नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वरूप कसे असणार आहे? New Education policy in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वरूप कसे असणार आहे? New education policy in Marathi

नवीन शैक्षणिक धोरण हे यंदाच्या वर्षापासून सुरू होणार आहे.असे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

केंद्र सरकार कडुन नुकतेच नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी देण्यात आली आहे.३४ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे नवीन शैक्षणिक धोरण देशात लागु केले जाणार आहे.

आजच्या लेखात आपण ह्या नवीन शैक्षणिक धोरणात काय बदल करण्यात आले आहे ह्या नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वरूप कसे असणार आहे हे जाणून घेणार आहोत.

नवीन शैक्षणिक धोरणात कोणते महत्वाचे बदल करण्यात येणार आहे?

नवीन शैक्षणिक धोरणात पुढीलप्रमाणे काही महत्वाचे बदल करण्यात येणार आहे –

curricular restructuring of 5+3+3+4 covering ages 3-18 as shown in t

१०+१२ ही शिक्षण पदधत वगळण्यात येणार आहे अणि याजागी ५+३+३+४ ही नवीन शैक्षणिक पद्धत लागु केली जाणार आहे.पण येणारया काळात दहावी तसेच बारावी परीक्षा बोर्डाची असणार की नसणार याबाबत कुठलाही खुलासा अद्याप केसरकर यांनी केलेला नाहीये.

यंदाच्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये सेमिस्टर पॅटर्न लागु करण्यात येणार आहे यंदाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व परीक्षा सेमिस्टर पॅटर्न नुसार पहिली सहामाही दुसरी सहामाही अशा पद्धतीने घेतल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

अणि बोर्डाच्या परीक्षेचे महत्त्व कमी केले जाणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार दहावी बारावी परीक्षा ही सेमिस्टर पॅटर्न नुसार वर्षातुन दोनदा आयोजित केली जाणार आहे.याआधी ही परीक्षा वर्षातुन एकदाच आयोजित केली जात होती.

नववीपासुन बारावी इयत्तेपर्यतचे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आठ सेमिस्टर मध्ये विभाजित केले जाणार आहे.तसेच यापुढील शिक्षणासाठी काॅलेजमध्ये अॅडमिशन प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांची इंट्रान्स एक्झॅम देखील घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

See also  प्रदीप पटवर्धन विषयी माहीती – Veteran Marathi actor Pradeep Patwardhan famous actor in Marathi

नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांना इयत्ता पाचवी पर्यंतचे शिक्षण हे मातृभाषेत तसेच विद्यार्थी ज्या प्रदेशात राहत आहे तेथील प्रादेशिक भाषेत दिले जाणार आहे.

मेडिकल तसेच इंजिनिअरींग करत असलेल्या विद्यार्थ्यांना आपले विषय मराठीत शिकता येणार आहे.

पुर्व प्राथमिक शाळांसाठी नवीन अभ्यासक्रम एन सी आरटी मार्फत ठरवला जाणार आहे अणि हा अभ्यासक्रम देशातील सर्व शाळांना लागु करण्यात येणार आहे.

तिसरी पर्यंत विद्यार्थ्यांना वाचता यावे या गोष्टीकडे ह्या नवीन अभ्यासक्रमामध्ये विशेष लक्ष दिले जाणार आहे.नवीन शैक्षणिक धोरणात संख्या अणि अक्षर हे मुलभूत शिक्षण मानण्यात येणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणात प्रगतीपुस्तकात विद्यार्थ्यांने प्राप्त केलेल्या गुण तसेच ग्रेड सोबत शाळेतील मित्र अणि टीचर यांचे सुदधा शेरे असणार आहेत.याचसोबत विद्यार्थी इतर एक्सट्रा करिक्युलर अॅक्टी मध्ये कसा आहे हे देखील प्रगती पुस्तकात दिले जाणार आहे.याने पालकांना आपल्या मुलाचा कोणत्या दिशेला आहे हे समजण्यास मदत होणार आहे.

नववी ते बारावी दरम्यान विशिष्ट अशी शाखा नसणार आहे अणि विद्यार्थ्यांना विषय निवडीचे स्वातंत्र्य देखील असणार आहे.एखादा विद्यार्थी काॅमर्स करत असेल तर यासोबत त्याला स्पोर्ट्स म्युझिक असे इतर विषय देखील निवडता येणार आहे.

सहाव्या इयत्तेपासुनच विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम पाठ्यपुस्तकातुन शिकविला जाणार आहे.

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना देखील शैक्षणिक वर्षात म्युझिक हा विषय घेता येणार आहे.

पदवी ही तीन किंवा चार वर्षांची होणार आहे.एम फिल पुर्णपणे बंद केले जाणार आहे.यात ज्या विद्यार्थ्यांना पदवीनंतर लगेच नोकरी हवी आहे तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असणार आहे.अणि ज्यांना संशोधनासाठी उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांच्यासाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणात असे दिले आहे की समजा एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विशिष्ट कोर्स मधुन तात्पुरता ब्रेक घेऊन दुसरा एखादा कोर्स करायचा आहे.तर तशी सुविधा देखील नवीन शैक्षणिक धोरणात उपलब्ध असणार आहे.

See also  किवर्ड रिसर्च म्हणजे काय? keyword research in Marathi

पुर्व प्राथमिक शिक्षण आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

खाजगी तसेच सरकारी शाळेतील शिक्षणात समानता आणली जाणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक टप्पे पुढीलप्रमाणे असणार आहेत-

५+३+३+४ म्हणजे काय?

५+३+३+४ याचा अर्थ आपण सविस्तरपणे समजुन घेऊया.

पहिला टप्पा –

पहिले पाच वर्षे यात पुर्व प्राथमिकचे तीन वर्षे असणार आहे अणि पहिली दुसरी असे एकुण पाच वर्षे असणार आहेत.

दुसरा टप्पा –

पुढील तीन वर्षांत इयत्ता तिसरी चौथी अणि पाचवी असणार आहे.

तिसरा टप्पा –

तिसरया टप्प्यामध्ये पुढची तीन वर्षे सहावी सातवी अणि आठवी असणार आहे.

चौथा टप्पा –

अणि चौथ्या अणि शेवटच्या टप्प्यात नववी दहावी अकरावी बारावीचा समावेश असणार आहे.

NEW EDUACTION POLICY PDF DOWNLOAD

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा