क्रायोथेरपी म्हणजे काय?क्रायोथेरपीचे फायदे – Cryotherapy Uses Procedure and Benefits

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

Cryotherapy Uses Procedure and Benefits
Cryotherapy and Hot Water Therapy System – Circulating Personal Heat

आपले शरीर नेहमी सुंदर दिसावे निरोगी राहावे यासाठी आपण अनेक नवनवीन थेरपीचा वापर करत असतो.यात दोन प्रकारच्या थेरपीचा समावेश असतो.

एक केमिकल वर आधारित थेरपी असते अणि दुसरी नॅचरल म्हणजेच नैसर्गिक थेरपी असते.

सध्या अशाच एक नवीन थेरपीचा वापर सर्वसामान्य व्यक्ती तसेच मोठमोठ्या सेलिब्रिटींकडुन केला जातो आहे.हया नवीन थेरपीचे नाव आहे क्रायोथेरपी.

आजच्या लेखात आपण ह्याच क्रायोथेरपी विषयी माहिती जाणून घेणार आहोत.

क्रायोथेरपी म्हणजे काय? – Cryotherapy Uses Procedure and Benefits

क्रायोथेरपीला क्रायो सर्जरी आईसपॅक थेरपी असे देखील म्हटले जाते.

क्रायोथेरपी हा एक नैसर्गिक थेरपीचा प्रकार आहे.ज्यात आपण एखाद्या बंद खोलीत कमी तापमानात थांबत असतो.हया कमी तापमान असलेल्या खोलीत थांबण्याचा आपल्या बाॅडी अणि स्कीन वर नस इत्यादी वर इफेक्ट होत असतो.

क्रायोथेरपीचा वापर का केला जातो?

क्रायोथेरपीचा वापर हा आपल्या शरीराच्या पेशींमध्ये असलेली गडबड बिघाड ठिक करण्यासाठी केला जात असतो.

शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी देखील ह्या नैसर्गिक थेरपीचा वापर केला जातो.

क्रायोथेरपीचा वापर कोणाकडून केला जातो आहे?

क्रायोथेरपी ही एक सध्या खुप ट्रेंडिंग मध्ये असलेली थेरपी आहे जिचा वापर मोठमोठ्या सेलिब्रिटी माॅडेल वर्क आऊट करून झाले की रोज किमान पाच सहा मिनिटे का होईना करताना आपणास दिसून येतात.

क्रायोथेरपी मध्ये नेमकी काय केले जाते?

क्रायोथेरपी मध्ये व्यक्तीस एका बंद खोलीत विवस्त्र अवस्थेत ठेवले जाते.यानंतर ह्या बंद खोलीत शंभर डिग्री पर्यंतच्या गरम वाफा पाच ते सहा मिनिटांसाठी सोडल्या जात असतात.

ह्या वाफा आपल्या शरीरावर पडल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ प्युरिफाय होत असतात.यानंतर पाच ते सहा मिनिटांनी बंद खोलीत गरम तापमान निर्माण होऊ लागल्यावर खोलीत थंड वाफ सोडली जाते.

See also  म्हशीच्या दुधाचे आहारातील महत्व- गाई आणि म्हशीच्या दुधातला न्यूट्रिशन फरक -Nutritional values of cow and Buffalo milk  

क्रायोथेरपीचे फायदे कोणकोणते असतात?

क्रायोथेरपीचे पुढीलप्रमाणे अनेक महत्वाचे फायदे आपणास होत असतात.

क्रायोथेरपीचा वापर विशेषकरून त्वचा तसेच बाॅडीच्या विविध समस्या दूर करण्यासाठी केला जात असतो.

क्रायोथेरपीचा वापर थकवा तसेच त्वचेची सुज घालवण्यासाठी केला जात असतो.याचसोबत मायग्रेन संबंधित एखादा त्रास होत असल्यास तो दुर करण्यासाठी देखील ह्याच थेरपीचा वापर केला जात असतो.

ह्या थेरपीमुळे आपल्या शरीरातील एखाद्या भागावर सेलयुलाईट किंवा फॅट जमा झाले असल्यास ते दुर होण्यास मदत प्राप्त होते.ही थेरपी सेलयुलाईट कमी करते अणि चरबीच्या उतींना देखील हायड्रेट करण्याचे काम करते.

ह्या थेरपीमुळे मुरूम वगैरे सारख्या तसेच चेहर्यावर सुरकुत्या येणे इत्यादी वृदधत्वाशी संबंधित समस्या दूर होत असतात.

स्नायुंची वेदना कमी करण्यासाठी देखील खुप फायदेशीर आहे.

ह्या थेरपीमुळे स्मृतीभ्रंशाची समस्या दूर होत असते.आॅक्सिडेटीव्ह तणाव कमी होतो.वेडेपणाची समस्या उदभवत नाही.

क्रायोथेरपीचा वापर कोणी करणे टाळावे?

ज्या व्यक्तींना हार्ट संबंधित कुठलीही समस्या असेल, हाय ब्लड प्रेशरची समस्या असेल अशा व्यक्तींनी ह्या थेरपीचा वापर करणे टाळायला हवे.

याचसोबत कुठलीही गंभीर दुखापत इजा झालेल्या व्यक्तींनी स्कीन इन्फेक्शनची समस्या असलेल्या व्यक्तींनी देखील ही थेरपी वापरू नये.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा