जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे -The History and Importance of Earth Day

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

जागतिक वसुंधरा दिनाचे महत्त्व तसेच इतिहास काय आहे -The History and Importance of Earth Day

दरवर्षी २२ एप्रिल रोजी जागतिक पातळीवर वसुंधरा दिवस साजरा केला जात असतो हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा पृथ्वीचे संरक्षण करणे तसेच पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती करणे आहे.

जागतिक पृथ्वी दिवस सर्वप्रथम अमेरिका ह्या देशात साजरा करण्यात आला होता.जागतिक दिवस अमेरिकेत पहिल्यांदा २२ एप्रिल १९७० मध्ये साजरा करण्यात आला होता.तेव्हापासून दरवर्षी हा दिवस जागतिक पातळीवर साजरा केला जाऊ लागला.

१९७० पासुन १९२ देशांमध्ये हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.२०२१ मध्ये ह्या पृथ्वी दिनाला ५१ वर्षे इतका कालावधी देखील पुर्ण झाला होता.म्हणजे २०२३ मध्ये ह्या पृथ्वी दिनाला ५३ वर्षे इतका कालावधी पुर्ण होईल.

निसर्ग आणि मानव या दोघांमध्ये समतोल राखण्यासाठी अमेरिका देशातील सिनेटर गेलोर्ड नेल्सन यांनी ह्या पृथ्वी दिनाची सर्वप्रथम स्थापणा केली होती.नेलसन यांनी लोकांना हा संदेश दिला की आपल्याला ह्या पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे तर आपणास पृथ्वीच्या पर्यावरणाच्या संरक्षणाविषयी विचार करावाच लागेल.

अमेरिका ह्या देशात हा दिवस वृक्षदिन म्हणून देखील ओळखला जातो.

जागतिक पृथ्वी,वसुंधरा दिन कोटस शुभेच्छा अणि घोषवाक्ये

जागतिक पृथ्वी दिन हे विश्वातील सर्वात मोठे पर्यावरण जागरूकता चळवळ तसेच आंदोलन आहे.यादिवशी सर्व देशातील नागरिकांना पृथ्वी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूक केले जाते.

ह्या दिवशी सर्व शाळा महाविद्यालये मध्ये पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी पृथ्वीच्या संरक्षणाविषयी जागृकता निर्माण करण्यासाठी निबंध लेखन काव्य वाचन,वादविवाद इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या जातात.वसुंधरा संरक्षण संवर्धन अभियान राबविण्यात येत असते.

पृथ्वी संरक्षणाच्या घोषणा देणारे पोस्टर बॅनर बनवणे,पृथ्वी संरक्षणाच्या घोषणा देणारी घोषवाक्ये तयार करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात.

ह्या सर्व स्पर्धादवारे विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वीच्या संरक्षणाविषयी जागृकता निर्माण केली जाते.पर्यावरण संरक्षणाचे महत्व पटवून त्यांना ह्या विविध उपक्रमांतर्गत दिले जाते.

See also  अमेरिकेतील जाॅर्जिया राज्यात हिंदु फोबियावर केला गेला प्रस्ताव पास, असे करणारे अमेरिका देशातील प्रथम राज्य - America Hindu phobia latest news in Marathi

वृक्ष लागवडीचे महत्व काय आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले जाते विद्यार्थ्यांकडुन‌ शाळा महाविद्यालयांमध्ये विविध रस्ते परिसर विभागात जागोजागी वृक्ष लागवड करून घेतली जाते.

तसेच वृक्ष लागवडीचे महत्व आपल्या घरातील आजूबाजूच्या परिसरातील लोकांना देखील पटवून देण्यासाठी प्रेरित केले जाते.जेणेकरून जास्तीत जास्त लोक आपल्या घरासमोर आजुबाजूच्या परिसरात वृक्ष लागवड करतील.

ही पृथ्वी आपले घर आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या घराला नेहमी स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपण आपल्या आजुबाजुच्या परिसराला देखील स्वच्छ ठेवायला हवे.आपल्या घरासमोर तसेच आपल्या आजुबाजुच्या परिसरात देखील वृक्ष लागवड करायला हवी.

हा स्वच्छतेचा वृक्ष लागवडीचा संदेश घराघरात या दिवशी विविध पोस्टर बॅनर घोषवाक्ये आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम इत्यादी मार्फत पोहचवला जातो.

पृथ्वीच्या,पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण काय उपाययोजना करायला हवी कोणती महत्वाची पाऊले उचलायला हवीत हे ह्या गोष्टींचा उहापोह ह्या दिवशी केला जात असतो.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा