राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्याचे नेमके कारण काय आहे? – Why Rahul Gandhi disqualified

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द होण्याचे नेमके कारण काय आहे?

जागोजागी प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे राहुल गांधी यांची खासदारकी एवढी तडकाफडकी लोकसभा अध्यक्षांकडुन का रद्द करण्यात आली याला कारण काय आहे?

तर याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की काल राहुल गांधी यांना सुरत कोर्टाच्या निर्णयावर मानहानीच्या खटल्यामध्ये दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली होती.

ह्या शिक्षेनंतर त्यांना जामीन देखील ३० दिवसांकरीता मंजुर करण्यात आला होता.

ज्यामुळे सर्वांना असे वाटत होते की जामीन काळात राहुल गांधी आता हाय कोर्टात अपील करणार अणि सुरत कोर्टाच्या निर्णयावर स्टे आणणार जेणेकरून त्यांना दिलासा प्राप्त होईल.त्यांची खासदारकी जाणार नाही.

पण आज दुपारी अचानक अशी बातमी समोर आली की राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली गेली आहे लोकसभा मंडळाच्या वतीने असे नोटिफिकेशन देण्यात आले आहे की भारतीय कलम १९५१ मधील कलम १०(१) इ अंतर्गत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली गेली आहे.

खुप जणांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असे का झाले? राहुल गांधी यांना हाय कोर्टात अपील करण्यासाठी जामीन दिला असताना देखील असे कठोर पाऊल का उचलले गेले

तर याला कारणीभुत लोकसभा कायदा १९५१ मध्ये करण्यात आलेली एक महत्वाची तरतुद आहे.

लोकसभा कायदा कलम ८(३) अंतर्गत केल्या गेलेल्या तरतुदीनुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

जर एखादी व्यक्ती कुठल्याही गुन्ह्यामध्ये दोषी ठरली अणि त्या व्यक्तीला त्या गुन्हयासाठी दोन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी न्यायालयाकडुन शिक्षा सुनावली गेली तर तो व्यक्ती सभागृहाचा सभासद ठरण्यास अजिबात पात्र ठरत नसतो.

अणि त्या व्यक्तीचे सभासदत्व ठेवायचे की रद्द करायचे हे ठरवण्याचा अधिकार देखील सभागृह अध्यक्ष यांच्या कडे राखीव असतो.

अणि लोकसभा कायदा १९५१ मध्ये असे देखील सांगितले आहे की लोकसभा कायदा १९५१ नुसार एखादा खासदार किंवा आमदार याला एखाद्या गुन्ह्यात दोषी सिदध करण्यात आले तर त्या तारखेपासूनच त्या आमदार तसेच खासदार याला अपात्र ठरविण्यात येईल.

See also  यूएस गव्हर्नरची यादी । राज्यानुसार यूएस गव्हर्नरची सध्याची यादी । List of US Governors In Marathi

अणि शिक्षा झाल्यानंतर सुदधा तो आमदार तसेच खासदार सहा वर्षांच्या कालावधीसाठी सभागृहात येण्यास अपात्र ठरविण्यात येईल.

म्हणजे थोडक्यात सांगायचे म्हटले तर लोकसभा कायदा १९५१ नुसार राहुल गांधी यांना मानहाणी प्रकरणात सुरत कोर्टाच्या निर्णयावर दोषी ठरवत जी दोन वर्षांची शिक्षा सुनावली गेली त्यामुळे राहुल गांधी यांचे सभासदत्व खासदारकी रद्द करण्यात आली आहे.

ज्या दिवशी राहुल गांधी मोदी आडनाव मानहानी खटल्यात दोषी ठरले अणि त्यांना शिक्षा सुनावली गेली त्याच दिवशी लोकसभा कायदा १९५१ नुसार त्यांची खासदारकी देखील रद्द झाली होती.

म्हणजे लोकसभा कायदया नुसार आता दोन वर्षे शिक्षा भोगून आल्यानंतर देखील राहुल गांधी सहा वर्षे तरी निवडणूक लढवण्यास पात्र ठरत नाही राहुल गांधी शिक्षा भोगून झाल्यावर देखील सहा वर्षे सभागृहात दाखल होण्यास पात्र ठरणार नाही.असे ह्या कायदयावरून आपल्या लक्षात येते आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा