भारतीय क्रिकेटपटटु रोहित शर्माने बनवला नवीन रेकॉर्ड-Rohit Sharma new IPL record in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

भारतीय क्रिकेटपटटु रोहित शर्माने बनवला नवीन रेकॉर्ड rohit sharma new ipl record in Marathi

भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडु रोहित शर्माने नुकताच एक नवीन रेकॉर्ड नोंदविला आहे.

रोहित शर्मा याने त्याच्या आयपीएल सामन्यातील कारकीर्दीत २५० षटकारांचा टप्पा गाठण्यात यश प्राप्त केले आहे.

अशी विक्रमी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज आहे.तसेच आयपीएल क्रिकेटच्या इतिहासात २५० षटकार ठोकणारे रोहित शर्मा हे तिसरे खेळाडु बनले आहेत.

आयपीएल क्रिकेटमध्ये २५० षटकार लगावण्याचा पराक्रम करणारा पहिला फलंदाज वेस्ट इंडिज संघाचा खेळाडु ख्रिस गेल याने केला आहे तर यात दुसरया स्थानी साऊथ आफ्रिका संघाचा एबी डिवहीलियर्स आहे.

यानंतर आयपीएल क्रिकेटमध्ये २५० षटकार लगावण्याचा हा पराक्रम करण्याचा तिसरया क्रमांकाचा मान रोहित शर्मा हयाला प्राप्त झाला आहे.

वेस्ट इंडिज संघाचा खेळाडु ख्रिस गेल याने यात पहिला मान मिळवण्यासाठी आयपीएल सामन्यात एकुण ३५७ षटकार ठोकले आहेत.

तर दक्षिण आफ्रिका संघाचा एबी डिवहीलियर्स याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत एकूण २५१ षटकार ठोकत दुसरा क्रमांक पटकावला होता.

आता ह्या सर्वाधिक षटकार मारणारया खेळाडुंच्या यादीत भारताच्या रोहित शर्माने देखील २५० षटकार ठोकत तिसरे स्थान पटकावले आहे.

पंजाब किंगज विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा कॅप्टन रोहित शर्माने हा विक्रम नोंदविला आहे.हया सामन्यात रोहित शर्माने २७ चेंडुंचा सामना करत ४४ रण केले.यात त्याने चार चौके अणि तीन षटकार देखील मारले आहेत.

याचसोबत रोहीत शर्मा याने कॅमेरून ग्रीन याच्या समवेत चांगली पार्टनरशिप देखील ह्या सामन्यात केली.पण ह्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला पंजाब किंगजने हा सामना जिंकला आहे.

२२ एप्रिल २०२३ रोजी शनिवारच्या दिवशी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या ह्या आयपीएल सामन्यात पंजाब किंगजने मुंबई इंडियन्सला १३ धावांनी पराभूत केले आहे.

See also  सोशल मीडिया फोटो योग्य आकार -Perfect social media images sizes for 2021.

सामन्यात पहिली फलंदाजी पंजाब किंगजने केली ज्यात मुंबई इंडियन्स पुढे ज्यात पंजाब किंगजला २१५ धावांचे आव्हान ठेवण्यात यश प्राप्त केले होते.

अणि मुंबई इंडियन्स संघाला सहा विकेट घेऊन २०१ धावात गुंडाळण्यात रोखण्यात पंजाब किंगजला यश आले अणि याचसोबत पंजाब किंगजने हा सामना आपल्या नावावर केला आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा