जालियनवाला बाग हत्याकांडांचा नेमका इतिहास काय आहे? -Jallianwala Bagh History

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

जालियनवाला बाग हत्याकांडांचा नेमका इतिहास काय आहे?

मार्च १९१९ मध्ये ब्रिटीश सरकारने रौलट कायदा पास करण्यात आला होता.

हया कायद्यात असे दिले होते की देशद्रोहाचा आरोप असलेल्या कुठल्याही भारतीय व्यक्तीला कुठल्याही पुराव्या विना कोर्टात खटला न भरवता सरकारकडुन अटक केली जाऊ शकते.

ब्रिटीश सरकारच्या ह्या अन्यायकारक कायदयाविरूदध संपूर्ण भारतात असंतोषाची लाट निर्माण होऊ लागली.अणि पुढे जाऊन ह्या कायदया विरूदध लढा पुकारण्यात आला.

रौलट कायद्याच्या विरूद्ध पुकारण्यात आलेल्या लढयामुळे पंजाब प्रांत गंभीर स्वरूप धारण करू लागले होते.एप्रिल महिन्यामध्ये ह्या कायदया विरूदध जोरदार आंदोलन करण्यात येऊ लागली.

यामुळे शासनाने जनतेला आवाक्यात आणण्यासाठी दडपशाही करावयास सुरुवात केली.कलेक्टर कचेरी समोर आंदोलन करत असलेल्या अनेक आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला होता.

महात्मा गांधी यांना पंजाब प्रांतात प्रवेश करावयास मनाई केली गेली.

त्यावेळचा ब्रिटिश जनरल डायरने अमृतसर येथे सभाबंदीचा हुकुम देखील जाहीर केला होता.अमृतसर येथील अनेक प्रमुख नेत्यांना या काळात आंदोलन करण्यासाठी अटक करण्यात आली होती.

ज्यात डाॅ सत्यपाल,सैफुददीन किचलु अशी ही ह्या अटक केलेल्या प्रमुख नेत्यांची नावे होती.

ह्या सर्व घटनांबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी १३ एप्रिल १९१९ रोजी अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे बैसाखी सणाच्या निमित्ताने सर्व १५ ते ३० हजार आंदोलक जमले सर्व आंदोलक शांततापूर्ण पद्धतीने ह्या अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्यासाठी येथे जमले होते यासाठीच ह्या बागेत एक सभा आयोजित केली गेली.

आपण अमृतसर येथे सभाबंदीचा आदेश दिलेला असताना देखील जालियनवाला बाग येथे सभा भरवली गेली हे कळल्यावर जनरल डायरने जालियनवाला बाग येथे पोहचुन संतप्त होत सभेसाठी जमलेल्या तेथील सर्व नागरिकांवर गोळीबार करण्याचा आदेश दिला.

जनरल डायरच्या ह्या गोळीबाराच्या आदेशामुळे ब्रिटीश पोलिसांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली.ह्या गोळीबारात सभेसाठी जमलेल्या सर्व निशस्त्र निरपराध व्यक्तींवर गोळया झाडल्या गेल्या.

See also  G20 presidency - जी टवेंटी प्रेसीडेन्सी म्हणजे काय - G20 presidency meaning in Marathi

जनरल डायरने केलेल्या ह्या बेछुट गोळीबारात सुमारे ४०० स्त्रिया तसेच पुरूष मारले गेले उरलेले बाकी सर्व गंभीर जखमी झाले.

ह्या सर्व हत्याकांडाला पंजाबचा शासक मायकेल ओडवायर हा जबाबदार होता.हया हत्याकांडांचा निषेध व्यक्त करण्यासाठी रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना देण्यात आलेल्या सर ह्या उपाधीचा त्याग केला.

यानंतर संपुर्ण पंजाब मध्ये लष्करी कायदा लागू करण्यात आला होता पुढे जाऊन ह्या हत्याकांडांची चौकशी केली जावी अशी मागणी भारतीय लोक करू लागले.

तेव्हा ह्या हत्याकांडांची चौकशी करण्यासाठी सरकारने हंटर कमिशनची नियुक्ती केली होती.जालियान वाला हत्याकांडांमुळेच संपूर्ण भारतात देशव्यापी असहकार आंदोलनाची सुरुवात झाली होती.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा