135+ मराठी अलंकारिक शब्द संग्रह | Alankarik Shabd in Marathi PDF Download

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

135+ मराठी अलंकारिक शब्द संग्रह | Alankarik Shabd in Marathi PDF Download

विद्यार्थीमित्रांनो आलंकारिक शब्द या टॉपिक वर स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमीच प्रश्न विचारले जातात, त्यामुळे जर का तुम्ही महाराष्ट्र होणाऱ्या स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर खाली दिलेले आलंकारिक शब्द एकदा वाचून नक्की जा.

मराठी अलंकारिक शब्द संग्रह

शब्दअर्थ
खुशालचेंडूचैनखोर माणूस
अष्टपैलूसर्वगुणसंपन्न
गर्भश्रीमंतजन्मापासून श्रीमंत
अकलेचा खंदकअत्यंत मूर्ख माणूस
गंगा-यमुनाअश्रु
अकरावा रुद्रअतिशय तापट माणूस
खेटराची पूजाअपशब्दाने खरडपट्टी काढणे
अकलेचा कांदामूर्ख
अरण्यरुदनज्याचा उपयोग नाही असे कृत्य
गंडांतरभीतिदायक संकट
भाकडकथाबाष्कळ गोष्टी
भीष्मप्रतिज्ञाकठीण प्रतिज्ञा
मंथरादुष्ट स्त्री
मायेचा पूतपरक्रमी मनुष्य, मायाळू
मारुतीचे शेपूटलांबत जाणारे काम
गाजरपारखीकसलीही पारख नसलेला, मूर्ख
अळवावरचे पाणीफार काळ न टिकणारे
गुरुकिल्लीमर्म, रहस्य
गुळाचा गणपतीमंद बुद्धीचा
अक्षरशत्रूनिरक्षर, अडाणी
गोगलगायगरीब निरुपद्रवी मनुष्य

Alankarik Shabd in Marathi

शब्दअर्थ
अमरपट्टाअमरत्वाचे आश्वासन
आग्या वेताळअत्यंत रागीट मनुष्य
अक्षर शत्रूअडाणी
कुबेरखूप श्रीमंत माणूस
घर भेद्यागुप्त गोष्टी शत्रूला सांगणारा
कैकयीदुष्ट स्वभावाची स्त्री
घटकेचे घड्याळक्षणभंगुर
ओनामासुरुवात, प्रारंभ
उंटावरचा शहाणामूर्खपणाचा सल्ला देणारा
घरकोंबडाघराबाहेर न पडणारा
उंबराचे फूलदुर्मिळ वस्तू, क्वचित भेटणारा
चर्पटपंजरीनिरर्थक बडबड
टोळभैरवकामात नासाडी करणारे लोक
काडी पहिलवानहडकुळा
कुंभकर्णअतिशय झोपाळू
कूपमंडूकसंकुचित वृतीचा
कोल्हेकुईनिरर्थक लोकांची बडबड
त्रिशंकूधड ना इकडे, धड ना तिकडे
खडाजंगीमोठे भांडण
दगडावरची रेघकधीही न बदलणारे
See also  वाहन फिटनेस प्रमाणपत्र विषयी संपूर्ण माहिती - Vehicle fitness certificate information in Marathi

Alankarik words in marathi

शब्दअर्थ
पर्वणीअतिशय दुर्मिळ योग
पाताळयंत्रीकारस्थान करणारा
पांढरा कावळानिसर्गात नसलेली वस्तु
ताटाखालचे मांजरदुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा
पांढरा परीसलबाड
पिकले पानम्हातारा
पोपटपंचीअर्थ न कळता पाठांतर करणारा
बृहस्पतीबुद्धिमान
बिनभाड्याचे घरतुरुंग
बोकेसंन्यासीधोंगी मनुष्य
बोलाचीच कढीकेवळ शाब्दिक वचने
भगीरथ प्रयत्नआटोकाट प्रयत्न
कर्णाचा अवतारउदार मनुष्य
चौदावे रत्नमार
कळसूत्री बाहुलेदुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
छत्तीसचा अकडाशत्रुत्व
जमदग्नीचा अवताररागीट
कळीचा नारदकळ लावणारा
खडाष्टकजोरदार भांडण
देवमाणूसचांगला सज्जन
धोपट मार्गसरळ, नेहमीचा मार्ग
नवकोट नारायणखूप श्रीमंत
नंदीबैलहो ला हो म्हणणारा

 

Figurative words in Marathi

शब्दअर्थ
बादरायण संबंधओढून ताणून दाखविलेला संबंध
संगणकसाक्षरसंगणकाचा वापर करण्याचे ज्ञान
सोन्याचे दिवसचांगले दिवस
सुळावरची पोळीजीव धोक्यात घालणारे काम
सांबाचा अवतारअत्यंत भोळा माणूस
चामुंडाभांडखोर व कजाग वृत्तीची स्त्री
दळूबाईभेकड माणूस
गाढवबेअकली माणूस
चालता काळवैभवाचा काळ
सूर्यवंशीउशिरा उठणारा
लंकेची पार्वतीअत्यंत गरीब स्त्री
रामबाण औषधअचूक गुणकारी
मुखस्तंभमुद्दाम न बोलता उभा राहणारा
मेषपात्रबावळट
मृगजळकेवळ आभास
श्रीगणेशाप्रारंभ
शेजारधर्मशेजाऱ्यांशी चांगल्या तऱ्हेने वागण्याची पद्धत
वाहती गंगाआलेली संधी
वाटाण्याच्या अक्षतानकार
लंबकर्णबेअकली

अलंकारिक शब्द मराठी व्याकरण

शब्दअर्थ
स्मशान वैराग्यतात्कालिक वैराग्य
सव्यसाचीडाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
सिकंदर नशीबफार मोठे नशीब
सिकंदरभाग्यवान
शकुनी मामाकपटी मनुष्य
रुपेरी बेडीचाकरी
थंडा फराळउपवास
घोरपडचिकाटी धरणारा
गप्पीदासथापा गप्पा मारणारा
खडास्टकभांडण
अंधेर नगरीअव्यवस्थित पद्धतीचा कारभार
अंडीपिल्लीगुप्त गोष्ट
हरीशचंद्रसत्यवचनी माणूस
वैष्णवविष्णूची उपासना करणारा
हरीचा लालविशेष व्यक्ति
सत्तीचे वाणदृढनिश्चय
वाघ्या-मुरळीखंडोबाच्या नावाने सोडलेला पुरुष व स्त्री
वासुदेवरामप्रहरी रामाचे गाणे म्हणत सगळ्यांना जागे करणारा
याज्ञिकधर्मसंस्कार विधी करणारा
तारेवरची कसरतसावधगिरीने करावयाचे काम
सारथीरथ चालविणारा
जमीन अस्मानचे अंतरदोन विरोधी गोष्टी
टांगती तलवारसतत भीतीची जाणीव
भानामतीजादू, जादूगारीण
लक्ष्मणरेषामर्यादा, संयम
काळाबाजारखोटा व्यवहार
अंगठाछापनिरक्षर मनुष्य
सोंगाड्यावगनाट्यात विविध भूमिका करणारा
गळ्यातील ताईतअतिशय आवडती व्यक्ती
बत्तीशीदातांची कवळी
स्वल्पविरामक्षणभर विश्रांती
सांडणीस्वारउंटावरून टपाल पोहोचवणारा
शैवशंकराचा उपासक
हिंगाचा खडात्रासदायक माणूस
शिरस्तेदारकचेरीतला अव्वल दर्जाचा कारकून
See also  रिक्रूटमेंट अणि सिलेक्शन मधील फरक - Difference between recruitment and selection in Marathi

Alankarik shabd in marathi pdf download

FAQ

Q. अलंकारिक शब्द म्हणजे काय | Alankarik Shabd mhanje kay

Answer: कोणतीही गोष्ट किंव्हा कोणतेही प्रसंग दर्शवण्यासाठी विशेष शब्दांची शब्दरचना केली जाते त्याला च अलंकारिक शब्द असे म्हंटले जाते, उदाहरणार्थ, भगीरथ प्रयत्न:आटोकाट प्रयत्न, कर्णाचा अवतार: उदार मनुष्य इत्यादी.

Also Read

Adverbs List In Marathi

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा