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा