१२ वी आयटीया उत्तीर्ण उमेदवारांची भरती- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये सुरू- NPCIL RECRUITMENT 2023 IN MARATHI

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये १२ वी आयटीया उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू NPCIL RECRUITMENT 2023 IN MARATHI

न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड  तारापुर मध्ये विविध पदांवर दहावी उत्तीर्ण उमेदवारांची भरती करण्यात येत आहे.

या भरतीमध्ये एकुण १९३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.सर्व पात्र उमेदवारांनी २८ फेब्रुवारी च्या आत भरतीसाठी आपला अर्ज आॅनलाईन पदधतीने जमा करायचा आहे.

सदर भरतीसाठी उमेदवारांकडून कुठलीही परीक्षा फी घेतली जाणार नाहीये.ज्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल त्यांना तारापुर येथे नोकरी करायची संधी प्राप्त होणार आहे.

विभागाचे नाव -न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड तारापुर

एकुण भरली जात असलेली पदे-१९३

पदांचे नाव –

१) नर्स -२६ जागा

या पदासाठी उमेदवाराचे बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे+नर्सिंग किंवा मिडवाईफरी डिप्लोमा केलेला असावा

बीएससी नर्सिंग तसेच नर्सिंग सर्टिफिकेट जवळ असणे आवश्यक आहे.तसेच नर्सिंग पदावर काम करण्याचा तीन वर्षे इतका अनुभव असणे आवश्यक आहे.

२) फार्मासिस्ट -एकुण ४ जागा

या पदासाठी उमेदवाराने बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच त्याने डी फार्म देखील केलेले असायला हवे.

३) साइंटिफिक असिस्टंट -एकुण ३ जागा

साइंटिफिक असिस्टंट ह्या पदासाठी उमेदवाराचे किमान पन्नास टक्के गुण मिळवून बीएससी झालेले असणे आवश्यक आहे.

See also  Tell me about yourself - How to Answer - आपली ओळख करून द्या प्रश्नाचं इंग्रजीत उत्तर कसे द्याल?

किंवा त्याने ६० टक्के गुण मिळवून डिएम एलटी किंवा बीएससी एम एलटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

४) एस टी डेंटल टेक्निशियन -एकुण जागा -१

एस टी डेंटल टेक्निशियन पदासाठी उमेदवाराने ५० टक्के गुण मिळवून बारावी विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच त्याचा डेंटल टेक्निशियन डिप्लोमा देखील झालेला असावा.

५) टेक्निशियन -एकुण १ जागा

टेक्निशियन पदासाठी उमेदवाराचे पन्नास टक्के गुण मिळवून बारावी विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उमेदवाराचा मेडिकल रेडिओ ग्राफी डिप्लोमा झालेला असावा एक्सरे वगैरे चा किमान तीन वर्षे इतका अनुभव असावा.

६) स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियन –

कंॅटॅगरी दोन प्लांट आॅपरेटर पदासाठी उमेदवाराचे ५० टक्के गुण मिळवून बारावी फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स हे विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

७) स्टायपेंटरी ट्रेनी टेक्निशियन -कंॅटॅगरी दोन मेटेंनर पदासाठी उमेदवाराचे किमान पन्नास टक्के गुण मिळवून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

तसेच उमेदवाराचा पुढील पैकी कुठलाही एक आयटीया झालेला असावा.

फिटर/टर्नर/वेल्डर/इलेक्ट्रीशिअन/एसी मॅकनीक/इंसट्रुमेंट मेकॅनिक/इलेक्ट्रॉनिक मॅकनिक/इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक सिस्टम मेंटेनन्स कार्पेटर प्लंबर मेसण इत्यादी झालेले गरजेचे आहे.

वय मर्यादा –

  • २८ फेब्रुवारी २०२३ रोजी नर्स पदासाठी १८ ते ३० वर्ष इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
  • २८ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंटिफिक असिस्टंट पदासाठी १८ ते ३० वर्ष इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
  • २८ फेब्रुवारी २०२३ रोजी फार्मासिस्ट पदासाठी १८ ते २५ वर्ष इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
  • २८ फेब्रुवारी २०२३ रोजी एस टी डेंटल टेक्निशियन पदासाठी १८ ते २४ वर्ष इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
  • २८ फेब्रुवारी २०२३ रोजी टेक्निशियन पदासाठी १८ ते २४ वर्ष इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
  • २८ फेब्रुवारी २०२३ रोजी स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियन पदासाठी १८ ते २४ वर्ष इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
  • २८ फेब्रुवारी २०२३ रोजी स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियन मेंटेनर ह्या पदासाठी १८ ते २५ वर्ष इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.
See also  12 वी उत्तीर्ण झाल्यानंतर एअर होस्टेस कसे बनावे?-How to become Air hostess after 12 th pass in Marathi

वयातील सुट –

एस सी एस टी कॅटॅगरी मधील उमेदवारांना पाच वर्षे तर ओबीसी कॅटॅगरी मधील उमेदवारांना तीन वर्षे इतकी सुट देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची सुरूवात –

सदर भरतीसाठी अर्ज करण्याची सुरूवात ८ फेब्रुवारी २०२३ पासुन झाली आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख –

सर्व उमेदवारांनी २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत आॅनलाईन पदधतीने आपला अर्ज सादर करायचा आहे.

वेतन –

  1. नर्स पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४४ हजार ९०० रूपये इतके वेतन दिले जाणार आहे.
  2. साइंटिफिक असिस्टंट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना ३५ हजार ४०० रूपये इतके वेतन दिले जाणार आहे.
  3. फार्मासिस्ट पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २९ हजार २०० रूपये इतके वेतन दिले जाणार आहे.
  4. एसटी डेंटल टेक्निशियन अणि टेक्निशियन पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २१ हजार ७०० रूपये इतके वेतन दिले जाणार आहे.
  5. स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियन प्लांट आॅपरेटर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २९ हजार २०० रूपये इतके वेतन दिले जाणार आहे.
  6. स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियन मेंटेनर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना २५ हजार ५०० रूपये इतके वेतन दिले जाणार आहे.
  7. अर्ज करण्याची लिंक –

https://www.npcilcareers.co.in/TMS20232202/candidate/Default.aspx

अधिक माहितीसाठी खालील दिलेली नोटीफिकेशन सविस्तर वाचून घ्यावी.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा