पुस्तक परिचय – ऑटोमिक हॅबिट्स – Book Review – Atomic habits in Marathi
आपल्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी चांगल्या गोष्टींची सवय करणे आणि वाईट गोष्टींची सवय मोडणे फार गरजेचे असते.असे केल्याशिवाय आपण जीवनात यशस्वी होऊ शकत नाही.
आपल्याला लक्षात घ्यायला हवे की चांगल्या सवयी कोणत्या आहेत आणि वाईट सवयी कोणत्या आहेत.आपल्या सवयी वर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण जेम्स क्लीअर यांचे atomic habits हे पुस्तक वाचले पाहिजे.
Atomic habits या पुस्तकात सवयी नियंत्रण ठेवण्यासाठी लेखकाने काही महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत,ज्या की आपण आपल्या दैनंदिन जीवनात अवलंबून आपल्या सवईंवर कंट्रोल करू शकतो आणि जीवनात यशस्वी होऊ शकतो.
• 1%नियम-
खूप लोकांना वाटत असते की कोणतीतरी मोठी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न देखील मोठे करावे लागतात.पण जेम्स क्लीअर यांच्या मते जीवनात मोठी गोष्ट मिळवण्यासाठी दररोज छोट्या छोट्या पायऱ्या ध्येयाकडे चढल्या पाहिजेत.
• आपण व्यायामाचे उदाहरण पाहू,काहीजण एका दिवसामध्ये 150+ जोर मारतात आणि परत आठवडाभर व्यायाम करत नाहीत.तर याउलट काहीजण सुरवातीला कमी जोर मारतात आणि दररोज त्या जोरची संख्या वाढवतात.

• जेम्स क्लीअर यांच्या मते शेअर मार्केट मध्ये असणारी कंपाऊनडींग हा मुद्दा आपल्या दैनंदिन जीवनात देखील उपयोगी पडतो.आपण दररोज 1%जरी प्रगती केली तर वर्षाच्या शेवटी आपण आतापेक्षा 37% प्रगत झालेलो असतो.
• आपल्याला सध्या सर्व गोष्टी त्वरित उपलब्ध होत असल्यामुळे आपल्या माईंडला देखील त्वरित rejuvenate मिळणाऱ्या गोष्टी हव्या आहेत.
• इन्स्टाग्राम रिल्स च्या काळात आपण जर रिल्स वापरणाऱ्या व्यक्तीला 30 मिनिटांचा यु ट्युब विडिओ पाहायला सांगितला तर तो व्यक्ती विडिओ पाहणार नाही.कारण त्याचा मेंदूला 15 किंवा 30 सेकंदाचा विडिओ पाहण्याची सवय झाली आहे;
• परंतु तुम्हाला जर जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला त्वरित result देणाऱ्या गोष्टी करण्यापेक्षा काही कालावधी नंतर result देणाऱ्या गोष्टी करायला हव्यात.कारण त्वरित मिळालेले यश देखील जास्त काळ टिकत नाही.
चांगल्या गोष्टींची सवय कशी लावावी ? –
जेम्स क्लीअर ह्यांनी ह्या मुद्यामध्ये 4 पॉईंट चा ग्राफ बनवला आहे आणि त्या ग्राफ चे चार भागात विभाजन केले आहे.
• पहिल्या भागामध्ये दोन मुद्दे आणि दुसऱ्या भागामध्ये दोन मुद्दे.आपल्याला समजा सकाळी चहा पिण्याची सवय असली तर
o आपल्याला पहिल्यांदा उठल्या उठल्या त्याची तलप होते,हे पहिल्या मुद्यामध्ये येते.
o त्यानंतर आपण चहा पिण्यासाठी इंर्जेंटिक आणि उत्सुक होतो, हे दुसऱ्या मुद्यामध्ये येते.
o यानंतर आपण चहा बनवतो,हे तिसऱ्या मुद्यामध्ये आणि
o त्यानंतर आपण चहा पितो,हे चोथ्या मुद्यामध्ये.हे चार मुद्दे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही गोष्टींसाठी लागू पडते.
• तुम्हाला जर सिगरेट पिण्याची सवय मोडायची असेल तर तुम्ही सिगरेट च्या पॅकेट ला आपल्या नजरेपासून दूर ठेवायचा पर्यन्त करा,आपल्या सिगरेट पिणाऱ्या मित्त्रापासून काही काळ लांब रहा आणि जिथून तुम्ही सिगरेट खरेदी करत होता तिथुन जाऊ नका.असे जर तुम्ही 21 दिवस केले तर सिगरेट पिण्याची तुमची सवय मोडून जाईल.
• तुम्हाला जर पुस्तक वाचण्याची सवय लावायची असेल तर तुम्ही तुमच्या नजरेसमोर कोणतेही पुस्तक ठेवा, आणि झोपायच्या आधी त्या पुस्तकातील एक धडा वाचा,वाचून झाल्यानंतर तुम्ही संतुष्ट देखील व्हाल.
• आपण जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येयावर फोकस न करता त्या ध्येयापर्यंत पोहचवणार्या वाटेवर फोकस केला पाहिजे.कारण ध्येय ठरवून ध्येय प्राप्त होत नसत,त्यासाठी आपल्याला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत करावी लागते.
• जेम्स क्लीअर ह्यांनी तीन वर्तुळाच्या मदतीने ध्येय कसे गाठायचे हे सांगितले आहे.
o त्यातील बाहेरच्या वर्तुळात आपले जे ध्येय आहे ते ठेवले आहे,
o त्याच्या आतील वर्तुळात आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न याना ठेवले आहे
o आणि सगळ्यात आतल्या वर्तुळात आपल्या ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला दैनंदिन जीवनात कोणकोणते बदल करावे लागतील याबद्दल सांगितले आहे.
आपण या लेखामध्ये जेम्स क्लीअर यांच्या atomic habit या पुस्तकातील काही महत्वाचे मुद्दे थोडक्यात पाहिले.पण तुम्हाला जर हे मुद्दे संक्षिप्त मध्ये वाचायचे असेल तर तुम्ही atomic habits हे पुस्तक ऍमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वरून ऑर्डर करून वाचू शकता.
