बी टु बी अणि बी टु सी मार्केटिंग म्हणजे काय?B2b and b2c marketing information

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

बी टु बी अणि बी टु सी -B2b and b2c marketing information

बी टु बी मार्केटिंग म्हणजे business to business marketing होय.

यात जी काही वस्तुंची प्रोडक्ट सर्विसेसची देवाणघेवाण तसेच खरेदी विक्रीची प्रक्रिया होत असते ती दोन व्यापारी उद्योजक दोन व्यावसायिक दोन कंपन्या यांच्यामध्ये आपापसात घडुन येत असते.यात कस्टमरचा कुठलाही समावेश नसतो.

बी टु बी बिझनेस मध्ये मॅनयुफॅक्चरींग कंपनी आपले कुठलेही प्रोडक्ट तसेच सर्विस कस्टमरला डायरेक्ट सेल न करता दुसरया होलसेलर किंवा रिटेलरला विकत असतात.

मग हे होलसेलर तसेच रिटेलर आपला प्राॅफिट मार्जिन अॅड करून एका विशिष्ट किंमतीत आपल्या कस्टमरला ह्या प्रोडक्ट सर्विसेसची विक्री करत असतात.

बी टु बी मार्केटिंग मध्ये जी काही खरेदी विक्रीची देवाणघेवाणीची प्रकिया घडुन येत असते.ती उत्पादक(manufacturer) अणि घाऊक विक्रेता(wholesaler)तसेच घाऊक विक्रेता अणि किरकोळ विक्रेता(retailer) यांच्यामध्ये घडुन येत असते.

उदा,समजा एखादी कंपनी एखादया प्रोडक्टची सर्विसेसची मॅनयुफॅक्चरींग करते अणि जेव्हा ही कंपनी आपले प्रोडक्ट सर्विस कस्टमरला डायरेक्ट न विकता एखाद्या होलसेलर किंवा रिटेलर याला विकत असते

अणि मग हे होलसेलर तसेच रिटेलर त्या विकत घेतलेल्या प्रोडक्टची वस्तुंची विक्री आपल्या कस्टमरला करत असतात.अशा देवाणघेवाणीला अशा मार्केटिंगला बी टु बी business to business मार्केटिंग असे म्हटले जाते.

थोडक्यात सांगायचे म्हटले तर जेव्हा एखादा दुकानदार, होलसेलर रिटेलर आपल्या दुकानात विकण्यासाठी ज्या काही वस्तु लागत असतात त्या दुसरया उत्पादकाकडुन योग्य त्या भावात खरेदी करतो

आणि मग त्या उत्पादकाकडून खरेदी केलेल्या वस्तु आपल्या दुकानात आणुन त्या वस्तु स्वताचा प्राॅफिट मार्जिन अॅड करून कस्टमरला विकतो तेव्हा याला बिझनेस टु बिझनेस माॅडेल असे म्हटले जाईल.

B2b and b2c marketing information
B2b and b2c marketing information

बी टु सी मार्केटिंग म्हणजे काय?

बी टु सी मार्केटिंग याचा फुलफाॅम business to consumer असा होतो.

यात जी काही वस्तुंची प्रोडक्ट सर्विसेसची देवाणघेवाण तसेच खरेदी विक्रीची प्रक्रिया घडुन येते ती उत्पादक कंपनी अणि कस्टमर यांच्यामध्ये घडुन येत असते.यात कुठल्याही इतर दुसरया होलसेलर रिटेलर कंपन्यांची मध्यस्थी राहत नसते.

See also  इव्हेंट मॅनेजर कसे बनावे?How to become Event manager

बी टु सी बिझनेस मध्ये मॅनयुफॅक्चरींग म्हणजेच प्रोडक्ट सर्विसेसचे उत्पादन करणारी कंपनी आपले कुठलेही प्रोडक्ट तसेच सर्विस कस्टमरला डायरेक्ट सेल करते ते प्रोडक्ट दुसरया होलसेलर किंवा रिटेलरला विकत नसते.

यात जी काही खरेदी विक्रीची प्रक्रिया घडुन येते ती उत्पादक अणि ग्राहक यांच्यामध्ये घडुन येत असते.

उदा, समजा एखादी कंपनी आहे जी एखाद्या प्रोडक्टचे मॅनयुफॅक्चरींग करते जेव्हा ही मॅनयुफॅक्चरींग कंपनी आपले प्रोडक्ट सर्विस कुठल्याही रिटेलर होलसेलर यांना न विकता डायरेक्ट कस्टमरला सेल करत असते.तेव्हा अशा बिझनेस माॅडेलला बिझनेस टु कंझ्युमर असे म्हटले जाते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा