मनोबाला कोण होते?
मनोबाला ह्या तामिळ सिनेमातील दिग्दर्शक तसेच अभिनेता म्हणून ओळखले जाणारया तामिळ अभिनेता दिग्दर्शकाचे नुकतेच चेन्नई येथे आपल्या राहत्या घरी वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे.
मागील काही दिवसांपासून मनोबाला हे आजारी असल्याचे सांगितले जात आहे.अनेक दिवसांपासून त्यांच्यावर घरी उपचार सुरू होते पण अचानक त्यांची प्राणज्योत मालवली आहे.त्यांच्या निधनामुळे दक्षिणात्य सिनेमा जगताला मोठा धक्का बसला आहे.
एक प्रभावी दिग्दर्शक कलाकार म्हणून मनोबाला यांची ख्याती होती.मनोबाला यांच्या मागे आपली पत्नी एक मुलगा असा परिवार देखील होता.
मनोबाला यांनी आतापर्यंत ३० ते ३५ वर्षाच्या संपुर्ण चित्रपट कारकीर्दीत ९०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये आतापर्यंत काम केले आहे.मनोबाला आपल्या विनोदी भुमिकेसाठी विशेष करून ओळखले जायचे.
मनोबाला हे उत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक,चित्रपट निर्माता,विनोदकार तसेच अभिनेता होते.दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ते सर्वात लोकप्रिय विनोदी कलाकार होते.
मनोबाला यांचा जन्म ८ डिसेंबर १९५३ मरूंगरूर कन्याकुमारी तामिळनाडू येथे झाला होता.मनोबाला यांच्या पत्नीचे नाव उषा महादेवन अणि मुलाचे नाव हरिष मनोबाला असे होते.
मनोबाला यांनी 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस तमिळ चित्रपटसृष्टीत आपली कारकीर्द सुरू केली होती १९७९ मध्ये भारती राजा यांच्या समवेत पुथीया वरपुगल हया चित्रपटात मनोबाला यांनी सर्वप्रथम सहदिग्दर्शन करत चित्रपट विश्वात पदार्पण केले होते.
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत मनोबाला यांनी ९०० पेक्षा अधिक चित्रपटात अभिनयाचे काम केले आहे ज्यात त्यांनी लहानापासून मोठमोठ्या भुमिका पार पाडल्या आहेत.
मनोबाला यांनी आतापर्यंत तब्बल २५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.याचसोबत मनोबाला यांनी टिव्ही सिरीअल मध्ये देखील काम केले आहे.
मनोबाला यांनी तामिळ सोबत तेलगू अणि मल्याळम चित्रपटात देखील काम केले आहे.मनोबाला अखेरीस घोस्टी अणि कोंड्राल पावम मध्ये दिसुन आले होते.
२००० हजारच्या दशकात मनोबाला आपल्या काॅमिक टायमिंग करीता अभिनय अणि संवाद वितरणाच्या अदितीय दृष्टिकोनामुळे प्रसिद्धी पावले होते.
मनोबाला यांनी दिग्दर्शन केलेले काही महत्वाचे चित्रपट –
आगया गंगई
पारम बरियाम
करूपु वेलल ई
मललु वेटटी मायनर
उरकावलन
एन पुरूषाथांन एनककु मटटुमथान
पिलाई निला
मनोबाला यांच्या निधनामुळे तामिळ चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे.अनेक अभिनेता दिग्दर्शक यांनी त्यांच्या निधना बद्दल शोकांतिका व्यक्त केली आहे.