लोकमान्य टिळक निबंध अणि भाषण – Lokmanya Tilak essay and speech in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

लोकमान्य टिळक निबंध अणि भाषण – Lokmanya Tilak essay and speech in Marathi

मित्रांनो दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये लोकमान्य टिळक यांची जयंती 23 जुलै रोजी मोठया उत्साहाने अणि आनंदाने साजरी केली जात असते.

यादिवशी सर्व काँलेज तसेच शाळांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.ज्यात निबंध लेखन स्पर्धा अणि वादविवाद,भाषण स्पर्धा विशेषकरून ठिकठिकाणी राबविल्या जात असतात.

आज आपण लोकमान्य टिळक यांच्याविषयी सविस्तरपणे माहीती आजच्या लेखातुन जाणून घेणार आहोत.

जेणेकरून आपणास ह्या माहीतीचा,यामधील मुददयांचा आधार घेऊन लोकमान्य टिळक यांच्यावर भाषण देखील करता येईल अणि निबंध देखील अत्यंत सहजपणे लिहिता येईल.

लोकमान्य टिळक यांची जयंती 2022 मध्ये कधी साजरी केली जाईल?

लोकमान्य टिळक यांची जयंती 2022 मध्ये 23 जुलै रोजी आहे.

लोकमान्य टिळक कोण होते?

लोकमान्य टिळक भारताच्या स्वातंत्र्य लढयाचा एक अत्यंत महत्वाचा भाग असणारे एक थोर स्वातंत्रय सेनानी तसेच जहालवादी राजकीय कार्यकर्ता,पत्रकार विचारवंत,समाजसुधारक होते.

लोकमान्य टिळक यांचा थोडक्यात परिचय –

स्वराज्य हा माझा जन्मसिदध हक्क आहे अणि तो मी प्राप्त करणारच ही सिंहगर्जना करून देशातील जनतेला स्वातंत्र्यासाठी लढण्याचा मंत्र लोकमान्य टिळक यांनीच दिला होता.

लोकमान्य टिळक हे बालपणापासुनच एकदम चाणाक्ष बुदधीचे होते.टिळकांना लहानपणापासुनच अन्याय करणे अणि अन्याय सहन करणे किंवा अन्याय होताना पाहणे आवडत नसे त्यांना याची अत्यंत चीड होती.

See also  द्रौपदी मुर्मू के बारे में जानकारी - Draupadi Murmu Information In Hindi

अत्यंत कमी वयात त्यांच्या डोक्यावरून आईवडीलांचे छत हरपले.

त्यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण आपल्या गावातच पुर्ण केल्यानंतर बी ए चे शिक्षण करण्यासाठी त्यांनी पुणे येथील डेक्कन काँलेज मध्ये प्रवेश घेतला.बी ए सोबत त्यांनी एल एलबी देखील प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली होती.

तिथेच त्यांची भेट ओळख आगरकरांशी झाली अणि त्या दोघांनी मिळुन मराठा अणि केसरी ही दोन वर्तमानपत्र चालू केले.केसरी हे मराठीतील अणि मराठा हे इंग्रजी भाषेमधील वृतपत्र होते.

ज्यातुन त्यांनी लोकांमध्ये इंग्रजांविषयी जागृती करण्याचा प्रयत्न केला.लोकांना स्वातंत्रयाचे महत्व आपल्या लेखणीतुन पटवून देण्याचा प्रयत्न केला.

लोकमान्य टिळक यांनी सदैव ब्रिटीशांच्या अन्याय अत्याचाराचा विरोध केला,केसरी मराठा ह्या दोघा वृतपत्राच्या दवारे लेखन करीत आपल्या जहालवादी विचारांंना लोकांसमोर परखडपणे मांडुन त्यांच्या जहालवादी मताचा विचारांचा जनतेत प्रचार प्रसार केला.

सर्व हिंदु लोकांना संगठीत करता यावे सर्व हिंदु धर्मीय एकत्र यावे जनतेत ऐक्याची देशभक्तीची भावना निर्माण व्हावी याचकरीता लोकमान्य टिळक यांनीच शिवजयंती अणि गणेशोत्सव हे सण साजरा करायला आरंभ केला होता.

लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जहालवादी लेखनामुळे इंग्रज सरकारने अनेकदा तुरंगात देखील टाकले.त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात येऊन अटक देखील करण्यात आली होती.

अशाच एका मंडाले येथील तुरूंगामध्ये कारावास,शिक्षा भोगत असताना त्यांनी एका ग्रंथाचे लेखन केले.ज्याचे नाव गीतारहस्य असे होते.

लोकमान्य टिळक हे आपल्या शेवटच्या श्वासापर्यत देशाची सेवा करीत राहिले.लोकमान्य टिळक यांचे जीवणाचे मुख्य उददिष्ट हे देशाला स्वातंत्रय प्राप्त करून देणे अणि स्वावलंबी बनविणे हे होते.

याकरीता लोकमान्य टिळक यांनी देशात राबवण्यात आलेल्या स्वदेशी अभियानात भाग घेऊन सर्वत्र स्वदेशीचा प्रचार प्रसार केला.अणि परदेशी माल वस्तुंवर बहिष्कार टाकला.त्याची जाळुन होळी केली.

पुण्यात वास्तव्यास असताना त्यांनी अनेक सामाजिक कार्ये केली ज्यात त्यांनीभारतीय जनतेस भारतीय संस्कृतीचे भाषेचे शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी न्यु इंग्लिश स्कुलची,डेक्कन एज्युकेशन सोसायटी अणि फर्गुसन काँलेजची स्थापणा केली.

See also  दहा प्रेरणादायी स्त्रियांविषयी माहीती- 10 Inspiring Women Information In Marathi

याव्यतीरीक्त लोकमान्य टिळक यांनी विधवा विवाहाला पाठिंबा दिला अणि बालविवाहास कडेकोट विरोध दर्शवला.

लोकमान्य टिळकांनी ब्रिटीश सरकारविरूदध लिहिलेला जहालवादी अग्रलेख-

सरकारचे डोके ठिकाण्यावर आहे काय?

लोकमान्य टिळक यांना कोणत्या नावाने ओळखले जाते?

लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक ह्या नावाने ओळखले जाते.

लोकमान्य टिळकांचा जन्म कधी अणि कोठे झाला?

लोकमान्य टिळक यांचा जन्म हा 23 जुलै रोजी 1856 मध्ये रत्नागिरी जिल्हयामधल्या एका चिखली नावाच्या छोटयाशा गावात एका ब्राहमण घराण्यात झाला होता.

लोकमान्य टिळक यांचे संपुर्ण नाव काय होते?

लोकमान्य टिळक यांचे संपुर्ण नाव बाल गंगाधर टिळक असे होते.

लोकमान्य टिळक यांच्या वडिलांचे अणि आईचे नाव काय होते?

लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव पावर्तीबाई असे होते तर वडिलांचे नाव गंगाधर असे होते.

लोकमान्य टिळक यांच्या वडीलांचा व्यवसाय –

लोकमान्य टिळकांचे वडील गंगाधर हे व्यवसायाने एक शिक्षक होते.म्हणुन टिळक यांना गणित,संस्कृत,मराठी इत्यादी विषय घरातुनच उत्तमरीत्या शिकावयास मिळाले.

लोकमान्य टिळक यांचा विवाह –

लोकमान्य टिळक यांचा विवाह मँट्रीकचे शिक्षण पुर्ण करत असताना सत्यभामा नावाच्या मुलीशी झाला होता

लोकमान्य टिळक यांचा मृत्यु कधी अणि कोठे झाला होता?

देशासाठी लढता लढता लोकमान्य टिळक यांनी वीरगती प्राप्त झाली अणि यांचा मृत्यु 1 आँगस्ट रोजी 1920 मध्ये झाला.

 

लोकमान्य टिळक प्रेरणादायी कोटस अणि विचार,पुण्यतिथी अभिवादन- Lokmanya Tilak thought and quotes in Marathi

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा