हायब्रीड सुर्यग्रहण म्हणजे काय?हायब्रीड सुर्यग्रहण २०२३ मध्ये कुठे दिसुन येईल? -What is a hybrid solar eclipse? How to watch

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

हायब्रीड सुर्यग्रहण म्हणजे काय?हायब्रीड सुर्यग्रहण २०२३ मध्ये कुठे दिसुन येईल?

हायब्रीड सुर्यग्रहण याला आपण मिश्र सुर्यग्रहण असे देखील म्हणत असतो.

What is a hybrid solar eclipse

तब्बल शंभर वर्षांच्या कालावधीनंतर असा योग जुळून आला आहे ज्यात आपणास एकाच दिवशी सुर्यग्रहणाचे तिन्ही प्रकार दिसुन येणार आहेत.

ह्या वर्षीचे सुर्यग्रहण २० एप्रिल २०२३ रोजी असणार आहे.अणि ह्या वेळीचे हे सुर्यग्रहण सामान्य असणार नसुन अनेक अर्थाने खास अणि वैशिष्ट्यपुर्ण असणार आहे असे ह्या सुर्यग्रहणाच्या बाबतीत सांगितले जात आहे.

सर्वसामान्यत जेव्हा चंद्र हा सुर्य अणि पृथ्वीच्या सरळ रेषेत येत असतो.सुर्य अणि पृथ्वीच्या मध्यभागी येत असतो तेव्हा त्या ग्रहणाच्या स्थितीला सुर्यग्रहण असे म्हटले जात असते.

जेव्हा चंद्र सुर्य अणि पृथ्वीच्या एका सरळ रेषेत येत असतो तेव्हा आपणास सुर्यग्रहण दिसुन येत असते.पण ह्यावेळीचे सुर्यग्रहण हे थोडे मिश्र प्रकारचे म्हणजेच हायब्रीड स्वरूपाचे असणार आहे.

हे सुर्यग्रहण वैशाख अमावस्येच्या दिवशी असणार आहे.हा दिवस पंचांगाच्या नुसार अत्यंत महत्त्वाचा मानला जाणार आहे.

हाय ब्रीड सुर्यग्रहण कशाला म्हणतात?

हाय ब्रीड सुर्यग्रहण यालाच संमिश्र सुर्यग्रहण अथवा निंगालु तसेच शंकर सुर्यग्रहण असे देखील म्हटले जाते.

हाय ब्रीड सुर्यग्रहण कसे दिसणार आहे?

ह्या वेळीचे सुर्यग्रहण हे हाय ब्रीड प्रकारचे सुर्यग्रहण असणार आहे.ह्या सुर्यग्रहणात स्वरूप कंकणाकृती आंशिक अणि संपुर्ण अशा तिन्ही स्वरुपात २० एप्रिल रोजी दिसुन येणार आहे.ही घटना शंभर वर्षातुन एकदा घडुन येणार आहे.

ह्या ग्रहणाच्या स्थितीत चंद्राचे पृथ्वीपासुनचे अंतर खुप कमीही नसते अणि खुप जास्त देखील नसते.म्हणुन याला मिश्र सुर्यग्रहण असे म्हटले जाते.

See also  दिनविशेष 183 मे 2033- Dinvishesh 18 May 2023

हाय ब्रीड सुर्यग्रहण कधी सुरू होणार आहे?कधी संपुष्टात येणार आहे?

हाय ब्रीड सुर्यग्रहण हे २० एप्रिल रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी सुरू होणार आहे.हे सुर्यग्रहण १२ वाजुन २९ मिनिटांनी संपुष्टात येणार आहे.

हे वर्षातील पहिले सुर्यग्रहण असणार आहे.फक्त हे सुर्यग्रहण भारतात दिसुन येणार नाहीये.

तिन्ही संमिश्र सुर्य ग्रहणाचे प्रकार कोणते आहेत?

ह्या वेळीचे सुर्यग्रहण हे मिश्र म्हणजेच हायब्रीड स्वरूपाचे असणार आहे.

१) आंशिक/खंडग्रास सुर्यग्रहण –

जेव्हा चंद्र सुर्याच्या एका लहानशा भागासमोर येत असतो.अणि त्याला रोखण्याचे काम करत असतो तेव्हा अशा परिस्थितीस आंशिक सुर्यग्रहण असे म्हटले जाते.

२) खग्रास/संपुर्ण सुर्यग्रहण –

जेव्हा चंद्र सुर्य अणि पृथ्वी हे तिघेही एका सरळ रेषेमध्ये येत असतात.अशा वेळी पृथ्वीचा एक भाग हा गडद होऊन जात असतो ह्या स्थितीला संपूर्ण सुर्यग्रहण असे म्हटले जाते.

३) कंकणाकृती सुर्यग्रहण –

जेव्हा चंद्र हा पृथ्वीच्या भोवती लंबगोलाकार कक्षेत फिरतो.जेव्हा चंद्र पृथ्वीपासून जास्तीत जास्त अंतरावर असताना पृथ्वी आणि सूर्य यांच्या मध्ये येतो.तेव्हा चंद्रामुळे पुर्ण सुर्य झाकला जात नसतो.अशावेळी सुर्याचा मधला भाग झाकला जातो.अणि गोलाकार बाजुचा भाग झाकला जात नाही.

अशा वेळी सुर्य हा एखाद्या वर्तुळाकार कंकणासारखा बांगडी सारखा दिसु लागतो अशा सुर्यग्रहणाच्या स्थितीस कंकणाकृती सुर्यग्रहण असे म्हटले जाते.

२०२३ मधील हे पहिले सुर्यग्रहण कुठे कुठे दिसुन येईल?

२०२३ मधील पहिले सुर्यग्रहण हे चीन,अमेरिका,मलेशिया, मायक्रोनेशिया,कंबोडिया,जपान,फिजी,फिलीपिन्स, इंडोनेशिया,समोआ,सलोमन,थायलंड,बरूनी,सिंगापूर, न्युझीलंड,आॅस्ट्रेलिया,अंटार्क्टिका, व्हिएतनाम,तायवान,पापुआ न्यु गिनी,पुर्व दक्षिण आशिया,प्रशांत महासागर,अंटार्क्टिका हिंद महासागर इत्यादी देशांत देखील दिसुन येईल.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा