निबंध – तरूणाईमध्ये वाढत्या व्सनाधिनतेची कारणे परिणाम आणि त्यावरील उपाय – Addiction causes , effects and Treatment

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

निबंध – तरूणाईमध्ये वाढत्या व्सनाधिनतेची कारणे परिणाम आणि त्यावरील उपाय – Essay – Addiction causes , effects and Treatment

आज तरूणांमध्ये व्यसन करण्याचे प्रमाण हे दिवसेंदिवस अधिकच वाढु राहिले.आज प्रत्येक शाळेत जाणारया मुलांपासुन ते महाविद्यालयात शिकत असलेला तरूण वर्ग देखील आज सर्रासपणे गुटखा,तंबाखु सिगारेट,विडी,दारू,गांजा अशी वाईट व्यसने करताना आपणास दिसुन येतो.

यामागची कारणे काय आहेत तरूणपिढी आज एवढया अधिक प्रमाणात नशेच्या आहारी का जाते आहे?हे जाणुन घेणे आता खुपच आवश्यक झाले आहे.

कारण याशिवाय आपण ह्या वाईट व्यसनांना आळा घालुच शकत नाही.

म्हणुन आजच्या लेखात तरूणांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेली व्यसनाधीनता तिचे कारण,तिचे तरूणांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्यावर होणारे वाईट परिणाम आणि त्यावर आपण करावयाचे उपाय याविषयी आपण जाणुन घेणार आहोत.

व्यसनाधीनता म्हणजे काय?

व्यसनाधीनता म्हणजे एखाद्या वाईट व्यसनाच्या पुर्णपणे आहारी,अधिन जाणे.त्यावर पुर्णपणे अवलंबिले जाणे म्हणजे व्यसनाधिनता होय.

व्यसनाधीनतेची कारणे कोणकोणती आहेत?

तरूणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाधीनतेची काही प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत-

1)शारीरीक आणि मानसिक ताणतणाव –

तरूणांमध्ये व्यसन करण्याचे प्रमुख हे एखादा मानसिक ताणतणाव असणे हे आहे.मग यात घरात झालेला एखादा वादविवाद,भांडण असु शकते.

ह्याच मानसिक ताणतणावाचे कारण उद्याच्या भविष्याची चिंता देखील असु शकते.किंवा अभ्यासाचे परीक्षेचे टेंशन पालकांच्या अपेक्षांचा दबाव सुदधा असु शकते.किंवा एखादा मानसिक आघातामुळे देखील तरूण तरूणी व्यसनाच्या आहारी जात असतात.

किंवा मनात एखाद्या बाबतीत असलेली भीती,नैराश्य आणि उदासिनतेची एकटेपणाची भावना हे देखील व्यसनाधिनतेचे कारण असु शकते.

2) व्यसनाधीन मित्र मैत्रीणींची संगत –

See also  डाँ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे 29प्रेरणादायी विचार कोटस - Apj Abdul Kalam 29 Inspirational Quotes And Thoughts In Marathi

बहुतेक तरूण तरूणींना व्यसन करण्याची लत ही वाईट व्यसन करत असलेल्या मित्र मैत्रीणींच्या संगतीत सान्निध्यात राहुन लागत असते.

कारण असे मित्र मैत्रीण बळजबरी आपणास त्यांच्यासोबत राहण्यासाठी व्यसन करायचा आग्रह करीत असतात.ज्याने आपण देखील हे व्यसन करू लागतो आणि आपल्यास याची सवय जडते.

3) खोटी सामाजिक प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करणे –

काही तरूण तरूणी समाजात आपली प्रतिष्ठा उच्च राखण्यासाठी आपण किती श्रीमंत,उच्च प्रतीचे,माँर्डन आणि कुल आहोत हे सिदध करण्यासाठी देखील विडी सिगारेट दारू हे पैशाची उधळुन करणारे शरीराची नासाडी करणारे व्यसन करीत असतात.

व्यसनाधिनतेचे होणारे वाईट परिणाम कोणकोणते आहेत?

● अशी व्यक्ती पुर्णपणे ड्रग अँडिक्डेड म्हणजेच व्यसनाधीन होऊ लागते आपल्या व्यसनांवर अवलंबुन जीवण जगु लागते.आणि आपले व्यसन पुर्ण करण्यासाठी कुठल्याही हिंसक थराला जाऊ शकते.एखाद्याला हानी पोहचवू शकते,आपले व्यसन पुर्ण करण्यासाठी गुन्हेगारी मार्गाचा अवलंब करू शकते.

● अशा व्यक्तीच्या वैयक्तिक सामाजिक आणि कौटुंबिक जीवणावर देखील याचा परिणाम होत असतो.त्याच्या व्यसनामुळे त्यांच्या परिवारजणाला देखील त्रास करावा लागत असतो.

● आशा व्यक्तीचे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य देखील चांगले राहत नाही.

● आशा व्यक्तीच्या झोपेवर,आठवणींवर तसेच भावनेवर देखील त्याच्या व्यसनाचे वाईट परिणाम होऊ लागतात.अशा व्यक्तींमध्ये नैराश्यता,ओदासिन्य निर्माण होऊ लागते.

● कुठलेही काम त्याला पुर्ण एकाग्रतेने करता येत नाही.

● वेळ असताच अशा व्यक्तीवर उपचार केले गेले नाहीत तर त्याचा जीव देखील जाण्याची दाट शक्यता असते.

● व्यसनाधीन व्यक्ती आपले व्यसन पुर्ण करण्यासाठी आपल्या आर्थिक परिस्थीतीचा विचार न करता महागडे व्यसन करू लागते.ज्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते.

उदा, ड्ग्ज,गांजा,चरस,अफु

● अशी व्यक्ती कोणात मिळत मिसळत नाही नेहमी एकटे राहत असते.

व्यसनाधिनतेवर आळा घालण्यासाठी आपण करावयाचे उपाय –

● समाजात अंमली मादक पदार्थाचे जे सेवण केले जात आहे त्याविषयी विविध सामाजिक प्रसारमाध्यमांदवारे जनजागृती करायला हवी. लोकांना खासकरून तरूणांना व्यसनाधीनता आपल्या आरोग्यासाठी जीवणासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी किती वाईट आहे हे समजावून सांगायला हवे.

See also  चंद्रयान ३ च्या लॅडिंग करीता २३ आॅगस्ट हीच तारीख का निवडण्यात आली? Why was 23 August the date chosen for Chandrayaan 3's landing

● व्यसनाधीन व्यक्तींमधील व्यसनाधीनता थांबवण्यासाठी त्यांना व्यसनापासुन दुर करण्यासाठी आपण समुपदेशनाचा आधार घेऊ शकतो.किंवा व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन देखील त्यांचे वाईट व्यसनाची लत सोडवू शकतो.

● समाजातील व्यसनाचे वाढते प्रमाण थांबवण्यासाठी अंमली पदार्थाची तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने कडक कायदा तयार करायला हवा.जेणे मादक पदार्थाची तस्करी करणे आणि त्यांचे सेवण करणे ह्या दोघे गोष्टी आटोक्यात येतील.

● व्यसनाधीन व्यक्तीचा एकटेपणा दुर करण्यासाठी त्याला आपण विविध सामुहिक कार्यात खेळात सहभागी करायला हवे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा