शिक्षणासाठी मराठी हा स्पेशल विषय म्हणुन घेण्याचे फायदे कोणकोणते आहेत?-Benefits of career in Marathi literature
खुप जण म्हणतात की मराठीला एवढा स्कोप नाही पाहिजे तेवढया करीअरची संधी यात नाही असे गैरसमज आज मुलांमध्ये निर्माण होत चालले आहेत.
म्हणुन विदयार्थी आपली मातृभाषा मराठी पासुन दुर होत आहे.पाश्चात्य शिक्षणाकडे अधिक वळत आहेत.
आजच्या लेखात आपण मराठीत करिअर केल्यानंतर आपणास नोकरीच्या किती अणि कोणकोणत्या संधी प्राप्त होऊ शकतात.हे सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
जेणेकरून आपल्या मनातील मराठी शिक्षणाबाबतचे सर्व गैरसमज दुर होण्यास मदत होईल.
शिक्षणासाठी मराठी हा स्पेशल विषय म्हणुन घेण्याचे फायदे कोणकोणते आहेत?benefits of career in Marathi literature
मराठीतील करिअरच्या विविध संधी -Career opportunity in Marathi –
पोलीस भरती,तलाठी भरती,तहसिलदार,पोलिस अधिक्षक डेप्युटी कलेक्टर,फाँरेस्ट सर्विस,शासकीय कार्यालयातील इतर विविध पदे यांसाठी घेतल्या जाणारया परीक्षांमध्ये मराठी भाषा अणि व्याकरण अनिवार्य करण्यात आले आहे.
म्हणजेच मराठी स्पेशल विषय घेऊन जर आपण आपले शिक्षण केले तर स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला फायदेशीर ठरत असते.
कारण मराठी भाषा अणि व्याकरण,साहित्य हा विषय अणि यातील अभ्यासक्रम एमपीएससी अणि युपीएससी दोघांमध्ये कंपल्सरी समाविष्ट करण्यात आलेला आहे.
जर आपण मराठी हा विषय स्पेशल घेऊन बी ए ची पदवी पुर्ण केली तर आपण कुठल्याही शाळेत शिक्षक म्हणुन नोकरीला लागु शकतो.
अणि त्यातच जर आपण बीए नंतर बीएडचे शिक्षण पुर्ण केले तर आपणास आठवी ते दहावी पर्यतच्या विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी शाळेत शिक्षक म्हणुन लागता येते.
बी ए नंतर जर आपण मराठीत एम ए अणि बी एड केले तर ज्युनिअर काँलेजमधील अकरावी ते बारावीच्या विदयार्थ्यांना शिकविण्यासाठी आपण शिक्षक म्हणुन लागु शकतो.
अणि समजा बीए नंतर आपण एम ए मराठी करून नेट सेटची परीक्षा दिली अणि त्यात उत्तीर्ण झालो तर आपणास सहाय्यक प्राध्यापक पदावर नोकरी मिळत असते.
सेट मध्ये उत्तीर्ण झाल्यास आपण महाराष्टात कुठल्याही महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणुन नोकरीला लागु शकतो.
अणि नेटमध्ये उत्तीर्ण झालो तर आपण महाराष्टातील अणि महाराष्टाच्या बाहेरील कुठल्याही महाविद्यालयात प्राध्यापक म्हणुन लागु शकतो.
याव्यतीरीक्त आपण बीए मराठी केले असल्यास पत्रकारीता अणि चित्रपट,नाटक,मालिका,विविध सामाजिक प्रसारमाध्यमे ह्यात देखील आपले करिअर करू शकतो.अभिनय,स्क्रीप्ट लेखन,दिग्दर्शन,गायन इत्यादी.
एखाद्या वर्तमानपत्रात नोकरी करू शकतो.बातमीदार बनु शकतो.कंटेट रायटर म्हणुन वेगवेगळया ब्लाँग वेबसाइट न्युज चँनल साठी आर्टिकल लिहिण्याचे काम करू शकतो.
अणि एकदा जर आपल्याला प्रेस मिडियाचा चांगला अनुभव आला तर पुढे जाऊन आपण आपले स्वताचे वर्तमानपत्र,न्युज चँनल सुरू करू शकतो.म्हणजेच संपादक उपसंपादक अशा पदासाठी आपण पात्र ठरत असतो.
याचसोबत आपणास वाचनाची लेखणाची आवड असेल तर आपण साहित्यिक लेखक,कवी,समीक्षक,बनु शकतात.साहित्य क्षेत्रात देखील आपल्याला करिअरची भरपुर संधी आहे.
स्वताचा प्रकाशन व्यवसाय आपणास सुरू करता येतो.विविध प्रकारच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्याचे काम आपण करू शकतो.
मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व असेल तर प्रूफ रीडींगचे काम देखील आपण करू शकतो.
मराठीत करीअर करण्याच्या इतर संधी अणि फायदे-
● मराठी साहित्य हा आपला स्पेशल विषय असल्याने आपण कुठल्याही साहित्यकृतीचे व्यवस्थित आकलन करू शकतो तिचे मुल्यमापन करू शकतो.
● कुठल्याही साहित्य कृती अणि घटना प्रसंगाचे सहज विश्लेषण आपण करू शकतो.
● मराठीत करिअर करून आपल्याला आपल्या मातृभाषेची सेवा करण्याची संधी प्राप्त होत असते.
● भाषा अणि साहित्य यात अधिकाधिक विकास घडुन येण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.
● मराठीत वाचन लेखनासोबत भाषिक संवादकौशल्य अणि आपल्या अभिव्यक्तीक्षमतेचा देखील विकास होत असतो.
● साहित्य संस्कृती मंडळ,राज्य मराठी विकास संस्था इत्यादी ठिकाणी नोकरीला लागुन मातृभाषेची सेवा करता येते.
● अनेक शासकीय खासगी संस्थेमधील मराठी भाषा विषयीच्या विविध संशोधक प्रकल्पात भाग घेता येतो.
● दुरचित्रवाणी आकाशवाणी मध्ये देखील नोकरीच्या अनेक संधी आपणास प्राप्त होतात.आर जे, वृतनिवेदक इत्यादी.
● जाहीरात मसुदा लेखन,जनसंपर्क व्यवहार पब्लिक रिलेशन या क्षेत्रात देखील करिअरच्या अनेक संधी आपणास मराठीत करिअर केल्याने प्राप्त होतात.
● मराठी विषय स्पेशल घेऊन बी लिब कोर्स करून आपण विविध शाळा महाविद्यालयातील ग्रंथालयात ग्रंथपाल म्हणुन नोकरीला लागु शकतो.तसेच एम ए एम लिब केल्यास आपण पुस्तक प्रकाशन संस्थांतील संपादन विभागात नोकरी प्राप्त करू शकतो.
● आरबी आयसारख्या शासकीय तसेच खाजगी क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये ग्रंथपाल तसेच माहीती अधिकारी पदावर नोकरी मिळु शकते.
● सामाजिक संशोधक अणि पर्यटन ह्या क्षेत्रातही करिअरच्या भरपुर संधी आहेत.
● बँक,रेल्वे मध्ये विविध पदांकरीता परीक्षा देऊन बँकिंग तसेच रेल्वे सेक्टरमध्ये नोकरी प्राप्त करू शकतो.
अशा पदधतीने आज मराठी हा विषय स्पेशल घेऊन सुदधा आपण भरपुर नाव,पैसा,प्रसिदधी प्राप्त करू शकतो.जीवणात भरपुर प्रगती करू शकतो.
म्हणुन मित्रांनो कधीच म्हणु नका की मराठीला स्कोप नाही मराठीत सुदधा आज खुप नोकरीच्या संधी आहेत फक्त आपणास त्या शोधता आल्या पाहिजेत
मनात काही करायची ईच्छा असली की करिअरचे मार्ग भेटतातच.फक्त आपण इतरांचे ऐकुन आशा सोडु नये.
निष्कर्ष
शेवटी मला एवढेच सांगावेसे वाटते की जोपर्यत आपण पाण्यात जात नाही तोपर्यत आपण त्या पाण्याचा खोलतेचा अंदाज लावुच शकत नाही.इतरांचे ऐकुण जर आपण घाबरून पाण्यात जाणेच सोडून दिले तर आपल्याला ते पाणी मुळात किती खोल आहे हे कसे समजणार? अणि आपणास एक अनुभव कसा प्राप्त होणार.