डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार -30 Inspirational thoughts of Babasaheb Ambedkar in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे काही प्रेरणादायी विचार -30 Inspirational thoughts of Babasaheb Ambedkar in Marathi

बाबासाहेब आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार –

१) आकाशातील ग्रह तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदुचा अणि माझ्या मनगटाचा काय उपयोग?

२) आपल्याला कमीपणा येईल किंवा लाज वाटेल असा पोशाख परिधान करू नका तुमचा पोशाख तुमची सुंदरता अणि इज्जत दोन्ही वाढवेल.

३) अन्याय करणारयापेक्षा तो सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो.

४) विश्वास देवावर नाही स्वताच्या मनगटावर ठेवा

५) मी नदीच्या प्रवाहाला वळवणारया भक्कम खडकासारखा आहे.

६) माणुस धर्मासाठी नव्हे तर धर्म माणसासाठी आहे.

७) शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा

८) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही

९) माणसाला आपल्या दारिद्र्याची गरीबीची लाज वाटता कामा नये लाज वाटायला हवी आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.

१०) शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा चार दिवस सिंहासारखे जगा

११) शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे जो हे प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरलया शिवाय राहणार नाही.

१२) मंदिरात जाणारया लोकांच्या रांगा जेव्हा वाचनालयात जातील त्या दिवशी माझ्या देशाला महाशक्ती बनण्यापासुन कोणी रोखणार नाही.

१३) मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.

१४) ग्रंथ हेच गुरू वाचाल तर वाचाल

१५) शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे

१६) जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही जो मनुष्य मरायला घाबरतो तो आधीच मेलेला असतो.

१७) अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्या अंगात येण्यासाठी आपण स्वाभिमानी अणि स्वावलंबी बनायला हवे.

१८) जी माणसे पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात अणि जी माणसे डोक्याने बुदधीने चालतात ती माणसे निश्चितच आपले ध्येय गाठतात.

१९) एखादा खरा प्रेमी जसा आपल्या प्रेयसीवर प्रेम करतो त्याचप्रमाणे मी माझ्या पुस्तकांवर प्रेम करतो.

See also  इस्रायल आणि पॅलेस्टाईन संघर्षाचा इतिहास: Israel Palestine Conflict

२०) माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्या सागराच्या कडेला गुडघाभर ज्ञानात त्याला जाता येईल.

२१) स्वताची विद्यार्थी असतानाच वाढवा

२२) जर तुमच्याकडे दोन रूपये असतील तर एक रूपयाची भाकरी घ्या अणि एक रूपयाचे पुस्तक विकत घ्या.कारण भाकर तुम्हाला जगायला मदत करेल अणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे ते शिकवेल.

२३) संविधान कितीही चांगले असो ते चालवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक नसतील तर ते वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही.

२४) फक्त वही अणि पेन म्हणजे शिक्षण नाही तर बुदधीला सत्याकडे भावनेला माणुसकीकडे अणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.

२५) जसा माणुस उपासमारीने अशक्त होतो तसा तो शिक्षणा अभावी दुसरयाचा गुलाम होतो

२६) अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरींपेक्षा भयंकर व भिषण आहे.

२७) जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका

२८) ह्या जगात काहीतरी करून दाखवण्याची महत्वाकांक्षा सदैव तुमच्यात असायला हवी.लक्षात ठेवा जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात.

२९) नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वताच्या ताकदीवर विश्वास ठेवा.

३०) कुठलेही काम लवकर करायचे असेल तर मुहुर्त पाहण्यात वेळ वाया घालवु नका.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा