भगवान बिरसा मुंडा रोड योजना काय आहे? Bhagwan Birsa Munda road scheme information in Marathi

तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group

भगवान बिरसा मुंडा रोड योजना – Bhagwan Birsa Munda road scheme information in Marathi

राज्यातील सतरा जिल्ह्यात सर्व आदिवासी वाडया पाड्यातील रस्त्यांना जोडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते रोड योजना सुरू केली आहे.

१८ आॅगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र राज्यातील आदिवासी क्षेत्रात भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते रोड योजना कार्यान्वित केली जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे.

याविषयी निर्णय देखील राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.हया योजनेसाठी तब्बल पाच हजार कोटी रुपये इतकी खर्चाची तरतूद करण्यात आली आहे.

ह्या योजनेअंतर्गत एकुण सहा हजार ८३८ किलोमीटर इतक्या लांबीचे रस्ते बांधण्यात येणार आहे.

आदिवासी वाडया पाड्यात रस्त्यांच्या अभावाने आतापर्यंत अनेक अपघात तसेच दुदैवी घटना घडल्या आहेत.पण ह्या भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते रोड योजनेअंतर्गत सर्व आदिवासी वाडया पाड्यांचा मुख्य रस्त्यांसोबत संपर्क प्रस्थापित होईल.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्व आदिवासी पाडे बारमाही रस्त्यांना जोडले जावे म्हणून शासनाकडून नवीन योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

ह्या योजनेसाठी आदिवासी विकासाची एक स्वतंत्र समिती स्थापन करण्यात येणार आहे.ही स्वतंत्र समिती सार्वजनिक बांधकाम विभागासोबत सर्व रस्त्यांचे बांधकाम बघणार असल्याचे सांगितले गेले आहे.

भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते रोड योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते रोड योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील सतरा जिल्ह्यात रस्त्यांचा संपर्क वाढवणे हा असणार आहे.

ह्या योजनेअंतर्गत आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील सर्व रस्त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रांना,आश्रमशाळा यांना मुख्य रस्त्यासह जोडण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे

See also  महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची संपूर्ण यादी -Latest Complete List- List of Chief Ministers of Maharashtra and Tenure
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा