प्रधानमंत्री पीक विमा योजना -PMFBY

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

PMFBY ची उद्दिष्टे

  • शेतक-यांच्या पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना विमा संरक्षण देणे.
  • नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थीतीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • कृषि पतपुरवठवात सातत्य राखणे.

PMFBY ची वैशिष्टये :-

  • कर्जदार शेतक-यांना बंधनकारक, बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक.
  • कुळांसाठी सुध्दा योजना लागू.
  • विमा संरक्षित रक्‍कम पिकनिहाय निर्धारित केल्यानुसार॰
  • विमा हप्ता खरीप हंगाम २.० %, नगदी पिकांसाठी ५.० %
  • जोखीमस्तर :- ७० % देय.
  • उंबरठा उत्पन्न मागील ७ वर्षातील सरासरी -(नैसर्गिक आपत्तीची २ वर्षे वगळून )

योजनेत (PMFBY) सहभागी शेतकरी :-

  • अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित पिके घेणारे शेतकरी.
  • कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी.
  • कर्जदार शेतकरी यांना बंधनकारक.
  • बिगर कर्जदार शेतक-यांना ऐच्छिक.

अधिसुचित पीके :-

  • अत्रधान्य पीके- भात, ज्वारी, बाजरी, नागली, मका, तुर, मुग,उडीद
  • गळीतधान्य पीके- भुईमूग, सोयाबीन, सुर्यफूल, तीळ, कारळा.
  • वार्षिक व्यापारी पिके – कापूस, कांदा.

विमा संरक्षणाच्या बाबी :-

उभे पिक (पेरणी ते काढणी पर्यंत) उत्पादनात येणारी घट

  • नैसर्गिक आग, वीज कोसळणे
  • गारपीट, चक्रीवादळ
  • पूर, भु-स्खलन, दुष्काळ, पावसातील खंड
  • किड व रोग इत्यादी

पीक पेरणीपूर्व/लावणीपूर्व नुकसान

* अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी /लावणी न झालेल्या क्षेत्रासाठी

* पेरणी /लावणी न झालेले क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ %पेक्षा जास्त असावे

हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसान भरपाई :-

पूर, पावसातील खंड, दुष्काळ इत्यादी मुळे अपेक्षित उत्पन्नामध्ये उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर

  • अपेक्षित नुकसान भरपाई रक्कमेच्या २५ टक्के नुकसानीची रक्‍कम आगाऊ देय्य॰
  • दिलेली भरपाई अंतिम नुकसान भरपाईतून समायोजन करण्यात येईल.
  • या करीता हवामान घटकांची आकडेवारी, उपग्रह छायाचित्र,बाधीत क्षेत्राचा अहवाल, पर्जन्याची आकडेवारी, इतर हवामान विषयक आकडेवारी, प्रसार माध्यमांचे अहवाल इत्यादीचा आधार घेऊन नुकसान ठरविणे.
See also  परीक्षा पे चर्चा 2023 विषयी माहिती pariksha pe charcha 2023 information in Marathi

काढणीपश्चात नुकसान :-

  • चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास.
  • वैयक्तीक पंचनामे यांच्या आधारे नुकसानीचे प्रमाण ठरविण्यात येईल.
  • काढणी/कापणीनंतर जास्तीत जास्त ९४ दिवस नुकसान भरपाईस पात्र.
  • वैयक्तीक नुकसान झाल्यास संबंधित वित्तीय संस्थेस ४८ तासाच्या आंत कळविणे आवश्यक
  • अधिसुचित पिक , नुकसानीचे कारण व प्रमाण इत्यादी कळविणे.
  • विमा कंपनी महसूल व कृषि यंत्रणांच्या मदतीने नुकसानीचे प्रमाण निश्‍चित.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती :-

  • पूर,भु-स्खलन, गारपीट इत्यादी स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास.
  • वैयक्‍तीक पंचनामे करुन नुकसान निश्‍चिती.
  • ४८ तासाच्या आंत वित्तीय संस्थेस कळविणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रे

  • 7/12, आधार कार्ड,
  • बँक पासबूक प्रत,
  • पिकाची पेरणी बाबत स्वयंघोषना पत्र,
  • भाडेपट्टा करार असल्यास करारनामा / सहमतिपत्र.  

योजनेचा हप्ता कुठे भरावा-

  • आपले सरकार सेवा केंद्र (csc), बँक,
  • ऑनलाइन- https://pmfby.gov.in/farmerLogin या वेब साईट वर             

विमा कंपनी -जिल्हा

अहमदनगर,नाशिक, जळगाव, सोलापुर,सातारा, चंद्रपुरभारती अक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लि.
परभणी, जालना, वर्धा, नागपुर, गोंदिया, कोल्हापूर, सांगली, बुलढाणा, वाशिम, नंदुरबाररिलायन्स  जनरल इन्शुरन्स कंपनी लि.  
नांदेड, ठाणे,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोलीइफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.  
औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला, धुळे, पुणेएचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लि.
उस्मानाबादबजाज अलायंझ जनरल इन्शुरन्स क.लि.
लातूरभारतीय कृषी विमा कंपनी.

अधिक माहिती साठी शासन नियम योजनेची सविस्तर माहिती – https://www.maharashtra.gov.in/1145/Government-Resolutions

DBT बद्दल माहिती –

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा