सीबीटीचा फुलफाँर्म काय होतो? -CBT full form in Marathi
शिक्षण अणि परीक्षा ह्या संदर्भात सी बी टी चा फुलफाँर्म computer based training तसेच computer based test असा होत असतो.
अणि मेडिकल क्षेत्रात सीबीटीचा फुलफाँर्म cognitive behavioral therapy असा होत असतो.
सी बी टी म्हणजे काय?cbt meaning in Marathi
CBT full form in education and exam test center –
शिक्षण अणि परीक्षा ह्यांच्या संदर्भातील सीबीटीचा अर्थ कंप्यूटरच्या साहाय्याने कंप्यूटरच्या माध्यमातुन घेतली जाणारी परीक्षा तसेच कंप्यूटरच्या माध्यमातुन दिले जाणारे प्रक्षिक्षण असा होत असतो.
म्हणजे अशी परीक्षा जी कंप्यूटरच्या माध्यमातुन घेतली जाते तिला संगणक आधारीत computer based test असे म्हणतात.याला आँनलाईन टेस्ट असे देखील म्हणतात.
अणि असे प्रशिक्षण जे कंप्यूटरच्या माध्यमातुन दिले जाते त्याला computer based training असे म्हणतात.
सीबीटी टेस्टचे फायदे –
● सीबीटी टेस्ट मध्ये सर्व प्रश्न कंप्यूटर मध्ये अपलोड करून झाल्यानंतर त्या प्रश्नांचा क्रम उलट सुलट करून बदलण्यात येतो जेणेकरून कोणताही विदयार्थी एकमेकाचे उत्तर बघुन उत्तराची नक्कल करू शकणार नाही.
● याचा सगळयात महत्वाचा फायदा म्हणजे प्रश्नपत्रिका फुटणे पेपर लीक होणे असे प्रकार घडुन येत नसतात.कारण कंप्यूटर दवारे प्राँक्टरींग प्रोसेस दवारे सर्व आँनलाईन परीक्षा देत असलेल्या विदयार्थ्यांच्या हालचालीवर यात नजर ठेवली जाते अणि समजा एखादा विदयार्थी संशस्यापद हालचाल करताना काँपी करताना दिसुन आला तर त्याला तीनदा वाँरनिंग देऊन सावध केले जाते.पण तरीही त्याने नक्कल करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा पेपर बंद देखील केला जात असतो.याने विदयार्थीला परीक्षेदरम्यान कुठलीही चिटींग करता येत नाही.अणि बाकीच्या अभ्यास करून पेपर देणारया विदयार्थींवर देखील अन्याय होत नही.
● सीबीटी टेस्टचा अजुन एक फायदा आहे यात कोणत्या विदयार्थीस किती गुण मिळाले आहे विदयार्थी पास आहे की नापास हे शिक्षकांना चटकन कळत असते.कारण यात कंप्यूटरच्या आधारे आपल्या प्रश्नांची उत्तरे काही मिनिटांत चूक आहे की बरोबर हे परीक्षकाच्या समोर येत असते.म्हणजे इथे आँफलाईन परीक्षेत पेपर चेक करण्यात मग शेवटी रिझल्ट घोषित करण्यात जो टाईम शिक्षकांना लागतो तेवढा वेळ लागत नसतो.त्वरीत आपला निकाल कंप्यूटर वर चेक करून लागत असतो.याने शिक्षकांचा वेळ वाया जात नही.
● आँफलाईन मध्ये प्रश्नपत्रिका बनवावी लागते मग तिची प्रिंट काढुन ती कुठेही लीक होणार नही याची काळजी परीक्षकाला घ्यावी लागते.
पण सीबीटी टेस्टमध्ये कंप्युटरच्या माध्यमातुन प्रश्नांचा क्रम बदलून प्रश्नपत्रिका तयार केली जाते.म्हणुन यात पेपर लीक होण्याचा पेपर प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रश्नच उदभवत नसतो.
CBT full form in medical –
जेव्हा एखाद्या व्यक्तीला रूग्णाला काही मानसिक आजार असेल मनोवैज्ञानिक रोग असेल तेव्हा त्याच्यावर उपचार करण्यासाठी जी थेरपी उपचार पदधत वापरली जाते तिला cognitive behavioral therapy असे म्हणतात.
ह्या थेरपीचा वापर करून रूग्णाच्या मनातील नकारात्मकता भीती दुर करण्याचा प्रयत्न केला जात असतो.त्याच्या कुठल्याही गोष्टीकडे बघण्याच्या दृष्टीकोनात अणि वागणुकीमध्ये भावभावनांमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न ह्या थेरपीदवारे केला जात असतो.
मानसिक रोगीमध्ये जीवनविषयक सकारात्मकता निर्माण करणे,त्याचा नकारात्मक दृष्टीकोनाला सकारात्मक बनवणे.त्याच्या मनातील नकारात्मकता दुर करणे.ह्या सर्व गोष्टी cognitive behavioral therapy मध्ये समाविष्ट होत असतात.
सीबीटी दवारे रुग्णावर उपचार कसा केला जातो?
ह्या थेरपीमध्ये मनोवैज्ञानिक रूग्णाशी बोलतात संवाद साधतात त्याच्यामधील नकारात्मक विचार भावना यांना व्यवस्थित जाणुन घेतात.
अणि मग ह्या नकारात्मक विचार भावनांमधुन रूग्णाला बाहेर काढण्यासाठी मनोवैज्ञानिक रूग्णाला विविध पदधतीने मदत करत असतात.
त्याच्या मनात कुठे नकारात्मक विचार भावना आहे? त्याच्या मनात काय नकारात्मक विचार भावना आहे याची ओळख करून देतात.
अणि त्या किती चुकीच्या काल्पणिक अणि अवास्तविक भावना आहेत विचार आहेत हे देखील रूग्णाला संवादादरम्यान चर्चा करताना पटवून देण्याचा प्रयत्न करत असतात.अणि त्याला एक नवीन सकारात्मक आशावादी दृष्टिकोण देण्याचा प्रयत्न करत असतात.
Cognitive behavioral therapy चे काम काय असते?
काँग्निटीव्ह बिहेव्हीरल थेरपी आपल्या मनातील अशा नकारात्मक विचार भावना चिंता तणाव भीती यांना दुर करायचे काम करते ज्यामुळे आपल्या जीवनातील समस्या अडचणींमध्ये अधिक प्रमाणात वाढ होत आहे.
ह्या थेरपीदवारे आपल्या मनात येणारे विचार भावना आपल्या मनातील चिंता तणाव भीती किती वास्तविक अणि अवास्तविक निरर्थक आहे हे आपणास उपचारा दरम्यान मनोवैज्ञानिकाकडुन लक्षात आणुन दिले जाते.
अणि आपल्या जीवनात पुन्हा एकदा एक नवीन सकारात्मकतेची भावना निर्माण केली जात असते.
सीबीटी थेरपी कोण घेऊ शकते?
ज्याला एखादा मानसिक आजार रोग आहे असा व्यक्ती मनोवैज्ञानिक यांच्याकडे जाऊन cognitive behavioral therapy घेऊ शकतो.
किंवा ज्याला कुठलाही मानसिक आजार नाहीये पण मनात सतत नकारात्मक विचार भावना येत आहे कशाची तरी चिंता भीती तणाव मनात आहे असा व्यक्ती सुदधा ह्या थेरपीचा लाभ घेऊ शकतो.