अझोला शेती चे फायदे -How to grow Azolla

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

अझोला शेती- दुग्ध उत्पादनाकारता शेतकरी पाळत असलेल्याला दुभत्या जनावरांना लागणाऱ्या महागड्या खुराकामुळे दुग्ध उत्पादनावरील खर्च वाढत असतो . खर्च कमी करण्यासाठी घरच्या घरी कमी खर्चात अधिक चांगला नैसर्गिक वनस्पतिजन्य चारा म्हणजेच अँझोला वनस्पती दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशिर ठरत आहे

अझोला काय आहे ? आणि अझोला ची निर्मिती कशी करतात :

ही पाण्यावर वाढणारी शैवालवर्गीय वनस्पती आहे. जनावरांच्या खाद्यामध्ये त्याचा पूरक म्हणून वापर करण्यात येतो. तसेच, भातशेतीमध्ये खत म्हणून गाडल्यास त्यातून नत्र उपलब्ध होते.  

  • झाडाच्या सावलीत किंवा ५० टक्के शेडनेटचा वापर करून ९ फूट लांब व ६ फूट रुंद व ९ इंच खोलीचा खड्डा करावा.
  • पाणी झिरपू नये म्हणून खड्डा चांगल्या प्रतीच्या प्लॅस्टिक किंवा पॉलिथिनने आच्छादून घ्यावा
  • १२-१५ किलो माती प्लॅस्टिकवर पसरवून घ्यावी. त्यावर ३-४ किलो चांगले कुजलेले गाईचे शेण व ३०-४० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट १० लिटर पाण्यात चांगले मिसळून हे मिश्रण खड्यात सोडावे,
  • खड्डयात ८-१० सें.मी. पाणी राहील, याची काळजी घ्यावी.
  • तयार खड्ड्यातील पाण्यात.५ ते १ किलो अँझोलाचे कल्चर सोडावे.
  • ८-१० दिवसांत खड्डा अँझोलाने भरून जातो. अधिक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी असे एकापेक्षा अधिक खडडे तयार करावेत.

 अझोला मधील विविध घटक

  • शुष्क अँझोलात प्रथिने (२५ ते ३५ टक्के),
  • आवश्यक अमिनो आम्ले (७ ते १० टक्के)
  • जीवनसत्त्वे, खनिजे (कॅल्शियम, फॉस्फरस,पोटॅशियम, लोह, तांबे, मॅगेशिअम) (१० ते १५ टक्के)
  • अँझोलामध्ये अन्नपचनास उपकारक घटक असल्याने उच्चदर्जाची प्रथिने असल्याने अझोला जनावरे सहज पचवू शकतात.

अझोलाचे फायदे :

  • दुग्ध उत्पादनात १५-२० टक्के (अर्धा ते एक लिटर प्रति जनावर ) वाढ होते.
  • प्रचलित पशुखाद्यावरील खर्च २०-२५ टक्क्यांनी कमी होतो.
  • दुभत्या जनावरांसोबतच ही वनस्पती मांसल (ब्रॉयलर) कोंबड्या तसेच अंडी देणाऱ्या कोंबड्यांनाही पुरवून उत्पादन वाढवू शकतो. याचबरोबर शेळ्या, मेंढ्या, वराह यांना पुरविल्यास त्यांच्याही उत्पादनात चांगली वाढ होते.
  • अँझोला उत्पादनावरील खर्च अत्यंत कमी असून, त्यातुलनेत अझोला उत्पादन अधिक आहे.
  • अझोला पुरविलेल्या जनावरांची वाढ व उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
  • ही सेंद्रिय व नैसर्गिक वनस्पती आहे; त्यामुळे जनावरांच्या शरीरावर विपरीत परिणाम होत नाही.
  • कमी जागेत उत्पादन घेता येते. प्रकल्प सुरू करायला लागणारी गुंतवणूक ही कमी आहे. दुधाची गुणवत्ता वाढते. जनावरांची प्रकृती सुधारून आयुष्यमानही वाढते.
See also  २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाणार नरेंद्र मोदी यांची घोषणा - The point where the moon lander of Chandrayaan-3 landed will now be known as 'Shiv Shakti'.

अझोला देण्याची पद्धत व प्रमाण

  • अझोला थेट जसेच्या तसे जनावरांना किंवा इतर खुराकात मिसळून देता येते.
  • दुधाळ जनावरांना रोजच्या आहारात २ ते ३ किलो अँझोला शेतकरी देऊ शकतात. अँझोला जनावरांना देण्यापूर्वी स्वच्छ धुऊनच द्यावे.

प्रकल्प उभारणी खर्च :

२५० ते ३०० रु. प्रति खड्डा असून, हा खर्च फक्त एकाच वेळी करावा लागतो.

खलील बाबींची काळजी घ्यावी:

  • खड्याचीजागा सावलीत, पण भरपूर सूर्यप्रकाश मिळणारी असावी. दर २५-३० दिवसांनी खड्याची ५ टक्के माती ताज्या काळ्या मातीने बदलावी.
  • अझोला चे वाळवी, मुंग्या, किडे यांपासून संरक्षण करावे.
  • दर ५ दिवसांनी खड्ड्यातील २५-३० टक्के पाणी काढून त्यात ताजे पाणी टाकावे.
  • खड्यातील पाण्याची पातळी कायम ८-१० सें.मी. असणे गरजेचे आहे.
  • उन्हाळ्यात कडक उन्हामुळे अझोलाचा रंग हिरवट तांबडा किंवा विटकरी होतो. त्याच्या वाढीवर परिणाम होतो.
  • अझोला निर्मिती खडडयाच्या गारव्याला कुत्री व अन्य प्राणी येऊन बसतात, त्यांच्यासाठी बाजूने खांब रोवून दोरी किंवा कापड किंवा गॅबियन मेशचे कुंपण करून घ्यावे.
  • झाडाखाली खडडा केला असल्यास पालापाचोळा पडून कुजल्याने अझोला खराब होऊ शकतो. त्यासाठी वरून आच्छादन आवश्यक आहे.
  • शेण उपलब्ध आहे म्हणून अधिक वापर होतो. त्यामुळे अमोनिया निर्माण होऊन त्याचा वास अझोला ला येतो; त्यामुळे योग्य प्रमाणात शेणखत टाकावे.
  • पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यामध्ये बाहेरून पाणी येऊन अझोला वाहून जाऊ शकतो. त्यामुळे अधिक पावसाच्या ठिकाणी खडडे अधिक उंचावर करावेत किंवा विटांच्या सहाय्याने ९ इंची टाकी करावी.
  • पावसापासून संरक्षणासाठी खड्ड्यावर छत म्हणून ५० टक्‍के शेडनेटचा वापर करावा.

मधमाशा पालान

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा