गुगल डुडल- हवामानातील बदलाविषयी जागरूकता – Google doodle climate change in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

गुगल आज डुडलदवारे करते आहे हवामानातील बदलाविषयी जागरूकता Google doodle climate change in Marathi

आज २२ एप्रिल २०२३ रोजी म्हणजेच जागतिक पृथ्वी दिनाच्या वसुंधरा निमित्ताने गुगलने एक डुडल तयार केले आहे.

Google doodle climate change in Marathi

ह्या डुडलदच्या माध्यमातून गुगल जागतिक पृथ्वी दिन साजरा करताना दिसुन येत आहे याचसोबत

जागतिक पृथ्वी दिनाच्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने हवामान बदलाविषयी समाजात जागरूकता अभियान राबवित आहे.समाजात वातावरणात होत असलेल्या हवामान बदलाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे काम गुगल आपल्या डुडलच्या माध्यमातुन करीत आहे.

हवामान बदल म्हणजे काय?climate change meaning in Marathi

हवामान बदल हे एक महत्वाचे सत्य आहे अणि आपल्या सजीव जीवसृष्टीच्या समोर असलेले जिवाचे सर्वात मोठे संकट देखील आहे.

अठराव्या शतकाच्या सुमारास वाफेच्या इंजिनाचा शोध लागला अणि संपूर्ण जगभरात औद्योगिकीकरणास प्रारंभ झाला.

औद्योगिकीकरणकरीता कोळशाचा वापर फार मोठ्या विपुल प्रमाणात झाल्याने वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइड अणि मिथेनचे प्रमाण वाढले.

ह्या कार्बन डायऑक्साइड अणि मिथेन वायुमुळे पृथ्वीवर परावर्तित होत असलेली सूर्यकिरणे पृथ्वीच्याच वातावरणात राहुन गेल्याने पृथ्वीच्या तापमानात वाढ होऊ लागली.याला आपण ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणुन देखील ओळखतो.

ह्यामुळे पाऊस पडणे,वारे वाहण्याची पदधत अणि तापमानात लक्षणीय दीर्घकालीन बदल घडुन येऊ लागले ह्या बदलांनाच हवामानातील बदल म्हणजेच क्लायमेंट चेंज असे म्हटले जाऊ लागले.

लोकसंख्येत दिवसेंदिवस होत असलेली वाढ, आधुनिक प्रदुषण निर्माण करणारया तंत्रज्ञानांचा वाढलेला वापर ह्यामुळे वातावरणात हवामानात बदल घडून येत आहेत.

याचेच परिणाम स्वरुप जागतिक तापमान वाढीची समस्या धृवांवर बर्फ वितळण्याचे वाढलेले प्रमाण ही समस्या निर्माण झाली आहे.

जर आपण महासागराच्या पाण्याच्या पातळीत होणारया वाढीला वेळ असताच आळा घातला नाही तर सर्व देश जग पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

वातावरणात होत असलेल्या बदलाचे मुख्य उदाहरण तसेच परिणाम म्हणजे कधीही बेभरवशीपणे अवकाळी येणारा पाऊस हा आहे.

See also  IPL Auction List 2022 - आयपीएल 2022 मधील खेळाडुंची लिलाव यादी

भारत तसेच अनेक दक्षिण आशियाई देश हे शेतीसाठी अणि पिण्याच्या पाण्यासाठी ठाराविक वेळात पडणारया पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहत असतात.

पण तापमानात होत असलेल्या वाढीमुळे ह्या पाऊस पडण्याचा कालावधी कमीत कमी दहा ते बारा दिवस इतका पुढे सरकताना आपणास दिसून येत आहे.

जागतिक तापमान वाढीमुळे हवेत पसरणारा कार्बन डायऑक्साइड वायु हया दोघांमुळे महासागरातील पाण्याच्या आम्लतेत आपणास वाढ होताना दिसुन येत आहे.ज्याचे परिणाम स्वरुप पाण्यातील जीव नष्ट होत आहेत.

ह्या सर्व बाबींना आळा घालण्यासाठी आपणा सर्वांना काही महत्वाचे पाऊल उचलणे आवश्यक आहे जसे की प्लास्टिकच्या पिशवीचा मर्यादितच वापर करणे, नैसर्गिक संसाधनांचा विवेकी वापर करणे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा