ASMR संपूर्ण माहिती – ASMR Information In Marathi
ASMR हा एक असा शब्द आहे ज्याविषयी आपल्यातील बहुतेक जण अज्ञात आहेत.पण युटयूबवर आता याविषयीच्या चँनल्स मध्ये दिवसेंदिवस वाढ देखील होत आहे.
त्यामुळे हे ASMR काय असते?याचा अर्थ काय होतो?प्रत्येकाच्या मनात याविषयी जाणुन घ्यायची अधिक उत्सुकता निर्माण होत आहे.
आणि इंटरनेटवर याविषयावर कोणी सर्च करायचा प्रयत्न केला तर आपल्याला याबाबद समाधानकारक अशी माहीती देखील प्राप्त होत नसते.
पण चिंता करू नका मित्रांनो तुम्ही अत्यंत योग्य ठिकाणी आलेले आहात.
कारण आजच्या लेखात आपण ASMR म्हणजे काय असते?त्याचा अर्थ काय होतो?त्याचे महत्व काय आहे?इत्यादी बाबींविषयी एकदम सविस्तरपणे जाणुन घेणार आहोत.
ASMR चा फुल फाँर्म काय होतो?
ASMR चा फुल फाँर्म autonomous sensory meridian response असा होत असतो.
ASMR म्हणजे काय?
- ASMR हे autonomous sensory meridian response आहे.ही एक प्रकारची संवेदना असते जी आपल्या टाळुपासुन सुरू होत असते.आणि आपल्या पुर्ण शरीराला आराम देत असते.
- ASMR ह्या संवेदनेत एखाद्या स्पेशल सुमधुर आवाजामुळे आपल्या मनाला शांती तसेच सुख मिळत असते.
- ASMR video हे आपल्या डोक्याच्या मागच्या बाजुला तसेच मणक्याला एक आरामदायी झटका,झुनझुनी देण्यासाठी असतात.
- 2015 सालात पीर जेमध्ये प्रकाशित करण्यात करण्यात आलेल्या एका अभ्यासामध्ये असे देखील आढळुन आले आहे की ASMR मुळे आपल्या हदयातील वेदना,मनातील नैराश्य दुर होत असते.शारीरीक आणि मानसिक शांतता प्राप्त होते.आपणास शांतपणे झोप देखील लागते.
- फक्त ही भावना त्यांनाच जाणवत असते जे ह्या भावनेला अनुभवण्याचा fell करायचा प्रयत्न करत असतात.
- ASMR चे प्रमुख उददिष्ट हे आपल्या शरीराला मेंदुला सुखद आणि आल्हाददायक दिलासा देणे सौम्य स्पर्श करणे हे आहे.
- ASMR आवाजामध्ये पाण्याचे थेंब पडण्याचा,घडयाळयाच्या टिक टिक करण्याच्या आवाजाचा,काहीतरी कुजबुजायचा,घसायचा आवाजाचा,चावण्याचा,कुरतडण्याचा,हातात हात घेण्याचा,हळु आवाजात बोलणे,समुद्राचे पाणी वाहण्याचा,पाऊसाचे थेंब पडायचा इत्यादी आवाजांचा समावेश होत असतो.
ASMR ह्या शब्दाचा इतिहास –
ASMR हा शब्द 2010 मध्ये जेनिफर अँलन नावाच्या स्त्रीने तयार केला होता.याच सुमारास जेनिफर अँलन एका sthealth.com या फोरमवरील लोकांच्या गृपला जाऊन भेटली होती.
मग त्या फोरममधील लोकांनी जेनिफरने अनुभवलेल्या संवेदनांचे वर्णन केले होते.पण हे कोणालाच तेव्हा फारसे समजले नाही.
त्या प्लँटफाँर्मवर कुठलीही community organization नव्हती.ज्यामुळे निराश होत जेनिफरने autonomous sensory meridian response नावाचा एक गृप facebook ह्या social media platform वर तयार केला.तोच group ASMR च्या नावाने ओळखला जाऊ लागला.
जेनिफर अँलनला एक असा गृप तयार करायचा होता जो अशा लोकांना एकत्र लोकांना एकत्र आणण्याचे काम करेल ज्यांनी ही भावना स्वता अनुभवलेली आहे.
मग पुढे जाऊन हाच जेनिफर अँलनने तयार केलेला समुदाय पुढे जाऊन एक जागतिक विश्वव्यापी समुदाय म्हणुन आकार घेऊ लागला.
Comments are closed.