एम बी बी एस फुलफाँर्म – MBBS full form in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

एम बी बी एस फुलफाँर्म MBBS full form in Marathi

मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या क्लीनिक मध्ये तपासणीसाठी जातो तेव्हा क्लिनिकच्या बाहेर डाँक्टरच्या नावाचा एक बोर्ड असतो अणि खाली त्या डाँक्टरचे शिक्षण किती झाले आहे त्याने कोणती डिग्री घेतली आहे हे दिलेले असते.

तिथेच एम बी बीएस असे लिहिलेले आपणास पाहायला मिळते.तसेच खुप जणांच्या तोंडुन आपण ऐकत असतो की अमुक डाँक्टर एम बी बीएस झालेला आहे,अमुक व्यक्तीचा मुलगा एमबी बी-एस झाला आहे.

तेव्हा आपल्या मनात प्रश्न निर्माण होत असतो की ही एम बी बीएस डिग्री काय असते?ही डिग्री कोणाला दिली जाते अणि का दिली जाते?एम बी बीएसला प्रवेश कसा घ्यायचा?यासाठी फी किती लागते?एम बी बीएसच्या शिक्षणासाठी एकुण खर्च किती लागतो?इत्यादी माहीती जाणुन घ्यायची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होत असते.

म्हणून आजच्या लेखात आपण एम बी बीएस विषयी संपूर्ण माहीती एकदम सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.

एम बी बी-एसचा फुलफाँर्म काय होतो?MBBS full form in Marathi

एम बी-बीएस चा फुलफाँर्म bachelor of medicine तसेच bachelor of surgery असा होतो.

एम बी बी-एस म्हणजे काय?MBBS meaning in Marathi

आज आपल्यातील प्रत्येक विदयार्थी विदयार्थीनीला इंजिनिअर तसेच डाँक्टर होण्याची ईच्छा असते.

See also  २०२३ मध्ये पीएम किसान योजनेत करण्यात आले खुप मोठे बदल आता सर्वांना योजनेचा लाभ प्राप्त होणार PM KISAN yojana new guidelines in Marathi

एम बी बीएस ही एक पदवी जी वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेणारया व्यक्तीस दिली जात असते.ही पदवी प्राप्त केल्यानंतर आपण समाजात एक डाँक्टर म्हणुन ओळखले जातो.कारण ह्या पदवीस संपुर्ण जगभरात मान्यता प्राप्त आहे.

ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे आहे,डाँक्टर बनण्याची ईच्छा आहे ते ही पदवी प्राप्त करू शकतात.

एम बी बी-एस झाल्यानंतर आपण कुठल्याही गर्वमेंट तसेच प्रायव्हेट हाँस्पिटलमध्ये सुदधा डाँक्टर म्हणुन काम करू शकतो.इथे आपल्यासाठी भरपुर जाँबच्या संधी असतात.

किंवा अनुभव प्राप्त करण्यासाठी काही वर्षे एखाद्या हाँस्पिटलमध्ये काम केल्यानंतर आपण स्वताचे एक वैयक्तिक क्लिनिक हाँस्पिटल देखील स्टार्ट करू शकतो.अणि रूग्णांवर उपचार करू शकतो.

ह्या डिग्रीला भारतासमवेत परदेशात देखील खुप महत्व अणि मान्यता आहे.म्हणुन भारतातच नव्हे तर परदेशात देखील आपण डाँक्टर म्हणुन काम करू शकतो.

एमबी बीएसला प्रवेश- शैक्षणिक पात्रता काय आहे?eligibility criteria for get admission mbbs in Marathi

एम बी बी-एसला प्रवेश देण्याआधी आपली काही शैक्षणिक पात्रता देखील बघितली जाते.

● एम बी एसला प्रवेश घेण्यासाठी किमान आपण 12 वी उत्तीर्ण असायला हवे.अणि आपले बारावीचे शिक्षण सायन्स ह्या क्षेत्रातुन झालेले असावे.ज्यात आपण जीवशास्त्र भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र, हे तीनही विषयी घेतलेले असावेत.

● सर्व विषयात आपणास किमान 50 टक्के गुण असणे फार आवश्यक आहे.

● ज्या विदयार्थ्यांचा समावेश रिझर्व कँटँगरीत होतो अशा विदयार्थींना प्रवेशासाठी बारावीत 45 टक्के गुण असणे आवश्यक असते.

● एम बी बीसला प्रवेश घेणारया विदयार्थीचे किमान वय 18 अणि कमाल वय 25 असावे लागते.

● एम बी बीसचे शिक्षण करण्याकरीता चांगल्या मोठया मान्यताप्राप्त काँलेजात अँडमिशन मिळावे म्हणुन आपणास नीट ही परिक्षा द्यावी लागत असते.ह्या नीट परीक्षेत आपल्याला प्राप्त झालेल्या गुणांनुसार डाँक्टरची पदवी पुर्ण करण्यासाठी मेडिकल काँलेजात अँडमिशन मिळत असते.

● ओबीसी,एस सी,एसटी कँटँगरीमधील विदयार्थ्यांना बारावीमध्ये 40 गुण तर पीडबल्युडी उमेदवारास 45 गुण असावे लागतात.

See also  वाहन फिटनेस प्रमाणपत्र विषयी संपूर्ण माहिती - Vehicle fitness certificate information in Marathi

एमबी बीसची प्रवेश प्रक्रिया कशी असते?

● एमबी बीएसला प्रवेश घेण्याकरीता सर्वप्रथम आपणास बारावी सायन्स क्षेत्रातुन उत्तीर्ण व्हावे लागते.

ज्यात जीवशास्त्र,रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र हे तिघे विषय आपण घेतलेले असावे.सर्व विषयांमध्ये किमान 50 टक्के गुण असायला हवे.जे विदयार्थी रिझर्व कँटँगरीत आहेत त्यांना किमान 45 टक्के गुण असायला हवे.विदयाथ्याचे वय सुदधा 18 ते 25 च्या दरम्यान असावे.

● एमबी बीएसचे शिक्षण करायला मोठया मान्यताप्राप्त विद्यापीठात प्रवेश मिळावा यासाठी आपल्याला बारावी पास असण्यासोबत नीटची परीक्षा देणे सुदधा गरजेचे असते.यात जसे गुण आपणास मिळतात त्यानुसार आपणास गर्वमेंट तसेच प्रायव्हेट काँलेजमध्ये प्रवेश देण्यात येतो.यात जर आपण नीटच्या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त केले तर तेवढे बेस्ट काँलेजमध्ये आपणास अँडमिशन मिळत असते.

काही काँलेजात एमबी बीसला प्रवेश देण्याकरीता विविध परीक्षा आयोजित केल्या जातात.ह्या परीक्षा ए आय आय एम एस,जेआयपी एम ई आर,ए एफ एम सी कडुन केले जात असते.

एम बी बीएस कोर्स पुर्ण करायला किती कालावधी लागत असतो?

एम बी बीएस कोर्स पुर्ण करायला 5.5 वर्ष इतका कालावधी लागत असतो.ज्यात 4.5 वर्ष इतका कालावधी शैक्षणिक शिक्षण देण्यात येते.यानंतर एक वर्ष आपणास इंटर्नशिप करावी लागते.इंटर्नशिप केल्याशिवाय आपणास डिग्री दिली जात नसते.

एम बी बीएसच्या शिक्षणासाठी एकुण किती खर्च लागतो?

एम बी बीएसचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी आपण प्रायव्हेट तसेच गर्वमेंट काँलेज मध्ये अँडमिशन घेऊ शकतो.

आपणास प्रायव्हेट काँलेजमधुन शिक्षण घेण्यासाठी जास्त खर्च लागत असतो.अणि गर्वमेंट काँलेजमध्ये प्रायव्हेट पेक्षा कमी खर्च लागत असतो.

गर्वमेंट काँलेजसुदधा एम बी बीएस करण्यासाठी विपुल प्रमाणात आहेत.ए आय एम एस,आर्मीमधील मेडिकल काँलेज,पण ए आय एम एस काँलेजात एम बी बीएस करायला कमी खर्च लागत असतो.

ए आय एम एस काँलेजात एमबीबीएस करायला आपणास दरवर्षी 1390 रूपये इतका खर्च येतो.अणि आर्मी काँलेज मध्ये एका वर्षासाठी 56600 इतका खर्च आपणास लागत असतो.

See also  आयबी एसए म्हणजे काय?IBSA meaning in Marathi

याचठिकाणी आपण प्रायव्हेट काँलेज निवडले तर तेथील सोयीसुविधा,उच्च शिक्षण पदधत,उच्च पातळीचे दिले जाणारे शिक्षण,या सर्वामुळे इथे जास्त फी आकारली जाते.दरवर्षाला इथे 8 लाख ते 13 लाख इतका खर्च आपणास येऊ शकतो.

एमबी बीएसचे शिक्षण पुर्ण केल्यानंतर आपण कुठे डाँक्टर म्हणुन काम करू शकतो?

● प्रायव्हेट तसेच सरकारी हाँस्पिटल

● प्रायव्हेट क्लिनिक

● एखादे सार्वजनिक आरोग्य केंद्र

● नर्सिग होम

● रिसर्च सेंटर

● मेडिकल काँलेज

● लँब

● बायोमेडिकल फार्मास्युटिकल तसेच बायोटेक्नाँलाँजी कंपनींमध्ये

● विविध सामाजिक संस्था संघटना केंद्र

भारतातील काही अत्यंत प्रसिदध,उत्तम टाँप एमबी बीएस काँलेजची नावे –

● आर्म फोर्स मेडिकल काँलेज, पुणे

● कस्तुरबा मेडिकल काँलेज,मनिपाल

● मौलाना आजाद मेडिकल काँलेज,दिल्ली

● ग्रांट मेडिकल काँलेज,मुंबई

● युनिव्हरसिटी काँलेज आँफ मेडिकल सायन्स,नवी दिल्ली

● ख्रिश्चन मेडिकल काँलेज,वेल्लोरे

● किंग जाँर्ज मेडिकल युनिव्हरसिटी, लखनौ

एमबी बीएस करण्याचे फायदे –

● देशातील सर्व रूग्णांची सेवा करता येते.हे एक देशसेवेचे कार्य आहे.

● समाजात एक उच्च प्रतिष्ठा मान सम्मान मिळतो.

● एमबी बीएस केल्यानंतर आपल्या नावापुढे डाँक्टर ही उपाधी लावली जाते.

MBBS विषयी वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न-

1)एम बी बी एस हा कोणत्या प्रकारचा कोर्स आहे?

एम बी बीएस हा एक बँचलर डिग्री कोर्स आहे.

2) एम बी बी एस डाँक्टरचे वेतन काय असते?

एम बी बी एस डाँक्टरला 10 ते 50 लाख इतके वेतन असते.

3) एमबी बी एसला कोणकोणते विषय असतात?

फस्ट इयर -अँनाँटाँमी,बायोकेमिस्ट्री

सेंकड इयर-कम्युनिटी मेडिसिन,फार्माकाँलाँजी,पँथाँलाँजी,मायक्रो बायोलाँजी,फाँरेन्सिक मेडिसिन,

थर्ड इअर –

कम्युनिटी मेडिसिन,आँप्थँमाँलाँजी,ईण्ट

फोर्थ इअर -फिकियाट्री,डर्मँटाँलाँजी,व्हेनीरीओलाँजी,पिडियाट्रिक्स,अँनेस्थेशियोलाँजी,आँर्थापेडिक्स,आँब्सस्टेट्रिक्स,गायनँकलाँजी

4) एमबी बी एस नंतर करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत?

● न्युराँलाँजिस्ट

● डायटेशियन

● आँब्सटेट्रिशिअन

● कायरोपाँडिस्ट

● डर्मँटोलाँजीस्ट

● एण्टेरोलाँजिस्ट

● गायनँकाँजीस्ट

● आँर्थोपेडिस्ट

● पेडियाट्रिशन

● पँथालाँजिस्ट

● जनरल सर्जन

● कार्डिओलाँजिस्ट

● बँक्टँरिओलाँजीस्ट

● रेडिओलाँजीस्ट

● फिजिओलाँजीस्ट

● फिजिशियन

● हाँस्पिटल अँडमिनिस्ट्रेटर

● साइकँट्रिस्ट

● गँस्टरोइंटरोलाँजीस्ट

● चीफ मेडिकल आँफिसर

इत्यादी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा