आंतरराष्ट्रीय चहा दिवस का साजरा केला जातो? महत्त्व काय ?International tea day 2023 in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

आंतरराष्ट्रीय चहा दिवस का साजरा केला जातो?हया दिवसाचे महत्त्व काय आहे?international tea day 2023 in Marathi

आपल्या भारत देशातील लोकांचे सर्वात आवडते पेय म्हणजे चहा.कुठलाही शुभ तसेच मंगल प्रसंग असो कार्यक्रम समारंभ असो पहिले आपण घरात आलेल्या पाहुण्यांना चहापाणी करत असतो.

International tea day

आज भारतात कित्येक लोकांच्या दिवसाची सुरुवात ही एक कप चहा पिण्यापासुनच होते.

चहाचा व्यापार करत असलेल्या चहाच्या मळयामध्ये काम करत असलेल्या कामगारांच्या अडीअडचणी समस्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी दरवर्षी २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिवस साजरा केला जातो.

संपुर्ण जगभरात काही विशिष्ट देशांमध्ये १५ डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय चहा दिवस हा भारतातील चहाच्या उद्योग व्यापारास प्रोत्साहन देण्यासाठी तसेच चहाच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा दिवस दरवर्षी २१ मे रोजी साजरा केला जातो.

हा दिवस भारतात २१ मे रोजी साजरा केला जावा ह्या भारत देशाच्या शिफारशीमुळे प्रस्तावामुळे देखील संयुक्त राष्ट्राने २१ मे रोजी हा दिवस साजरा करण्याचे ठरवले होते.

आपल्या देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत चहाचे असलेले आर्थिक योगदान देशाला पटवून देण्यासाठी युनोने भारताच्या ह्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती.

हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केल्यास भारतातील चहाचे उत्पादन अणि वापर यात वाढ होईल असे संयुक्त राष्ट्राचे मत होते.संयुक्त राष्ट्राने आपल्या सभासद राष्ट्रांना देखील हा दिवस साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

मे महिना हा चहाचे उत्पादन घेण्यासाठी उत्तम असल्याने देखील संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय चहा दिवस २१ मे रोजी साजरा करण्याचे ठरवले आहे.

आज चहाचे काही असे प्रकार आहेत जे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर लाभदायक ठरणारे आहेत.चहाचे आज अनेक औषधी उपयोग गुणधर्म आहेत. आरोग्यदायी,आयुवेर्दिक फायदे देखील आहेत.

उदा, ग्रीन टी, ब्लँक टी इत्यादी.

आसाम मधील चहा संपुर्ण जगभरात फार प्रसिद्ध मानला जातो.भारतासोबत चहा उत्पादन करणारया प्रमुख देशांच्या यादीत चीन केनिया श्रीलंका इत्यादी चहा उत्पादन करणारया देशांचा समावेश होतो.

See also  गूगल वर्कस्पेस म्हणजे काय ? Google Workspace Marathi Information

चीन हा देश फार विपुल प्रमाणात चहाची निर्यात करतो.आपल्या भारत देशात चहाचे उत्पादन नुसते घेतलेच जात नाही तर स्थानिक पातळीवर त्या चहाचे सेवण देखील करण्यात येते.

आपला भारत देश जेवढे चहाचे उत्पादन करतो त्याच्या ७५ टक्के इतके चहाचे सेवण आपल्या भारत देशातच केले जाते.

१५ डिसेंबर २००५ रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिनाची सुरूवात भारत देशातील नवी दिल्ली येथे करण्यात आली होती यानंतर हा दिवस श्रीलंका ह्या देशात साजरा केला गेला त्यानंतर संपूर्ण जगभरात हा साजरा केला जाऊ लागला.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा