Men’s Day आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाविषयी माहीती – International Men’s Day Information In Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Men’s Day – आंतरराष्ट्रीय पुरूष दिनाविषयी माहीती – International Men’s Day Information In Marathi

आंतरराष्ट्रीय पुरूष दिन कधी साजरा केला जातो?

दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा केला जात असतो.

आंतरराष्ट्रीय पुरूष दिन का साजरा केला जातो?याचे महत्व काय आहे?

  • जसा महिलांचा सम्मान करण्यासाठी दरवर्षी महिला दिवस साजरा केला जात असतो एकदम तसेच पुरूषांच्या सम्मानासाठी हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो.
    पुरूषांसोबत केला जाणारा भेदभाव,पुरूषांचे केले जाणारे शोषण,पुरूषांना दिली जाणारी असामान्य वागणुक ह्यापासुन पुरूषांचे संरक्षण करण्यासाठी,
    पुरूषांना त्यांचे अधिकार प्राप्त करून देण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस जागतिक पातळीवर मोठया उत्साह अणि आनंदात साजरा केला जातो.
    संयुक्त राष्टाकडुन देखील हा आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे.
  • पण महिला दिवस जितक्या मोठया संख्येत अणि उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो त्याच्या तुलनेत हा दिवस एवढया मोठया संख्येत उत्साहात आनंदात अजूनही साजरा केला जात नही असे आपणास निर्दशनास येते.
    पण महिला दिना प्रमाणे हा दिवस देखील प्रत्येक वर्षी साजरा करण्यात येत असतो.
  • थोडक्यात सांगायचे म्हटले तर पुरूषांशी संबंधित विविध महत्वाच्या मुददयांवर त्यांच्या समस्यांविरूदध आवाज उठवण्याकरीता आंतरराष्ट्रीय पुरूष दिन दरवर्षी साजरा केला जातो.
    हा दिवस पुरूषांच्या आरोग्यात सुधारणा करणे,संबंधात सुधारणा घडवून आणने यावर विशेष लक्ष केंद्रित करतो.
    पुरूष हा प्रत्येक घराचा मुख्य आधारस्तंभ असतो.आपल्या कुटुंबाच्या पालन पोषणासाठी पुरुष स्वताच्या जीवाची पर्वा न करता दिवसरात्र कष्ट करत असतो.अणि पैसे कमवत असतो.त्यांचा संघर्ष देखील खुप मोठा असतो.
    समाजाला जगाला कुटुंबातील असलेले पुरूषाचे हेच महत्वाचे स्थान भुमिका पटवून देण्याचे काम हा आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस करतो.
See also  आंतरराष्टीय योगा दिनावर कोटस आणि घोषवाक्ये - International Yoga Day quotes and slogans in Marathi

आंतरराष्ट्रीय पुरुष दिनाचा इतिहास –

आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा करण्यास कधीपासुन आरंभ झाला?

  • आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा करण्यास आरंभ हा 1998 ते 1999 ह्या कालावधीत करण्यात आला होता.
    त्रिनिदाद अणि डोबेओ नावाच्या राष्टात खास पुरूषांसाठी हा दिवस साजरा करण्यास प्रथमत सुरूवात केली गेली.
  • पुरूषांच्या सम्मानाकरीता,पुरुषांच्या ज्या समस्या आहेत त्यांचे जे शोषण केले जाते,त्यांच्यासोबत जो भेदभाव केला जातो,त्यांना जी असामान्य वागणुक समाजात दिली जाते त्यावर लक्ष केंद्रित करण्याकरीता हा दिवस साजरा केला जाऊ लागला.
  • ज्या प्रमाणे समाजात पुरूषांकडुन महिलांवर अन्याय अत्याचार केला जातो एकदम त्याचप्रमाणे पुरुषांवर देखील अन्याय अत्याचार केले जातात.
    म्हणजेच महिला जशा शोषणाचा बळी ठरता आहे तसेच पुरूष देखील ह्या शोषणाचा बळी ठरत आहे.
    नुकत्याच निर्दशनास आलेल्या एका आकडेवारीतुन असे स्पष्ट झाले आहे की समाजात सगळयात जास्त हत्या पुरूषांचाच होत आहे,सर्वात अधिक बेघर असलेल्या तसेच आत्महत्या करणारया व्यक्तींमध्ये पुरुषांचाच अधिक समावेश आहे.
  • ६० टक्के महिला जशा घरगुती हिंसाचाराचा बळी ठरता आहे तसेच ४० टक्के पुरुष देखील काही प्रमाणात घरगुती हिंसाचाराचा बळी ठरत आहे असे सिदध झाले आहे.
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा