ग्रामसेवक पदासाठी 2023 मध्ये भरती सुरू | Gram Sevak Bharti 2023 in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

ग्रामसेवक पदासाठी 2023 मध्ये भरती सुरू | Gram Sevak Bharti 2023 in Marathi

खुप वर्षांपासून अनेक उमेदवार ग्रामसेवक पदाच्या भरतीची तयारी करत आहे.अनेक जण तर ह्या भरतीची आतुरतेने वाटच पाहत होते.

पण आता लवकरच ग्रामसेवक पदासाठी भरती सुरू केली जात आहे.ही भरती किती तारखेपासुन सुरू करण्यात येईल?

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद भरती बाबत एक आॅफिशिअल निर्णय घोषित करण्यात आला आहे.

हया अधिकृत निर्णयांमध्ये जिल्हा परिषद भरतीचे स़ंभाव्य वेळापत्रक कसे असणार याचा अंदाजा देखील आपणास थोडक्यात शासनाकडुन देण्यात आला आहे.

आज आपण ग्रामसेवक पद काय असते?ग्रामसेवक पदाचे महत्त्व काय असते?

२०२३ मध्ये होणारया ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी वयाची अणि शैक्षणिक पात्रतेच्या अटी कोणकोणत्या ठेवण्यात आल्या आहेत? या भरतीचे संभाव्य वेळापत्रक कसे असेल हे आपण आजच्या लेखात थोडक्यात जाणुन घेणार आहोत.

ग्रामसेवक कोण असतो? ग्रामसेवक पदाचे महत्त्व काय असते?

सरपंच उपसरपंच यांच्यानंतर गावाची जबाबदारी सांभाळणारा प्रमुख व्यक्ती म्हणजे ग्रामसेवक.ग्रामसेवक हा सहकारी कामे देखील देखील पाहत असतो.

ग्रामसेवक हा जन्म मृत्यु याची नोंद करण्याचे,दाखले देण्याचे तसेच विवाह नोंदणी करण्याची कामे करत असतो.गावामधील कुठलेही काम यांच्या सहीविना होत नसते.

 

ग्रामसेवक पदासाठी भरती कशी केली जाते?

ग्रामसेवक पदासाठी जिल्हा परिषद विभागामार्फत भरती केली जाते.

 

ग्रामसेवक पदासाठी निवड झाल्यानंतर वेतन किती प्राप्त होते?

ज्या उमेदवारांची ग्रामसेवक पदासाठी निवड केली जाते त्यांना महिन्याला किमान पाच हजार ते वीस हजार इतके वेतन दिले जाते.

See also  सुंदर पिचाई यांच्याविषयी माहीती - Sundar Pichai Information In Marathi

 

ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रतेची अणि वयाची अट काय आहे?

शैक्षणिक पात्रता

ग्रामसेवक पदासाठी उमेदवाराचे शिक्षण किमान बारावी मध्ये साठ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवारांना बारावीत किमान साठ टक्के गुण नसतील अशा उमेदवारांनी कृषी क्षेत्रातील विषयामध्ये पदविका किंवा त्याने आर्ट्स कॉमर्स तसेच सायन्स यापैकी कुठल्याही एका शाखेतुन पदवी प्राप्त केलेली असणे अनिवार्य आहे.

 

भरतीसाठी वयाची अट

शासनाने तयार केलेल्या नियमावलीनुसार ग्रामसेवक पदाच्या भरतीसाठी आपले किमान वय १८ अणि कमाल वय ३८ असणे गरजेचे आहे.

म्हणुन ज्या उमेदवारांचे किमान वय १८ आहे अणि ३८ च्या आत आहे त्यांनीच ह्या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.अन्यथा नाही.

भरतीमध्ये फक्त आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना किमान तीन ते पाच वर्षे इतकी वयामध्ये सुट दिली जाऊ शकते.

 

हे ही वाचा : १२ वी पासवर मुंबई महानगरपालिका मध्ये कायमस्वरूपी भरती सुरू – BMC recruitment 2023 in Marathi

 

ग्रामसेवक भरती वेळापत्रक

ग्रामसेवक भरती परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे –

ग्रामसेवक भरती परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक पुढीलप्रमाणे असणार आहे –

 

  • कार्यक्रम :३१ जानेवारी २०२३ पर्यंत बिंदू नामावली अंतिम करणे (एकुण रिक्त पदांच्या ८० टक्के पदे) स़ंवर्गनिहाय आरक्षण निश्चित करणे कंपनीची निवड करणे आवश्यक असल्यास तदनुषंगिक सर्व कामे करणे

 

कालावधी:२.५ महिने

 

दिनांक:३१ जानेवारी २०२३ पर्यंत

 

  • पदभरती जाहीरात प्रसिद्ध करणे

 

कालावधी: १ आठवडा

 

दिनांक -१ ते ७ फेब्रुवारी २०२३

 

  • ८ ते २२ फेब्रुवारी २०२३ पर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येणे

 

कालावधी -१५ दिवस

 

  • उमेदवारी अर्जांची छाननी २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ पर्यंत केली जाईल

 

कालावधी: १ आठवडा

 

  • २ ते ५ मार्च दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
See also  सीता नवमीचे महत्व काय आहे? ह्या दिवशी सीतेचे पुजन केल्याने कोणते लाभ प्राप्त होतात?

 

कालावधी -४ दिवस

 

  • ६ मार्च ते ५ एप्रिल दरम्यान जिल्हा परिषद व जिल्हा निवड समिती मंडळाकडून प्रत्यक्ष परीक्षा बाबदच्या आयोजनाविषयी कार्यवाई केली जाईल.

 

  • ६ ते १३ एप्रिल दरम्यान पात्र उमेदवारांची प्रवेश पत्रके तयार केली जातील अणि उमेदवारांना उपलब्ध देखील करून दिली जाणार.

 

  • १४ ते ३० एप्रिल २०२३ रोजी परीक्षेचे आँनलाईन किंवा आॅफलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार.

 

  • १ मे ते ३१ मे २०२३ पर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला जाईल अणि उत्तीर्ण उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देण्यात येणार.

 

ग्रामसेवक परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असतो?

 

ग्रामसेवक परीक्षेचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे असतो

 

  • यात लेखी परीक्षा ही दोनशे मार्काची होत असते.मराठीत अणि इंग्रजी मध्ये इथे एकुण पंधरा प्रश्न विचारले जातात अणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन गुण दिले जातात.

 

  • अंकगणित अणि बुद्धीमत्ता यावर पंधरा प्रश्न विचारले जातात अणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन गुण दिले जातात.असे एकुण ३० गुण

 

  • जनरल नॉलेज वर यात पंधरा प्रश्न विचारले जातात अणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन गुण दिले जातात.

 

  • कृषी अणि तांत्रिक विषयावर यात एकुण चाळीस प्रश्न विचारले जातात अणि प्रत्येक उत्तरासाठी आपणास दोन गुण दिले जातात.

 

परीक्षेमध्ये मल्टीपल चाॅईस क्वेशन विचारले जातात संपुर्ण परीक्षा ही दीड तासाची असते अणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे यात कोणतीही निगेटिव्ह मार्किंग नसते.

 

महत्वाची टीप:(ग्रामसेवक भरतीचा फाॅम भरण्याची सुरूवात जानेवारी पासून होणार आहे फाॅम भरण्याची शेवटची तारीख ही फेब्रुवारी २०२३ असु शकते.)

 

 

 

 

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा