वाँरंटी अणि गँरंटी मधील फरक Difference between warranty and guarantee in Marathi
मित्रांनो जेव्हा आपण बाजारात एखादी वस्तु खरेदी करतो तेव्हा ह्या दोन गोष्टी आपण नेहमी आवर्जुन बघत असतो एक म्हणजे गँरंटी अणि दुसरे म्हणजे वाँरंटी.
पण कुठलीही वस्तु खरेदी करताना कशाला अधिक महत्व द्यावा हे कळत नसल्याने आपण वाँरंटीच्या जागी गँरंटीलाच अधिक महत्व देत असतो.
पण खरे पाहायला गेले तर दोघांचेही आपापले वेगळे अणि एक विशिष्ट महत्व असते.
याचसाठी आज आपण वाँरंटी अणि गँरंटी या दोघांमधील फरक समजुन घेणार आहोत.
● वाँरंटी ही एक सुविधा तसेच सुट सवलत असते जी दुकानदार आपल्या दुकानातुन वस्तु खरेदी करणारया सर्व ग्राहकांना देत असतात.
● अणि गँरंटी ही एक हमी असते ज्यात दुकानदार ग्राहकास असे आश्वासन देत असतो की त्याच्या दुकानातील खरेदी केलेली वस्तु दिलेल्या विशिष्ट कालावधीच्या आत खराब झाल्यास तो ग्राहकास ती वस्तु बदलून देईल.
● वाँरंटीमध्ये दुकानदार आपणास वस्तु खराब निघाली तर रिपेअर करून देत असतो पण यात दुकानदार खराब वस्तु प्रोडक्ट रिटर्न घेऊन नवीन वस्तु प्रोडक्ट देण्याची कुठलीही हमी घेत नसतो.
● पण गँरंटीमध्ये दुकानदार आपणास प्रोडक्ट वस्तु खराब निघाली तर रिपेअर करून देत असतो पण समजा ती वस्तु खुप प्रयत्न करूनही रिपेअर होत नसेल तेव्हा तो आपणास खराब वस्तु रिटर्न घेऊन त्याजागी नवीन वस्तु देत असतो.
● वाँरंटीमध्ये दुकानदार माल वस्तु प्रोडक्ट खराब निघाल्यास त्याच्या बदल्यात पैसे रिटर्न रीफंड करत नसतो.
● गँरंटीमध्ये आपली वस्तु प्रोडक्ट खराब निघाल्यास दुकानदार आपले घेतलेले पैसे आपणास रिटर्न रिफंड करत असतो.किंवा त्याजागी दुसरी नवीन वस्तु प्रोडक्ट आपणास देत असतो.
● वाँरंटी अशा मशिनरी प्रोडक्टवर इलेक्ट्रानिक वस्तुवर दिली जात असते जी नैसर्गिकरीत्या कधीही खराब तसेच डँमेज होऊ शकते.जसे की वाँशिंग मशिन,फ्रीज
● गँरंटी ही अशा वस्तु प्रोडक्टची दिली जात असते.जे अत्यंत मजबुत असतात अणि ते खराब तसेच डँमेज देखील होऊ शकत नाही.त्यात कुठलाही यांत्रिक बिघाड होऊ शकत नाही.
● वाँरंटीमध्ये वस्तुच्या वाँरंटीसाठी वस्तु रिपेअर करून घेण्यासाठी खरेदी करणारया ग्राहकाकडुन चार्ज घेतला जात असतो.
● गँरंटीमध्ये वस्तु रिपेअर करण्यासाठी किंवा ती बदलुन घेण्यासाठी ग्राहकाकडुन कुठलाही चार्ज घेतला जात नसतो.पैसे घेतले जात नाही.
● वाँरंटी ही दिर्घकाळासाठी दिली जात असते.याचा कालावधी किमान एक वर्ष इतका असतो.या ठरलेल्या विशिष्ट कालावधीनंतर जर आपण आपली खराब झालेली वस्तु रीपेअर करण्यासाठी दुकानदाराकडे नेली तर दुकानदार ती वस्तु रिपेअर करून देण्याची कुठलीही हमी घेत नसतो.
● गँरंटी ही काही मर्यादित कालावधीसाठी दिली जात असते.समजा दुकानातुन आपण एक वस्तु खरेदी केली ज्या वस्तुची एक वर्षाची गँरंटी दुकानदाराने आपणास दिली आहे पण एक वर्षाच्या आत ती वस्तु जर खराब झाली तर दुकानदाराला ती वस्तु फ्रीमध्ये रिपेअर करून द्यावी लागेल किंवा त्याजागी ग्राहकास म्हणजे आपणास दुसरी नवीन वस्तु द्यावी लागत असते.
● वाँरंटी ही एका विशिष्ट निश्चित कालावधीकरीता असते पण यात आपण वाँरंटी पिरीअडमध्ये थोडीफार वाढ करू शकतो.
● पण गँरंटी पिरीअडमध्ये आपण कधीही वाढ करू शकत नाही.हा एक निश्चित कालावधी असतो.
● दुकानदार हे वाँरंटी जवळजवळ सगळया वस्तुंची देत असतात पण गँरंटी ही फक्त काही मोजक्याच विशिष्ट वस्तुंची देत असतात.
गँरंटी अणि वाँरंटी या दोघांचा लाभ घेण्याकरीता कस्टरमरकडे खरेदी केलेल्या वस्तुचे पक्के बील तसेच गँरंटी अणि वाँरंटी कार्ड असणे गरजेचे असते.
वरील दोघे कागदपत्रे आपल्याकडे उपलब्ध असुनही एखादा दुकानदार त्याच्या दुकानातुन खरेदी केलेली वस्तु रीपेअर करून देण्यास किंवा एक्सचेंज करून देण्यास तयार नसेल तर अशा परिस्थिति मध्ये आपण ग्राहक केंद्रामध्ये म्हणजेच कन्झ्युमर कोर्टमध्ये त्या दुकान दाराविरूदध आपली तक्रार नोंदवू शकतो.
पण एक गोष्ट ग्राहकांनी नेहमी लक्षात ठेवावी कुठलीही वस्तु खराब झाल्यानंतर तिचा गँरंटी पिरीअड संपण्याच्या आधी ती वस्तु दुकानात जाऊन रिप्लेस करून घ्यावी कारण गँरंटी पिरीअड संपल्यानंतर दुकानदार ती वस्तु रिप्लेस करून देत नसतो.