सुवर्ण मंदिरा विषयी माहिती Golden temple information in Marathi
सुवर्ण मंदिर म्हणजेच गोल्डन टेंपल हे शीख धर्मातील लोकांचे अत्यंत पवित्र धर्मस्थळ गुरूद्वारा मानले जाते.सुवर्ण मंदिर हे पंजाब हया राज्यामधील अमृतसर हया शहरात स्थित आहे.
सुवर्ण मंदिर यालाच दरबार साहेब हरिमंदीर साहेब ह्या नावाने देखील संबोधले जाते.हे सुवर्ण मंदिर स्वातंत्र्याचे प्रतिक म्हणून ओळखले जाते.
ह्या सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी रोज हजारोंच्या संख्येने भाविक पर्यटन येताना आपणास दिसून येतात.अमृतसर ह्या शहराचे नामकरण गुरू रामदासांनी स्थापन केलेल्या सरोवरावरून ठेवण्यात आले आहे.
सुवर्ण मंदिर हे शीख धर्मातील लोकांचे चौथे गुरू म्हणून ओळखल्या जात असलेल्या गुरू रामदास यांनी बांधले आहे.
ह्या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ह्या मंदिराची अनेकदा मोडतोड करण्यात येऊन हे मंदिर नष्ट करण्यात आले होते तरी देखील भक्तांसाठी शीख धर्मातील लोकांनी ह्या मंदिराला पुन्हा पुन्हा स्थापित केले आहे.
एकोणिसाव्या शतकात काही अफगाण हल्लेखोरांनी सुवर्णमंदिर नष्ट केले होते.पण महाराजा रणजित सिंह यांनी पुन्हा हया सुवर्णमंदिराची गुरूद्वाराची नव्याने स्थापणा करत ह्या मंदिरास सोन्याचा मुलामा दिला होता.
ह्या मंदिराला जेव्हा दुसरया़ंदा नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा याला पुनर्स्थापित करण्याचे काम महाराज सरदार जस्सासिंह अलुवालिया यांनी केले होते.
सुवर्ण मंदिराचे स्वरुप-
गुरूद्वारा तसेच सुवर्णमंदिराला एकुण चार प्रवेशद्वार आहेत.हे चारही दवार चार दिशांनी उघडतात.त्याकाळी जातीची धर्माची विभागणी चार भागात केली गेल्याने प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र दरवाजा म्हणुन मंदिराला चार दरवाजे बसवण्यात आले असल्याचे सांगितले जाते.
यामधील एक द्वार हे गुरू रामदास यांचे सराय असल्याचे सांगितले जाते इथे गुरूंची लंगर स्थापण करण्यात आली आहे.
ह्या लंगरमध्ये प्रसादाचे वितरण केले जाते अणि ही लंगर २४ तासासाठी सुरू असते असे देखील ह्या लंगर विषयी सांगितले जाते.
गुरूद्वारा मध्ये जेवढेही भाविक दर्शनासाठी येतात त्यांच्या भोजनाची राहण्याची व्यवस्था ह्या लंगर मध्ये करण्यात येत असते.हरिमंदीर साहेब ह्या मंदिरात अनेक तीर्थस्थान देखील आहेत.
रोज हजारोंच्या संख्येमध्ये भाविकांना ह्या सरायच्या लंगरमधुन प्रसाद वाटप केला जातो.सराय मध्ये २२५ खोल्या अणि १५ मोठे हाॅल असल्याचे सांगितले जाते.हया सरायची निर्मिती १७८४ मध्ये करण्यात आली होती.
इथे रात्री झोपण्यासाठी भाविकांना गादी तसेच चादरी देखील उपलब्ध करून देण्यात येतात.एका व्यक्तीला चार ते पाच दिवस ह्या लंगरमध्ये राहता येते.
गुरूद्वारा याला सुवर्णमंदिर असे का म्हटले जाते?
गुरूद्वारा याला सुवर्णमंदिर म्हणयामागे देखील एक महत्वाचे कारण आहे.असे सांगितले जाते की ह्या मंदिराचा सोन्याचा तयार केला गेला आहे म्हणून याला सुवर्णमंदिर असे नाव पडले आहे.
सुवर्ण मंदिराविषयी जाणुन घ्यायच्या काही महत्त्वाच्या बाबी-
सुवर्णमंदिर गुरूदवार हे सुमारे चारशे वर्षे अगोदर स्थापित करण्यात आलेले मंदीर आहे.हया मंदीराचा नकाशा गुरू अर्जुनदेव यांनी स्वता तयार केला होता.
सुवर्ण मंदिराची निर्मिती ही संगमरवर दगडांपासुन खडकांपासून,करण्यात आली आहे.मंदिराच्या वर सोन्याच्या पानांची नक्षी देखील कोरण्यात आली असल्याचे सांगितले जाते.
सुवर्ण मंदिरात गेल्यावर दिवसभर गुरबानीचा नाद आवाज स्वर कानावर पडताना इथे आपणास दिसुन येते.शीख लोकांमध्ये गुरूंना परमेश्वराचा दर्जा दिला जातो.सुवर्ण मंदीरात प्रवेश करण्याआधी भाविकांना मंदिरासमोरच नतमस्तक होऊन गुरूंचा पाय पडायचा असतो.आर्शिवाद घ्यायचा असतो.यानंतर पाण्याने आपले चरण धूवून मग मंदिराच्या पायरया चढायच्या असतात.मंदिरात जाताना भाविकांना डोके झाकुन घ्यावे लागते.
सुवर्ण मंदिर बनवण्यासाठी जमीन मुस्लीम शासक अकबर याने दिली होती.हया मंदिराचा पाया साई मीया पीर नामक एका मुस्लिम संतांकडुन रचला गेला.
१५ हजार किलो इतक्या शुदध सोन्याने हे मंदिर बनवण्यात आले असल्याचे सांगितले जाते.
ह्या मंदिरातच आॅपरेशन ब्लु स्टार करण्यात आले होते.
सुवर्णमंदिरात दर्शनासाठी शीख धर्मातील लोकांसोबत इतर जाती धर्मातील लोक देखील येतात.
सुवर्ण मंदिर हे अमृतसरोवराच्या मध्यभागी तयार करण्यात आलेले आहे.
शीख धर्मातील अत्यंत पवित्र धर्मग्रंथ गुरू ग्रंथ साहेब सर्वात आधी सुवर्णमंदिरामध्येच स्थापित करण्यात आला होता.
सुवर्ण मंदिरात जगातील सर्वात मोठे किचन लंगर स्थापित करण्यात आले आहे इथे लाखो लोकांच्या राहण्याची खाण्याची निःशुल्क तजवीज केली जाते.
मंदिराची निर्मिती कधी कधी करण्यात आली हे नष्ट कधी केले गेले हे इथे दिलेल्या शिलालेखावरून लक्षात येते.
ह्या मंदिरात मोठेमोठे अरबपती देखील सर्वसामान्य भाविकांची मोठ्या श्रद्धेने सेवा करताना दिसुन येतात.बुट पाॅलिश करण्यापासून ताट साफ करण्यापर्यंत सर्व काम हे इथे करतात.
सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी येणारी ३५ ते ४० टक्के भाविक शीख धर्मातील नसुन इतर धर्मातील असतात.मंदिरात भाविकांना हलवा दिला जातो भाविकांसाठी रोज दोन लाखांपर्यंत चपात्या लाटलया जातात.