रिलीजच्या पहिल्याच दिवशी आदीपुरूष चित्रपट वादाच्या भोवऱ्यात हिंदु सेनेकडुन केले जात आहे चित्रपटातुन हिंदु सेनेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप – Adipurush controversy in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

रिलीजच्या पहिल्याच दिवशी आदीपुरूष चित्रपट वादाच्या भोवऱ्यात हिंदु सेनेकडुन केले जात आहे चित्रपटातुन हिंदु सेनेच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप adipurush controversy in Marathi

१६ जुन २०२३ रोजी आदीपुरूष हा रामायणावर आधारीत प्रभास अणि कीर्ती सोनन अभिनित चित्रपट थिएटर मध्ये रिलीज करण्यात आला होता.

पण रिलीज झाल्यानंतर काही तासातच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.सिनेमावर फॅन्स कडुन प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती.

माॅं सीता भारत की बेटी है हया चित्रपटातील एका डायलॉगला नेपाळ मधून विरोध केला गेला आहे.

नेपाळने असे म्हटले आहे की माता सीतेचा जन्म आमच्या नेपाळ मध्ये जनकपुर येथे झाला होता.

मग माॅं सीता भारत की बेटी है असा दावा तुम्ही चित्रपटातील डायलॉग मध्ये कसा करता आहे असा प्रश्न नेपाळने उपस्थित केला आहे.यामुळे नेपाळ देशात आदीपुरूष चित्रपटावर बंदी घालण्यात आली.

यानंतर आदीपुरूष चित्रपटाच्या निर्मात्यांनी सीतेला भारताची कन्या म्हणुन उल्लेख करण्यात आलेला डायलॉग चित्रपटातुन काढुन टाकला आहे असे सांगितले जात आहे.

नेपाळ हा एक असा देश ज्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात हिंदु धर्मातील लोक वास्तव्यास आहेत.

याचसोबत हिंदु संघटनांनी देखील सदर चित्रपटाला विरोध दर्शवला आहे.सदर चित्रपटाला प्रमाणपत्र देऊ नये यासाठी हिंदु संघटनेकडुन दिल्ली उच्च न्यायालयात याचिका सुदधा दाखल करण्यात आली आहे.

सदर चित्रपटातुन रामायण रामायणातील प्रमुख पात्र राम तसेच इतर पात्र अणि भारताच्या संस्कृती यांची खिल्ली उडविली गेली आहे.असे हिंदु संघटनेकडुन म्हटले जात आहे.

आदीपुरूष चित्रपटामध्ये रामायणातील अनेक चुकीच्या पद्धतीने दाखवल्या गेल्या आहेत ज्यामुळे हिंदु धर्मातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत असे आरोप देखील हिंदु संघटनेकडुन केले गेले आहे.

चित्रपटात दाखवण्यात आलेली राम सीता हनुमान रावण इत्यादी विषयीची अपमानास्पद तसेच आक्षेपार्ह दृश्ये काढुन टाकण्यात यावी असे देखील आपल्या याचिकेत हिंदु संघटनेने म्हटले आहे.

See also  महाराष्ट्र राज्यावर चक्रीवादळाचे संकट बिपरजाॅय चक्रीवादळ कोकणात धडकण्याची शक्यता - Cyclone Biparjoy Kokan news
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा