बिग बॉस मराठी सिजन ४ चा विजेता कोण आहे?Big boss marathi season 4 winner in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

बिग बॉस मराठी सिजन ४ चा विजेता कोण आहे?Big boss marathi season 4 winner in Marathi

मित्रांनो खुप दिवसांपासुन आपल्या महाराष्ट्रातील सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनात एकच उत्कंठा लागलेली होती की बिग बॉस मराठी सिजन ४ चा विजेता कोण ठरेल?

आजच्या लेखात आपण बिग बॉस मराठी सिजन ४ चा प्रथम तसेच दितीय विजेता कोण ठरले आहे?हेच थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

बिग बॉस मराठी सिजन ४ चा विजेता कोण आहे?Big boss marathi season 4 winner in Marathi

नुकताच ८ जानेवारी २०२३ रोजी बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा पार पडला आहे.

ह्या महाअंतिम सोहळयामध्ये अक्षय केळकर याने बिग बॉस मराठी सिझन ४ चा विजेता बनण्याचा मान पटकावला आहे.

अक्षय केळकर ह्याला बिग बॉस सिजन ४ चे प्रथम विजेतेपद मिळविल्याबाबद विजेतेपदाची ट्राॅफी अणि बक्षिसाची रक्कम १५ लाख ५५ हजार देण्यात आली आहे.

अक्षय केळकर समवेत अपुर्वा नेमळेकर हीने देखील बिग बॉस मराठी सिझन ४ चे दितीय क्रमांकाचे विजेतेपद पटकावण्यात यश प्राप्त केले आहे.

अक्षय केळकर कोण आहे?

अक्षय केळकर हा बिग बॉस सिजन चारचा विजेता आहे.

अक्षय केळकर हा टिव्ही सिरीअल मध्ये काम करणारा कलाकार आहे.

ज्याने बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करत अनेक वादविवाद केले भांडण केले पण अखेरपर्यंत त्याची बाजु नेहमी उत्तम राखण्यात आपला प्रत्येक टास्क हुशारीने पुर्ण करण्यात त्याने यश प्राप्त केले.

See also  राष्ट्रीय युवा दिन महत्व अणि इतिहास - National youth day history and importance in Marathi

त्याच्या ह्याच हुशारीने बुदधिमत्तेने चलाखीने खेळण्याच्या पद्धतीमुळे त्याला मास्टर माईंड असे देखील म्हटले जात होते.

बिग बॉस मराठी सिजन ४ कधी अणि कोठे पार पडले?

बिग बॉस मराठी सिजन ४ हे ८ जानेवारी रोजी नुकतेच मुंबई ह्या शहरात पार पडले आहे.इथेच अक्षय केळकर याला विजेता घोषित करण्यात आले.

बिग बॉस सिजन ४ चे स्वरूप कसे होते?

बिग बॉस मराठीचा चौथा अणि महाअंतिम सोहळा हा मुंबई येथे ८ जानेवारी २०२३ रोजी पार पडला ज्यात सर्व स्पर्धकांनी आपापला परफाॅर्मनस पार पाडत धमाल केली.

यानंतर स्पर्धकांना वेगवेगळे टास्क देण्यात आले.ज्यातुन सर्व स्पर्धक आपापला टास्क पुर्ण करत बाहेर पडले.अणि मग शेवटी टाॅप टु विजेत्यांचे नाव घोषित करण्यात आले.

ज्यात अक्षय केळकरला प्रथम विजेतेपद देण्यात आले तर अपुर्वा नेमळेकर हिला दुसरया क्रमांकाचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळाले आहे.

बिग बॉस सिजन चारचे टाॅप पाचचे स्पर्धक कोण कोण होते?

बिग बाॉस मराठीच्या चाललेल्या ह्या तब्बल शंभर दिवसांच्या रंगतदार खेळात एकूण सोळा स्पर्धकांमध्ये पाच टाॅप स्पर्धक निवडण्यात आले.

ह्याच पाच टाॅप स्पर्धकांमध्ये अटीतटीची अंतिम लढत आपणास पाहायला मिळाली ज्यात अक्षय केळकर याने प्रथम तर अपुर्वा नेमळेकर हीने दुसरे विजेतेपद पटकावले आहे.

१)अक्षय केळकर -प्रथम विजेता

२) अपुर्वा नेमळेकर -दितीय विजेता

३) राखी सावंत

४) किरण माने

५) अमृता धोंगडे

बिग बॉस मराठी काय आहे?

बिग बॉस मराठी हा एक कलर्स मराठी वर दाखवला जाणारा एक रिअॅलिटी शो आहे.

सुरुवातीला बिग बॉस हा रिअॅलिटी शो हिंदीमध्ये सुरू केला गेला नंतर याला मराठी तसेच कन्नड बंगाली तामिळ तेलगू अशा इतर विविध भाषेत टिव्हीवर प्रसारीत केले गेले.

बिग बॉस मराठीचे विजेता –

बिग बॉस मराठी याचे पहिले पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी सुरू करण्यात आले ह्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे ही होती.

See also  नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरयांना आता वर्षाला ६ हजार ऐवजी १२ हजार रुपये मिळणार - NAMO shetakari mahasanman nidhi yojana

यानंतर २६ मे २०१९ रोजी ह्या शो चे दुसरे पर्व सुरू झाले ज्याचा विजेता शिव ठाकरे होता.

२०२१ मध्ये १९ सप्टेंबरला याचे तिसरे पर्व आयोजित करण्यात आले ज्यात विशाल निकम याने बाजी मारली होती.

आता २ आॅक्टोंबर २०२२ रोजी प्रारंभ झालेल्या ह्या चौथ्या पर्वाचे विजेतेपद अक्षय केळकर याने पटकावले आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा