श्री स्वामी समर्थ यांचे प्रेरणादायी विचार कोटस swami samarth inspirational thoughts and quotes in Marathi
आज १८ एप्रिल २०२३ स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीचा दिवस आहे.श्री दतात्रेयाचे तिसरे पुर्ण अवतार म्हणून ओळखले जाणारया स्वामी समर्थ यांच्या पुण्यतिथीचा दिन
आज आपण स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त स्वामी समर्थ यांचे भक्तांना नेहमी प्रेरणा देत असलेले संकटकाळात लढण्याचे बळ देत असलेले स्वामी समर्थ यांचे काही प्रेरणादायी विचार जाणून घेणार आहोत.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.सदैव प्रामाणिकपणाने आपले कार्य करत राहा
अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे
दुखी असशील तर माझे ध्यान घे
मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे
एवढयाने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटची वाट घे
तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही
या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही
जी झुंज तु खेळतो आहे मनाशी त्यात तुला
मार्ग दाखवत राहणार मी
सुखच हवे आहे असा अट्टाहास करू नकोस
कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेले आहे
जसे दूधात दही लपलेले असते तसे तुझ्या
कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल.
अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही
मग एकटाच झुरता बसण्यापेक्षा आम्हाला हाक
का मारत नाहीस
मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी
सुर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो
तसेच तुम्ही स्वताबददल काहीही बोलु नका फक्त उत्तम कर्म करत राहा
यानंतर लोकच तुमचा परिचय सर्व जगाला करून देतील.
अडचणी जीवनात नसतात मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला तेव्हा
आपोआप अडचणींतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो
तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा
आपले दुख सांगुन अशा वेळी समज मला खरा त्रास तु आता देत आहेस काहीही न सांगुन.
जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा
कारण तुला स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसुन येईल
विवेक बुदधीने विचार करून निर्णय घेतला असेल तर
माघार घेऊ नकोस आपल्या निर्णयावर ठाम राहा
अणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव
कोणी तुझे ऐकत नसल्यास मला सांग
माझ्यातुन ते ज्याला ऐकु जायला हवे
त्यापर्यत ते नक्की पोहचेन
नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही
कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाच अर्थ नाही
बाळा मला तुझी काळजीच नाही
तर तुझयाविषयी प्रेम आहे
तुला मार्ग दाखवायला सदैव तयार असतो
फक्त एकदा मला हाक मार
तुला भीती वाटत असेल
कुठलाही मार्ग दिसत नसेल
तर डोळे बंद करून माझे ध्यान कर
अशाने माझ्याशी संवाद साधशील.
वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको
पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणुन दिली त्यांचे मोल कधीच विसरू नको
विचारांवर लक्ष ठेवा त्यांचे शब्द होतात
शब्दा़ंवर लक्ष ठेवा ते कृतीत उतरतात
कृतीवर लक्ष ठेवा त्या कारण निमित्त बनतात
सबबींवर लक्ष ठेवा त्यातु चरित्र बनते
चारित्र्यावर लक्ष ठेवा त्यातुन आपले भविष्य घडते.
असे म्हणतात की काळजी करणारी माणसे
भेटायला भाग्य लागते
अणि अशी माणसे भेटली आहे हे कळायला
जास्त भाग्य लागते
आपला पुर्ण वेळ स्वताला घडविण्यासाठी खर्च करावा
म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही
अणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही.
नियत कितीही चांगली असु द्या
दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते
अणि आपला देखावा कितीही चांगला असु द्या
परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो.
आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहील पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनारयाला लागेल.
ध्येय साधणे कितीही कठिन असो
जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही
जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात
त्यांच्याकडे तक्रारींचा कायम ढिग असतो
हातावरील रेषा मध्ये दडलेले भविष्य पाहु नका
त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा अणि स्वामींचे मुखात नाम असु द्या तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही.
तु कर्म करत राहा फळाची अपेक्षा न करता
अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे
अणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे
ही माझी जबाबदारी आहे.
कोणाचीही सध्याची स्थिती बघुन त्याची खिल्ली उडवु नका
कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो सामान्य कोळशाला देखील हळूहळू हिरा बनवतो.
कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका
भलेही हसवता नाही आले तर अश्रुंचे कारण तरी बनु नका
जीवनात वेळ वाईट किंवा चांगली कशीही असो
पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका
जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडुन जातील
काही वेळा नियती तुम्हाला मुददाम अनपेक्षित संकट देते
ते फक्त आपले कोण आहे अणि परके कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी वाईट व्यक्ती अनुभव देते अणि चांगली व्यक्ती साथ देते.
किती दिवसाचे आयुष्य आहे
आजचे अस्तित्व उद्या नाही
म्हणुन जगावे हसुन खेळुन
कारण ह्या जगात उद्या
काय होणार हे कोणालाच माहीत नाही.
रानात तन अणि मनात ताण कधीच ठेवू नये
रानातले तण पिकाचा नाश करते
अणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते
स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करते
अणि जीवनाचे सोने करते.
समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही
समाधानासारखे कुठलेही सुख नाही
लोभासारखा कुठलाही आजार नाही
दयेसारखे कोणतेही पुण्य नाही.
श्रीमंतीचा गर्व करू नका
स्वाभिमानाने जगा
मीपणा सोडा
सर्वांशी प्रेमाने वागा
थोरा मोठयांचा आदर करा
मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा
नाशिवंत हा देह सारा
उद्या भंगुन जाईल
काय कमविले काय जमविले
कधीतरी मातीमोल होईल
दोन शब्द प्रेमाचे घे रे सदामुखी
प्रेमाने जग तु जिंक
मग होतील सर्व सुखी
सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका
उगाच वेळ वाया जाईल त्यापेक्षा दुखाशी दोन हात करा
चांगली वेळ नक्की येईल
माझा हा निवांत क्षण नसुन तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे वर्तमानात असताना नामात राहा तु स्वता निस्वार्थ कर्माचा रोप लाव कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहु नका कारण त्या रोपावर येणारया फळावर देखील तुझाच अधिकार आहे.
मितभाषी असतो सदा सुखी
व्यर्थ बोलेल तो होईल दुखी
पण समर्थ नाम रोज जपावे
ते कधी न विसरावे
मनुष्य जन्म मिळतो एकदा
स्वामी नामात आनंद सर्वदा
एक भास एक विसावा नित्य स्वामी दिसावा
स्वामींची आठवण न यावी तो दिवस नसावा
हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा
कोणाला आपले करायचे तर मनाने करा
केवळ मुखाने करू नका
कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नाही
आचार विचार घराची आखणी आहे.
प्रेम घराचा पाया
थोर मणासे घराच्या भिंती आहेत
सुख हे घराचे छत
जिव्हाळा घराचा कळस आहे
माणुसकी तिजोरी आहे
आपापसात प्रेम ही धन दौलत आहे
तर नामस्मरण इथला आत्मा आहे.
चिंता तुला सतावत असेल
भीती तुला त्रास देत असेल
कुणी नसेल तुझी साथ देत
घाबरू नकोस नको काढु पळ
नको वागु स्वार्थी नको मारूस मन
मी तुझाच आहे प्रतिक्षणी
अणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना म्हण
माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचाराचे पालन कर
कोणी तुझे काही बिघडवु शकणार नाही नित्य माझे नामस्मरण कर
निस्वार्थ कर्म हाच एक धर्म बाकी मनाचा पसारा
कर्म करता करता नाम घेत जा
मग ना उरे मन ना ही पसारा
दुसरयांच्या ताटातले हिसकावून घेणयात शान नाही
तर आपल्या ताटातले दुसरयांना देण्यात आहे खरे समाधान
ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही
अणि वाटुन खाणारा कधी दुखी होत नाही
मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो
ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले
अणि ज्यांनी नाही कळले त्यांनी मलाच आपणहुन गमावले
अति उच्च शिखराकडे पोहोच पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून
माझे निष्पाप भक्त अणि मी भिन्न नाही
म्हणुन अक्कलकोट माझ्या भक्तांचे हदय
अणि त्यांचे हदय माझे शाश्वत धाम
माझे सच्चे भक्त कोणाला दुखावत नाही
कारण त्यांना माहित आहे की समोर स्वामीच आहेत
जे साधक अविश्वास दाखवत नाही अणि माझ्यावर निस्वार्थ निस्सीम प्रेम करतात खरया अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालतो असतो.
भक्तांच्या हाकेच्या आधी मी तयार असतो
पण त्यांचा विश्वास आहे मी हाकेला धावतो
म्हणुन मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो.
भक्त जरी मला स्वामी म्हणत असले तरी
खरया अर्थाने तेच माझे स्वामी आहे
कारण त्यांच्या स्वा मध्ये मीच आहे
तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठिन नाही
तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने हे सहज शक्य आहे.
नुसते स्वामी स्वामी म्हणता तरून जाशील
मोहमाया सारी विसरून जाशील
या जगाशी तुझे काही देणंघेणं नाही
म्हणशील तर संसार तुझा नाहीतर स्वामी तुझा
माणुस असो किंवा प्राणी ठेव समानतेचा भाव
एवढं लक्षात ठेव तेही स्वामी आहेत एवढे जाण