श्रावण महिन्यात मांसाहाराचे सेवण का करु नये? – Shravan food guide

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

श्रावण महिन्यात मांसाहाराचे सेवण का करु नये?

मित्रांनो आपल्या सर्वानाच चांगले माहीत आहे की श्रावण हा महिना महादेवाला सर्वात अधिक प्रिय असणारा महिना आहे.

अणि श्रावण महिना हा पावसाळा ह्या त्रतुमध्ये येत असतो.श्रावण महिन्यात मांसाहार करण्यास वज्य केले जात असते.घरातील वडीलधारे व्यक्ती देखील श्रावण महिन्यात मांस मच्छी अंडे काहीही खाऊ नका असे बजावून सांगत असतात.

अणि घरातील लहान मंडळी हा आदेश पाळत देखील असतात.महिनाभर ते मांसाहाराचे सेवण करत नसतात.कारण कुठेतरी त्यांनी देखील ऐकलेले असते की श्रावण महिना शंकराच्या उपासनेचा व्रत वैकल्याचा पवित्र महिना आहे.म्हणुन आपण ह्या महिन्यात मांसाहार करायचे नाही.

पण याव्यतीरीक्त काही अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे आपण श्रावण महिन्यात मांसाहाराचे सेवण करू नये.

आजच्या लेखात आपण हीच कारणे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

श्रावण महिन्यात मांसाहाराचे सेवण का करु नये?याची कारणे कोणकोणती आहेत?

1)पावसाळयात आजुबाजुचे सर्व वातावरण हे पाऊस पडल्याने दमट अणि ओलेचिंब झालेले असते.

अणि अशा वातावरणात उघडयावरचे अन्नपदार्थ खाणे हे साक्षात रोगाला आमंत्रण देणे असते.

कारण पावसाळयात सुर्यप्रकाश कमी असतो अणि हवामानामध्ये आद्रता अधिक असते.यामुळे कुठल्याही उघडयावरील पदार्थ जसे की मांस वगैरे इत्यादी उघडयावरचे अन्नपदार्थ लवकर खराब होत असतात.ते अन्न कुजुन जात असते.त्यावर पावसाळयात बँक्टेरिया अधिक जलदगतीने वाढत असतात.

अणि अशातच आपण हेच उघडयावरील अन्नपदार्थ पदार्थ,खाल्ले तर आपण फुड पाँईझन होऊन आजारी देखील पडु शकतो.

2)पावसाळयामध्ये हवामानात आद्रतेचे प्रमाण खुपच जास्त असल्याने याचा विपरीत परिणाम आपल्या पचनसंस्थेवर देखील पडत असतो.अणि आपली पचनसंस्था ही ह्या कालावधीत कमकुवत होऊ लागते.

अणि अशातच आपण मांस मच्छी अंडे असे मांसाहारी पदार्थ खाल्ले तर ते लवकर पचत देखील नाहीत.अणि आपली पचनशक्ती कमजोर असल्याने आपण खाल्लेले मांसाहारी अन्न पचत नाही ते आतच सडु लागते.अणि आपले शारीरिक आरोग्य स्वास्थ्य बिघडत असते.

See also  एव्हियन फ्लू - Avian Influenza or Bird Flu information in Marathi –

3) पावसाळा हा एक असा त्रतु आहे ज्या कालावधीत अनेक प्राणी सडुन मरत असतात.

कारण पावसाळयामध्ये जमीनीवर किटकांचे प्रमाण अधिक वाढु लागते.अणि हेच किटक तृणधान्याचे सेवण करताना प्राण्यांच्या शरीरात गेले तर याने प्राणी आजारी पडत असतात.अणि त्याच आजारी प्राण्याचे मांस मानवाने खाल्ले तर मानव देखील आजारी पडत असतो.

4) पावसाळयात जड अन्न लवकर पचत नसते अणि तरीही पावसाळयात आपण जड अन्न पदार्थ खाल्ले तर आपल्या आतडया सडु शकतात म्हणुन आपण पावसाळयात मटण,मांसे,अंडी असे जड अन्न न खाता हिरवा भाजीपाल्याचा आहारात अधिक समावेश करायला हवा.

5) श्रावण हा महिना प्रेम अणि प्रजननाचा काळ मानण्यात येतो.म्हणजे या कालावधीत पशु पक्षी तसेच जनावरांमध्ये गर्भधारणा होत असते.

अणि कोणत्याही गर्भवती जीवाची हत्या करणे हे हिंदु धर्मामध्ये खुप मोठे पाप मानण्यात येते.अणि कोणत्याही गर्भवती जीवाला जर खाल्ले तर आपल्या शरीरामध्ये सुदधा अनेक हार्मोनलशी निगडीत समस्या निर्माण होऊ शकतात.

अणि सगळयात महत्वाची बाब म्हणजे श्रावण महिना हा माशांचा प्रजननाचा काळ असतो.अणि अशा कालावधीत जर आपण मासे खाल्ले तर माशांची प्रजाती नष्ट होऊ शकते.

म्हणुन जर आपल्याला वर्षभर मासे खायचे असतील तर श्रावण महिना मध्ये मासे खाणे टाळावे माशांचे व्यवस्थित प्रजनन होऊ द्यावे.

6) श्रावण महिना मध्ये म्हणजे पावसाळयात जर आपण मांसाहाराचे सेवण केले तर आपल्या शरीराचे तापमान देखील वाढत असते.

ज्याचे परिणामस्वरूप आपणास अन्नाचे पचनास अडचणी येतात,हदयाशी संबंधित आजार उदभवतात,अणि शरीर देखील दुखत असते.

श्रावण महिन्यात केस का कापु नये?

मित्रांनो श्रावण महिन्यामध्ये केस कापु नये असे खुप जण म्हणतात.पण असे का म्हटले जाते श्रावण महिन्यात आपणास केस कापायला का मनाई केली जाते हेच आपणास माहीत नसते.

याला कारण आपल्या आपल्या काही धार्मिक श्रदधा आहेत,जुन्या प्राचीन रूढी समजुती आहेत.

See also  जीवनसत्वे आणि खनिजे या दोघांमधील फरक काय आहे? Difference Between Vitamins and Minerals

पुर्वीच्या काळी प्रकाश व्यवस्था उपलब्ध नसायची.सुरक्षित उपकरणांचा अभाव देखील होता.त्यामुळे केस कापत असताना लोकांना ईजा पोहचत असे.अणि श्रावण महिन्यात केस कापले गेले तर ईजा होऊ शकते अणि ईजेवर पु येऊ शकतो.

अणि श्रावण महिना हा पावसाळयाचा कालावधी आहे.या महिन्यात आपणास काही ईजा झाली तर त्या ईजेचा आपणास संसर्ग देखील होण्याची दाट शक्यता असते.

म्हणुन जुन्या रूढी समजुती परंपरेनुसार श्रावण महिन्यामध्ये आपणास केस कापणे वज्य केले जाते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा