बैलपोळा सण निबंध – Bail pola essay in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

बैलपोळा सण निबंध Bail pola essay in Marathi

मित्रांनो श्रावण महिना हा सण उत्सवांचा दिवस मानला जातो कारण ह्या महिन्यात रक्षाबंधन गोकुळाष्ठमी,गणेशोत्सव असे महत्वाचे सण उत्सव येतात

बैलपोळा हा सुदधा श्रावण महिन्यात येणारया अशाच महत्वाच्या सण उत्सवांपैकी एक मानला जातो.हा सण पिठोरी अमावस्येच्या दिवशी साजरा केला जात असतो.

मित्रांनो बैल हा शेतकरींचा मित्र मानला जातो.शेतातील पेरणीच्या तसेच नांगरणीच्या कामासाठी त्याचा शेतकरी वापर करत असतो.याचसोबत तो बैलगाडी ओढुन शेतातील पिक देखील वाहत असतो.म्हणजेच शेतीतील अनेक कामात तो शेतकरयांच्या कामी येत असतो.

अनेक ग्रामीण भागामध्ये सरज्या ढवळया पवळया अशी अनेक नावे बैलांच्या बैलजोडीची ठेवली जात असतात.

बैलपोळा हा सण आपल्या मनात असलेली बैलाविषयीची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा दिवस असतो.यादिवशी आपण बैलाचे आभार व्यक्त करत असतो.

या दिवशी बैलांना कुठल्याही कामाला जुंपला जात नाही.सकाळी लवकर उठुन शेतकरी आपल्या बैलांना अंघोळ घालत असतात.त्यांचे अंग घासुन त्याला एकदम स्वच्छ तसेच साफ करत असतात.चरायला चारा देतात.त्यांच्या खांद्याला हळद तुप या दोघांनी शेकण्यात येते.

बैलाच्या शिंगांना विविध रंगाने रंगवले जाते.त्याच्या अंगावर एखादे रंगीबेरंगी नक्षी काढण्यात येते.पाठीवर झुला चढविण्यात येतो.

बैलाच्या शिंगांना फुगे फुले तोरण बांधण्यात येते.त्याच्या गळयामध्ये घूंगराची माळ अणि फुलांचा हार घालण्यात येत असतो.त्याच्या पायामध्ये घूंगरू बांधण्यात येतात.

या दिवशी बैलांची साजसजावट करून त्यांची जंगी स्वरूपात मिरवणुक काढण्यात येत असते.गावातील प्रत्येक घरोघरी शेतकरी बैलाला घेऊन जातात.

यासाठी महिला आपापल्या घरासमोर सडा मारून रांगोळी काढुन ठेवतात.मग महिला त्याचे स्वागत करून त्याची पुजा करत असतात.त्याला ओवाळुन आरती करत असतात.त्याला पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो.

गावातुन मिरवणुक काढुन झाल्यानंतर अखेर शेतकरी बैलासोबत गावातील हनुमान मंदिराजवळ जमतात.अणि आपल्या बैलासोबत मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात.

अशा पदधतीने दरवर्षी हा सण साजरा केला जात असतो.या सणादवारे आपणास ही शिकवण दिली जाते की बैल हा शेतकरीचा मित्र आहे जो दिवसभर त्याच्यासोबत शेतात कष्ट करत असतो.म्हणुन शेतकरयाने बैलाला जपायला हवे त्याला जीव लावायला हवा.

See also  कोण आहेत महादेवी वर्मा? । चरित्र, कार्य, पुरस्कार, मनोरंजक तथ्ये

थोडक्यात हा सण आपणास प्रत्येक प्राणीमात्रांवर आपण दया करावी,प्रेम करावे हे सांगतो.

अणि आपला देश हा कृषीप्रधान देश म्हणुन ओळखला जात असल्याने ह्या सणाला भारतीय संस्कृति मध्ये अधिक महत्व दिले जाते.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा