अरजित सिंग विषयी जाणुन घ्यायची काही महत्वाची रोचक तथ्ये – Important facts about Arijit Singh in Marathi
अरजित सिंगचा जन्म पश्चिम बंगाल मध्ये मुर्शिदाबाद येथे झाला होता.
अरजित सिंग याला लहानपणापासूनच गाणे गाण्याची आवड होती.
जेव्हा अरजित खुप लहान होता तेव्हाच त्याने त्याच्या मावशीकडुन गाणे गायला शिकण्यास आरंभ केला होता.
फक्त सहा सात वर्षांचा असताना खुप कमी वयातच अरजीतने सिंगिगमध्ये करिअर करायचा निर्धार केला होता.
अरजितने लहानपणापासून गाणे गाण्याचा रियाज सराव करत आला आहे म्हणून आज तो एवढा प्रसिद्ध गायक म्हणून ओळखला जातो.
अरजितला संगीताची आवड ही त्यांच्या आईमुळे अणि घरातील गायन संस्कारामुळे जडली असे सांगितले जाते.अरजितची आई उत्तम प्रकारे तबला वाजवायची अणि त्याचे मावशी अणि मामा देखील संगीत क्षेत्रात कार्य करत होते.
अरजित सिंगने गायन क्षेत्रात प्रवेश करून करीअर करावे ही त्याच्या आईची मनापासूनची ईच्छा होती.
अरजित सिंग यांनी वयोवर्ष ३ असताना गायनाच्या प्रशिक्षणाला सुरूवात केली.नऊ वर्षाचे असताना अरजित सिंग यांना शास्त्रीय संगीताच्या गायनाचे प्रशिक्षण घ्यायला शासनाने स्काॅलरशिप देखील प्रदान केली होती.
हमारी अधुरी कहाणी ह्या गाण्याचे गायन करताना अरजीतने त्याचा काॅनफिडन्स देखील गमावला होता.हे गाणे मुव्हीचे टायटल साँग असल्याने अरजितला हे गाणे सुरूवातीला गाता आले नव्हते.पण फिल्म डायरेक्टर महेश भटट अणि महेश सुरी यांच्या सपोर्ट मुळे त्याने हे गाणे गायले अणि हेच गाणे खुप हिट देखील गेले.
अरजित सिंग याचे आईवडील दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्ती आहेत.अरजितचे वडील यांचे कक्कर सिंग असे आहे.ते मुळचे पंजाब येथील रहिवासी असल्याने ते आपल्या शीख धर्मातील नीती नियमांचे पालन करतात अणि अरजितची माता ही बंगालची आहे ती हिंदू धर्मीय असल्याने हिंदू धर्मातील नीती नियमांचे पालन करते.
२००५ दरम्यान प्रथमतः अरजित सिंग याने अठरा वर्षाचा असताना रिअॅलिटी शो मध्ये पार्टिसिपेट केले होते.इथूनच अरजितच्या गायनाच्या कारकीर्दीस आरंभ झाला.
हया शोचे नाव गुरूकुल असे होते.यात अरजितच्या गाण्याला प्रेक्षकांकडून खास पसंती प्राप्त न झाल्याने तो शो मधून कमी वोट मिळाल्याने इलिमिनेट देखील झाला होता.
गुरुकुल ह्या रिअॅलिटी शो मध्ये कमी वोट मिळाल्याने इलिमिनेट झाल्यानंतर देखील अरजित सिंग याने एका नवीन शो मध्ये पार्टिसिपेट केले.ज्याचे दस के दस ले गए असे होते.हा शो त्याने जिंकला अणि दहा लाखाचे बक्षीस देखील प्राप्त केले होते.
असे म्हटले जाते की अरजित सिंग याला गायनाची पहिली संधी संजय लिला भन्साळी यांच्या कडुन देण्यात आली होती.पण गाण्याच्या स्क्रिप्ट मध्ये ऐनवेळी बदल करण्यात आल्याने हे गाणे रिलीज केले गेले नव्हते.हे गाणे सावरीया चित्रपटातील यु शबनमी असे असल्याचे सांगितले जाते.
२०११ मध्ये अरजित सिंगने मर्डर टु ह्या चित्रपटातील फिर मोहब्बत ह्या गाण्याचे गायन करत बाॅलिवुड मध्ये सिंगर म्हणून करिअर करायला सुरुवात केली.
असे म्हटले जाते की अरजित सिंग याला खरी ओळख आशिकी टु मधील तुम ही हो ह्या गाण्याचे गायन केल्याने प्राप्त झाली होती.हया गाण्याचे गायन करण्यासाठी त्याला अनेक अवार्ड देखील प्राप्त झाले आहेत.
आज अरजित सिंग संपुर्ण जगभरात गाण्याचे कार्यक्रम सादर करतो त्याचे गाणे ऐकण्यासाठी श्रोते चाहते लाखो करोडोंच्या संख्येने त्याच्या लाईव्ह कानसर्टला गर्दी करतात.
अरजित सिंगने गायन केलेल्या प्रत्येक गाण्यात आपणास भावनांची तीव्रता अनुभवायला मिळते.