मालमत्ता कर म्हणजे काय? मालमत्ता कर भरण्याचे आपल्याला अणि आपल्या परिसरातील लोकांना होणारे फायदे कोणते ? What is Property Tax ?

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

मालमत्ता कर म्हणजे काय?- What is Property Tax

ज्या व्यक्तींनी एखाद्या शहरात तसेच गावाखेडयात एखादी मालमत्ता खरेदी केली आहे किंवा एखाद्या शहरात विशिष्ट ठिकाणी त्यांची विशिष्ट मालमत्ता असते.अशा सर्व व्यक्तींना ह्या शब्दाचा काय अर्थ होतो हे चांगलेच माहीत असेल.

तरी देखील आज आपण ह्या विषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

प्राॅपर्टी टॅक्स म्हणजे काय?

प्राॅपर्टी टॅक्स हा एक कर असतो.याला हाऊस टॅक्स रिअल इस्टेट‌ टॅक्स असे देखील म्हटले जाते.

महानगर पालिका,नगरपालिका,पंचायत इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थेकडून आपल्या स्थावर मालमत्तेवर जो कर आकारला जात असतो.त्यालाच प्राॅपर्टी टॅक्स म्हणजे मालमत्ता कर असे म्हणतात.

प्राॅपर्टी टॅक्स कोणत्या मालमत्तेवर आकारला जात असतो?

प्राॅपर्टी टॅक्स हा आपल्यावर आपल्या विशिष्ट ठिकाणी असलेल्या एखाद्या मालमत्तेसाठी आकारला जात असतो.
स्थानिक स्वराज्य संस्थेकडून प्रत्येक क्षेत्रातील विभागातील स्थावर मालमत्तेवर हा कर आकारला जात असतो.

स्थानिक स्वराज्य संस्थेकडून मालमत्ता कर कुठे अणि कशासाठी वापरला जात असतो?

आपल्या मालमत्तेवर आकारण्यात आलेला कर जो आपण नेहमी भरत असतो तो स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या परिसरातील विभागातील स्थानिक नागरी सुविधांकरीता उपयोगात आणत असते.

उदा,रस्त्यांचे बांधकाम करणे,मनपा परिसरातील विभागाची स्वच्छता करणे,शैक्षणिक कामकाज,उद्यान निर्मिती करणे,पथदीवे लावणे,सांडपाणी व्यवस्थापन करणे इत्यादी अशा सार्वजनिक कामकाजा करीता वापरत असते.

See also  हात धुण्याचे महत्व - 15 ऑक्टोबर ग्लोबल हँड वॉशिंग डे - Global Hand Washing Day Marathi

स्थानिक स्वराज्य संस्थेकडून कोणकोणत्या प्रकारच्या मालमत्तेवर कर आकारला जातो?

स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सर्व प्रकारच्या स्थावर मालमत्तांवर हा कर आकारला जात असतो.यात व्यावसायिक अणि निवासी अशा दोन्ही प्रकारच्या मालमत्ता समाविष्ट असतात.

पण एक गोष्ट आपण नेहमी लक्षात घ्यायला हवी जे काही रिकामे भुखंड असतात पलाॅट किंवा जमीन असते त्यावर हा टॅक्स आपणास कधीही आकारला जात नसतो.

कोणत्या मालमतेवर आपणास किती टॅक्स भरावा लागेल हे कसे ठरवले जाते?

कोणत्या मालमत्तेसाठी आपणास किती टॅक्स भरावा लागेल हे त्या मालमतेच्या किंमतीवर अवलंबून असते.त्यावरूनच आपणास किती कर भरावा लागेल हे निश्चित केले जाते.

मालमत्ता कर भरण्याचे फायदे कोणकोणते असतात?

मालमत्ता कर भरण्याचे आपल्या परिसराला होणारे फायदे –

आपण जो मालमतेवर कर भरतो त्याने आपल्या परिसरातील स्थानिक नागरीकांना जीवनावश्यक स्थानिक सोयीसुविधा पुरवल्या जात असतात.आपल्या परिसरातील रस्ते बांधले जातात,त्या पैशात आपल्या परिसराची सर्व स्वच्छता देखील केली जाते.

रस्त्याच्या कडेला पथदीवे लावले जातात,बगीचे उभारले जातात, सांडपाणी व्यवस्थापन केले जाते असे अनेक फायदे आपल्या टॅक्स भरल्यामुळे आपल्या परिसराला होत असतात.

म्हणून आपण प्रत्येक व्यक्तीने आपल्या परिसराच्या हितासाठी वेळेवर टॅक्स भरायलाच हवा.

मालमतेवर कर भरण्याचे इतर वैयक्तिक फायदे –

वेळेवर मालमत्ता कर भरल्याने आपणास भविष्यात जो दंड भरावा लागत असतो.तो दंड आपला वाचण्यास मदत होत असते.तसेच आपण भरत असलेल्या करामध्ये दंडाची रक्कम समाविष्ट केली जात नाही.

मालमत्ता कर भरण्याचे इतर टॅक्स बेनिफिट देखील आपणास मिळत असतात.इथे आपणास आॅनलाईन मालमतेवर कर भरताना आपले ठिकाण,वय, उत्पन्न,मालमतेचा प्रकार यावर मालमत्ता भरताना सुट देखील दिली जात असते.

मालमत्ता कर कसा अणि कोठे करायचा असतो?

मालमत्ता कर भरण्यासाठी आपण आपल्या क्षेत्र विभागातील महानगरपालिकेच्या एखाद्या कार्यालयात जाऊ शकता.मालमत्ता कर भरण्यासाठी आपणास प्राॅपर्टी टॅक्स नंबर अणि बॅक अकाऊंट नंबर द्यावा लागत असतो.

See also  पी व्ही आरचा फुलफाँर्म काय होतो? Full Form Of PVR In Marathi

https://propertytax.punecorporation.org/OnlinePay/PROP_DUES_DETAILS.aspx

किंवा आपण मालमत्ता कर आॅनलाईन देखील मालमत्तेसाठी कर भरू शकतो.इथे आपणास आपले ठिकाण,वय,उत्पन्न,मालमतेचा प्रकार यावर मालमत्ता भरताना सुट देखील दिली जात असते.

मालमतेवर कर भरण्यास उशीर झाला तर काय होईल?

मालमतेवर कर हा आपणास वर्षाने भरायचा असतो जर आपण हा कर भरायला उशीर केला तर आपणास दोन टक्के भुर्दंड बसण्याची शक्यता असते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा