मायकोरायझा (व्हॅम) चे फायदे -VAM Biofertlizer

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

मायकोरायझा-VAM Biofertlizer वनस्पतीवर्गातील बहुतांश वनस्पती च्या मुळावर जगताना आढळतात. सर्व प्रकारची अन्नधान्य, फळझाडे, मसाला पिके व भाजीपाल्याची पिके यांच्यासाठी मायकोरायझा जिवाणू खत अत्यंत महत्त्वाचे आहे.

मायकोरायझा म्हणजे बुरशीयुक्‍त मुळे.

  • या बुरशी वनस्पतीच्या मुळांवर बाहेरून वास्तव्य करतात किंवा मुळा च्या आत जावून जमिनीमध्ये सूक्ष्मअन्नद्रव्ये पुरवितात.
  • तसेच पाण्याअभावी मुळांचे सरक्षण करतात,
  • झाडांना नत्र, स्फुरद, पालाश आणि पाणी उपलब्ध करून देतात.
  • मायकोरायझा बुरशीची ६ प्रकार आहेत. उदा. ऑक्युलोस्पोरा, गिगॅसस्पोरा, स्क्लेरोसिस्टिस, एन्ट्रोफॉस्फोरा, स्कुटॅलोस्पोरा
  • त्यापैकी ग्लोमस कुळातील मायकोरायझा सर्वत्र आढळतो. विशेषत:मायकोरायझामुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पन्न वाढते.
  • जमिनीतील उपलब्ध पाण्याचा थेंब न्‌ थेंब पिकांना मिळवून दिल्यामुळे दुष्काळ काळातही पिके जगवली जातात.

मायकोरायझा वापराचे फायदे

  • स्फुरद, नत्र, गंधक तसेच तांबे, जस्त, मॅग्नेशियम आणि लोह यांची उपलब्धता मुळालगत वाढवितो. ज्यामुळे खत वापरात ५० टक्के बचत होऊ शकते.
  • पिकांची वाढ आणि उत्पन्न वाढविते तसेच हरितद्रव्ये तयार करण्याची संश्लेषण क्रिया गतिमान करून झाडातील आवश्यकसंजीवके वाढवून फलधारणा वृद्धिंगत करते.
  • मुळावरील आवरणामुळे जवळचे किंवा लांबचे जमिनीतील पाणी शोषण्याचे प्रमाण वाढवितेआणि त्यामुळे कमी पाण्यातही पिकाला वाचविले जाते.
  • जमिनीची प्रत राखते, सुधारते त्याचबरोबर जमिनीची उत्पादनक्षमता वाढवून सशक्त पीक निर्माण झाल्यामुळे मुळावाटे येणारे बुरशी, अणूजीव, सूञ्रकृमीमुळे होणाऱ्या रोगास अवरोधन करते.
  • सर्व प्रकारच्या पिकांच्या मुळांवर वाढत असल्यामुळे त्याचा वापर चारा पिकांवर देखील उपयुक्‍त आहे.
  • मोठया प्रमाणावर वापरल्या जाणाऱ्या इतर जिवाणू खतांसोबत उदा. रायझोबियम, अँझोटोबॅक्टर, अँसिटोबॅक्टर यांच्यासोबत संयुक्तपणे मायकोरायझाचा वापर अतिशय उपयुक्त आढळला आहे.
  • विविध तापमानावर व जमिनीतील तसेच हवामानातील होणाऱ्या अचानक बदलांपासून वाचविण्याचे कार्य मायकोरायझा करते.
  • सर्व प्रकारच्या वनस्पती, पिकांसाठी तसेच मानव आणि प्राणिमात्र-पशुपक्षी यांना पूरक असे हे जिवाणू संवर्धक आहे.

मायकोरायझा-VAM बियाण्याची प्रक्रिया

  • थोडा गुळाचा वापर करून व्हॅम मिसळलेल्या द्रावणाची बियाणांवर शिंपडणी करून सावलीत २-३ तास बी सुकवून नंतर पेरणी केल्यास उगवणक्षमता वाढते.
  • १ एकरासाठी लागणाऱ्या बियाण्यास १ ते २ किलो व्हॅमची प्रक्रिया उपयुक्त आढळली. तीच मात्रा जमिनीत कंपोस्ट खतासोबत मिसळून देण्याकरिता एकरी १० किलो व्हॅम कल्चर किंवा व्हॅम संवर्धन उपयुक्‍तआहे.
  • विशेषतः ज्वारी, बाजरी, गहू, सोयाबीन, भुईमूग, उडीद, मूर, तूर, हरभरा, सूर्यफूल यासाठी सरींमधून पेरताना १० किलो प्रतिएकर व्हॅम प्रभावी आढळले आहे.
  • भाजीपाल्यासाठी वांगी, टोमॅटो, मिरची, दोडके, कलिंगड, काकडी, ऊस, तुती यासाठी प्रतिएकर ५ किलो व्हॅम.
  • भेंडी, गवार, मका, करडई, कपाशी साठी प्रतिएकरी १० किलो.
  • कांदा, घेवडा, वाटाणा, भात, गहू, नाचणी, ज्वारी यासाठी प्रतिएकरी १५ किलो व्हॅम जमिनीतून द्यावे.
  • काजू, नारळ, सुपारी, मसाला पिके, भाजीपाला आणि ऊस इत्यादींच्या रोपवाटिकांमध्ये व्हॅमचा वापर निश्‍चितपणे रोपवाटिकेत होणारी मर कमी करण्यासाठी उपयुक्‍त आहे.
  • त्यासाठीगादी वाफ्यामध्ये रोप तयार करण्यास बी पेरण्यापूर्वी प्रतिएकर ५ किलो व्हॅम वरील पृष्ठभागात मिसळणे आवश्यक आहे.
  • लागवडीपूर्वी सर्व रोपांची मुळे २० ते २५ ग्रॅम व्हॅम ५ किलो गांडूळखत किंवा कंपोस्ट खतात मिसळून गादी वाफ्यावर ओळीत लावून त्यावर रोपे लावल्यास ती जोमदार होतात.
  •  वनिकी रोपांच्या पिशव्यांमध्ये किंवा कुंड्यांमध्ये १० ते १५ ग्रॅम व्हॅम ५० किलो गांडूळखत, कंपोस्ट किंवा मातीत मिसळून मुळाल्यात मिसळल्यामुळे रोपांची मर कमी होते.
See also  लाल सिंह चडडा आमीर खानचा चित्रपटb_ Laal Singh chadha Ameer khan movie in Marathi

 

6 thoughts on “मायकोरायझा (व्हॅम) चे फायदे -VAM Biofertlizer”

    • नमस्कार , आपल्याला मिळेल Om Bio-fertilizer

      Survey No. 1226/2, Near IOC Petrol Pump, Wada Road, Armori, Wadsa Road, Nagpur-440010, Maharashtra, India

      Call Us

      +91 9423565242

      Our Email

      [email protected] ह्यांना कॉनटॅक्ट करा

Comments are closed.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा