दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना विषयी माहीती – Antyodaya welfare scheme Information

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना माहीती – Antyodaya welfare scheme Information

दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना काय आहे?

दिनदयाळ उपाध्याय ही भारत सरकारकडुन सुरू करण्यात आलेली विशेष योजना आहे.?दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना 2013-2014 मध्ये लागु करण्यात आली होती.

दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा मुख्य हेतु काय आहे?

दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा मुख्य हेतु ग्रामीण अणि शहरी भागात राहणारया लाखो गरीब व्यक्तींना कौशल्यावर आधारलेले शिक्षण प्रदान करणे आपापली उपजीविकेची स्त्रोत प्राप्त करून देणे हा दिनदयाळ उपाध्यक्ष अंत्योदय योजनेचा मुख्य हेतु आहे.

ही योजना राबविण्यासाठी भारत सरकारने सुमारे 500 कोटीपर्यतची तरतुद करून ठेवली आहे.

दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा साठी कोणकोणती महत्वाची कागदपत्रे लागतात?

दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला पुढील काही महत्वाची कागदपत्रे लागणार आहे.

● अर्जदार गरीब असल्याचे प्रमाण

● आधार कार्ड

● आयडेंटीटी कार्ड

● वोटर आयडी कार्ड

● रहिवासी प्रमाणपत्र

● दोन पासपोर्ट साईज फोटो

● मोबाइल नंबर

दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेसाठी आँनलाईन अर्ज कसा करायचा?

● दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायला आपणास योजनेच्या आँफिशिअल वेबसाइट वर जावे लागेल.https://aajeevika.gov.in/

● योजनेच्या वेबसाइटला व्हिझिट केल्यावर मेन पेज ओपन होईल.

● मेन पेजवर आपणास लाँग इनचे आँप्शन दिसुन येईल.त्यावर क्लिक करावे.

See also  12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर एअर होस्टेस कसे बनावे?-How to become Air hostess after 12 th pass in Marathi

● लाँग इन आँप्शनवर क्लिक केल्यावर अजुन एक नवीन लाँग इन फाँर्मचे पेज ओपन होईल.त्याच्याच खाली आपणास रेजिस्टर नाऊ चे आँप्शन दिसुन येईल.त्यावर क्लिक करायचे.

● यानंतर आपल्या समोर एक रेजिस्ट्रेशन फाँम ओपन होईल.ह्या फाँममध्ये विचारलेली सर्व माहीती युझर नेम,काँन्टँक्ट नंबर पासवर्ड इत्यादी आपण व्यवस्थित भरून घ्यायची.

● फाँम भरून झाल्यावर शेवटी तो फाँम सबमीट करायचा आहे.

● सर्व माहीती भरून झाल्यावर क्रिएट न्यु अकाऊंट वर क्लीक करायचे.

यानंतर आता आपण योजनेंतर्गत प्रोत्साहन तसेच नोकरीसाठी अर्ज देखील करू शकतो.

दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचा लाभ कोण  घेऊ शकणार आहे?

राज्य शासनाकडुन निश्चित करण्यात आलेल्या बीपीएल यादी मधील परिवाराला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

याचसोबत केंद्र शासनाकडुन ठरवण्यात आलेल्या धोरणाप्रमाणे आर्थिक अणि जातनिहाय गणनेच्या आधारे निश्चित करण्यात आलेल्या ग्रामीण अणि शहरी भागातील गरीब कुटुंबांना ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनेचे मिशन कोणते आहे?

● दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना अंतर्गत शहरी तसेच ग्रामीण भागातील गरीब व्यक्तींना प्रशिक्षण केंद्र उपलब्ध करून देणे.एस एचजी प्रोत्साहन अणि कायमस्वरूपी निवारा प्रदान करणे.

● बेघर व्यक्तींसाठी घर निर्माण करणे

● शहरी तसेच ग्रामीण भागातील व्यक्तींसाठी रोजगाराच्या विविध संधी निर्माण करणे.

● ग्रामीण भागातील सामाजिक संस्थांच्या अंतर्गत गरीब व्यक्तींना उपजिविकेची विविध साधने उपलब्ध करून देऊन त्यांची गरीबी दुर करण्यासाठी प्रयत्न करणे.

दिनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजनचे फायदे कोणकोणते आहेत?

● ह्या योजनेमुळे शहरी अणि ग्रामीण भागातील दारिद्रय निर्मुलन होईल अणि येथील व्यक्ती स्वावलंबी होतील.

● ह्या योजनेच्या अंतर्गत गरीबांना ररस्त्यावर वस्तु विक्री करणारया तसेच बेरोजगार गरीब व्यक्तींना रोजगार प्राप्त करून देण्यासाठी कौशल्याधारीत शिक्षण दिले जाते.निवारा प्राप्त करून दिला जातो.

● ह्या योजनेमुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील गरीब व्यक्तींना स्वयंरोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.

See also  महिलांसाठी 14 सर्वोत्तम नोकरीअणि करीअरचे पर्याय - 14 Best jobs and career options for women in 21 century in Marathi

● या योजनेद्वारे सूक्ष्म-उद्योजक उपक्रमांमध्ये सहभागी असलेल्या बचत गटांच्या सदस्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.याने ते आर्थिक दृष्टया सक्षम होतील.

● ही योजना बचत गटातील सदस्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारण्यासाठी एक अत्यंत प्रभावी योजना आहे.

● कागद वेचणारया,रस्त्यावर फिरणारया तसेच फेरीवाल्या लोकांना देखील ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा