पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी रोपवाटिका योजना (Seedling Nursery Scheme Maharashtra)ही भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतक-यांचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने जाहीर झाली आहे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर खाजगी रोपवाटिका योजनेचे स्वरुप
- महाराष्ट्रत मोठया प्रमाणात फळे व भाजीपाला पिकांचे व्यवसायिक पध्दतीने लागवड करुन उत्पादन घेतले जाते.
- फळे व भाजीपाला निर्यातही मोठया प्रमाणात करण्यात येते.
- मागील २ ते ३ वर्षापासून भाजीपाला पिकाचे निर्यातक्षम व विषमुक्त उत्पादन करण्याकडे शेतक-यांचा कल वाढत आहे. त्यामुळे भाजीपाला बियांण्याच्या चांगल्या जाती व चांगली रोपे यांची मागणी वाढत आहे.
- भाजीपाला रोपांची नियंत्रीत वातावरणामध्ये तयार झालेली किड व रोगमुक्त भाजीपाला रोपांची मागणी मोठया प्रमाणात वाढत आहे.
- त्यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यात दर्जेदार किड व रोग मुक्त रोपे तयार करणाऱ्या लहान रोपवाटिका उभारण्यास वाव आहे.
योजनेचे उद्देश्य -Seedling Nursery Scheme Maharashtra
- भाजीपाला पिकांची दर्जेदार व किडरोग मुक्त रोपे निर्मिती करुन उत्पन्न व उत्पादनात वाढ करणे.
- रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतक-यांना शेतीपुरक व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणे.
- पिक रचनेत बदल घडवून आणणे व नविन तंत्रज्ञानाचा वापर करणे.
- शेतक-यांचे आर्थिक उत्पन्न व भाजीपाला उत्पादनात वाढ करणे
योजनेची व्याप्ती
- पॉलीनेट – भाजीपाला रोपवाटिकेत बियाण्याची रुजवण करण्यासाठी आर्द्रता व तापमान यांचे संतुलन राखणे आवश्यक असते, यासाठी बियाण्याची रुजवण वर्षभर करण्यासाठी प्लॅस्टीक टनेल्स रोपवाटिकेतील अत्यावश्यक बाब आहे
- शेडनेट –
- बियाण्याची रुजवण झाल्यानंतर विक्रीयोग्य होण्याच्या कालावधीत रोपांना कठीणपणा (हार्डनिंग’ आणणेसाठी ५ ते ६ दिवसाची पॉलीटनेलमधील रोपे शेडनेटमध्ये ठेवणे आवऱ्यक असते.
- सर्वसाधारणपणे ५० % सुर्यप्रकाश व ५० % सावली रोपांना उपलब्ध होणारे शेडनेट वापरण्यात येते. जेणेकरुन रोपे २१ दिवसापर्यंत खुल्या वातावरणात आणता येतील.
- तसेच रोपे शेडनेटमध्ये वाढताना त्यांचे किड व रोगापासून संरक्षण होईल तसेच खत व पाणी व्यवस्थापन झाल्याने दर्जेदार रोपे उत्पादन करता येईल.
- प्लॅस्टीक क्रेटस :- रोपांची वाहतुक सुरक्षित करण्यासाठी प्लॅस्टिक क्रेटस प्रस्तावित करण्यात आलेली आहेत.
लाभार्थी (Ahilya Devi Seedling Nursery Scheme Maharashtra)निवडीचे निकष
- अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान ०.४० हे. (१ एकर) जमिन असणे आवश्यक आहे,
- रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असणे आवश्यक आहे.
- माहिला कृषी पदवी धारकांना प्रथम प्राधान्य राहील.
- महिला गटास द्वितीय प्राधान्य.
- भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यअल्प भूधारक शेतकरी व होतकरी गट यांना प्राधान्य.
- अनुसुचित जाती व जमाती यांना केंद्र सरकारच्या मापदंडा प्रमाणे लाभ देण्यात येईल.
रोपवाटिकांचा संभावीत वापर
- भाजीपाला पिके -टोमेंटो,वांगी,हिरवी मिरची,कोबी, फुलकोबी, शिमला मिरची, कांदा, इत्यादी व इतर पिके
- फळपिके- पपई,ऱोवगा इत्यादी.
योजंनेअंतर्गत तांत्रिक प्रशिक्षण
भाजीपाला रोपवाटिकांचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या होतक-यांना तीन ते पाच दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे किंवा कृषि विज्ञान केंद्र , बारामती येथे अनिवार्य राहिल.
अर्थसहाय्याचे स्वरुप :-
- सदर प्रकल्प राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या धर्तीवर राबविण्यात येईल.
- सदर योजनेअंतर्गत प्रकल्प उभारणीनंतर प्रथम हप्ता ६०% व उर्वरित द्वितीय हप्ता ४०% अनुदान
योजनेचा कालावधी :- सदर योजनेचा कालावधी दोन वर्षाचा राहिल. (सन २०२०-२१ व २०२१-२२)
योजनेची अंमलबजावणी :-जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेमार्फत सदरची योजना राबविण्यात येईल.
Comments are closed.