बुर्ज खलिफा विषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य- Important facts about Burj Khalifa in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

बुर्ज खलिफा विषयी जाणुन घ्यायची काही महत्वाची तथ्ये important facts about Burj Khalifa in Marathi

बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखली जाते.

Important facts about Burj Khalifa in Marathi
Important facts about Burj Khalifa in Marathi

बुर्ज खलिफा एवढी मोठी इमारत आहे की ही इमारत आपण ९५ किलोमीटर इतक्या दुर अंतरावर देखील बघु शकतो.

जेव्हा हवामान स्वच्छ असते तेव्हा बुर्ज खलिफाच्या वरच्या मजल्यावरून ईराण हा शेजारील देश देखील सहजपणे दिसुन येतो.

बुर्ज खलिफाला आधी बुर्ज अल दुबई असे म्हटले जात होते यानंतर अबुधाबी येथील राष्ट्रपती खलिफा बीन जाएद अल नायान यांच्या सन्मानार्थ याचे नाव बदलून बुर्ज खलिफा असे ठेवण्यात आले होते.

बुर्ज खलिफाच्या स्थापणेसाठी खूप अधिक खर्च झाला होता म्हणून खलिफा बीन जाएद अल नायान यांनी बुर्ज खलिफाच्या स्थापणेसाठी पैसे दिले होते.

बुर्ज खलिफा मध्ये लावण्यात आलेली लिफ्ट जगातील सर्वात वेगवान चालणारी लिफ्ट म्हणून ओळखली जाते.

असे सांगितले जाते की बुर्ज खलिफा मध्ये लावलेल्या एसीमधुन एवढे पाणी निघते की ज्यातुन पाच ओलम्पिक स्विमिंग पूल भरले जाऊ शकतात.

बुर्ज खलिफा मध्ये सर्वात महागडे त्याचे लावण्यात आलेले ग्लास बॅनल्स आहेत.यात लावलेल्या प्रत्येक ग्लास बॅनल्सची किंमत २ हजार डाॅलर इतकी असल्याचे सांगितले जाते.बुर्ज खलिफा मध्ये असे एकुण २४ हजार ग्लास बॅनल्स लावण्यात आले आहेत.हया सर्वांची किंमत ३६० करोड इतकी आहे.

बुर्ज खलिफा मध्ये लावण्यात आलेल्या ग्लास बॅनल्सचा एकुण एरिया एक लाख ७४ हजार वर्ग मीटर इतका आहे.जो जवळजवळ चोवीस फुटबॉल ग्राऊंडच्या बरोबरीने आहे.

जोरात हवा चालु असताना बुर्ज खलिफा मधील वरचे मजले आपोआप बंद होऊन जातात असे सांगितले जाते.कारण वर सुरू असलेली हवा मोठया भयानक वादळापेक्षा अधिक गतिमान असते.

बुर्ज खलिफाचे एकूण एक लाख बारा हजार हत्तींच्या बरोबरीचे आहे.म्हणजे चार लाख पन्नास हजार टन इतके याचे वजन आहे.

See also  ८ अ उतारा म्हणजे काय? 8A utara meaning in Marathi

असे सांगितले जाते की एक व्यक्ती ज्याने बुर्ज खलिफाच्या बांधकामाचे काम केले होते.त्या व्यक्तीने १० मे २०११ रोजी बुर्ज खलिफाच्या १४७ व्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली पण यात तो व्यक्ती जमीनीवर पडला नाही.
हवेमुळे तो बुर्ज खलिफाच्या १०८ नंबरच्या मजल्यावर पडला असे सांगितले जाते.

बुर्ज खलिफाच्या बांधकामाला तब्बल सहा वर्षे इतका कालावधी लागला होता.म्हणजे बुर्ज खलिफाच्या निर्मितीसाठी कामगारांना २२ मिलियन तास काम करावे लागले होते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा