फ्रेंच विद्यार्थ्यांना का दिली जात असे वाईन? – French School children Drink Wine

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

फ्रेंच विद्यार्थ्यांना वाईन- French School children Drink Wine

फ्रेंच विद्यार्थ्यांना वाईन- French School children Drink Wine

सण 1956 पर्यन्त फ्रांस मध्ये ,लहान विद्यार्थीना  दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत ,जेवणासोबत  वाइन सुद्दा प्यायला दिली जाई. प्रत्येक बालकाला ४ लहान ग्लास वाईन चा हिस्सा हा ठरलेला असायचा.. त्या पूर्वी इतिहासात वाईन  बिअर आणि सायडर असे पेय्ये शाळेच्या कॅन्टीन मध्ये मिळत असत,अर्थात  प्रत्येक शाळेला हे स्वातंत्र्य होत की आपल्या शाळेत शालेय बालकांना वाईन द्यावी की नाही.

काही हौशी,जागरुक पालक तर आपल्या आवडत्या ब्रँड ची वाईन मिळावी म्हणून आग्रह करत. त्यांच्या विभागावर आधारित सहसा 500ml वाईन किंवा बिअर शाळेत लंच दरम्यान मिळावी म्हणून  ठेवली जात अस.

ज्या शाळा वाईन ला विरोध करत किंवा लंच दरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात मानाई होती तिथं पालकच  सकाळी शाळेत जायच्या आधी मुलांना सकाळीच नाश्ता , ब्रेकफास्ट सोबत वाईन देत असत.

आपण एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायला हवी की वाईनला  पारंपरिकपणे फ्रेंच संस्कृतीचा अविभाज्य भाग मानले जात असे, आणि पालकांचा असा विश्वास होता की मुलांना द्राक्षारसाने वाइनची ओळख करुन देणे ,त्यांना चांगल्या व जबाबदार पिण्याच्या सवयी  लावणे आणि त्यांच्या देशाच्या वाइन वारशाबद्दल माहिती देणे, शिकवण हे त्यांचं कर्तव्य आहे. .

हे ही महत्त्वाची आहे की बालपणी च बालकांना देत असलेली ही वाईन मध्ये बऱ्या पैकी पाणी मिसळून त्या वाईन ला dilute म्हणजे पातळ केली जात असे कारण मुख्य उद्देश मुलांना वाईनचा  संवेदी अनुभव देणे हा असायचा ,मादक पेय प्यायला लावणे नाही.


See also  घातक हार्ट अटॅक बंदुक ?- The CIA Heart Attack Gun
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा